एकीकडे तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करण्यासाठी पाठपुरावा करायचा आणि दुसरीकडे महाराष्ट्रात मुंबईत मराठी सक्तीसाठी वेळकाढूपणा करायचा...
स्वायत्त महाराष्ट्र अभियान
#विरोधाभास#प्राथमिकता#महाराष्ट्रधर्म
जेव्हा बदलापूरमध्ये घटना घडली, तेव्हा निरपराध चिमुकल्यासाठी लोक रस्त्यावर उतरले
आणि उत्तर म्हणून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला.
आता नसरापूरमध्येही तेच चित्र पुन्हा दिसत आहे.
देवेंद्रजी, ही जनतेची वेदना आहे
तिला दडपून टाकण्याचा प्रयत्न करू नका.
थोडं संवेदनशील व्हा आणि लोकांचा विश्वास जिंका.
@Dev_Fadnavis 🙏
एक ना एक दिवस या मुद्द्यावर यावे लागणारच होते. आज तामिळनाडू आलाय उद्या इतरही राज्ये येतील जर तिथल्या जनतेच्या, राजकीय नेत्यांच्या, प्रतिष्ठित मान्यवरांच्या आपल्या भाषा संस्कृती अस्मिता प्रति संवेदना जिवंत असतील तर. #स्वायत्तराज्य#भारतीयसंघराष्ट्र ह्यांची पूर्तताच भाषिक वाद व दिल्ली केंद्रित हिंदी वर्चस्वाची लढाई संपुष्टात आणेल. मराठी भाषिकांनी काय खावे, कसे राहावे, काय साजरे करावे स्वतःच्या मराठी समाजाचा भूमीचा विकास कसा घडवावा हे दिल्लीत बसून एखादा अमराठी नेता किंवा व्यवस्था ठरवणार नाही.
हा महाराष्ट्र म्हणजे आमचे घर आहे आणि त्यात हक्क आणि अधिकार आमचे असतील शेजाऱ्यांचे नाही. पाहुणे म्हणून या ४ दिवस गोडधोड खाऊ घालू पण हे तर ७० वर्ष ठाण मांडून बसलेत आपल्या अजून नातेवाईकांना बोलवत आहेत व आता आमच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क सांगू लागलेत त्यामुळे कठोर निर्णय घ्यावेच लागतील अन्यथा आपलीच मोरी आणि .... ची चोरी अशी गत होईल.
__सुमित पाटील
स्वायत्त महाराष्ट्र
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारनालाघेऊन चालला आहे हे दिसून येत आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध होताना दिसत आहे...
विद्यमान राज्य सरकारच्या कार्यकाळात निवडणुकीच्या दरम्यान लोकांना धमकावणे, पैशाचे अमिष दाखवणे, एवढेच नव्हे तर उमेदवार पळवणे, त्यांच्या अपहरण करणे, खून , हिंसाचार घडवणे इथपर्यंतच्या घटना घडत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी ओळख कधीच नव्हती, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची ही नवी ओळख निर्माण करू पाहतो आहे का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे...
#लातूर #महानगरपालिका #निवडणूक #काँग्रेस
#वंचित_बहुजन_विकास_आघाडी.
#AmitDeshmukh4LaturCity #LaturCity
#IndianNationalCongress
#VanchitBahujanAghadi
#INCMaharashtra
.
.
@INCIndia@VBAforIndia@Prksh_Ambedkar@Sujat_Ambedkar@INCHarshsapkal@INCMaharashtra@INCMumbai@IYC@IYCMaha
प्रति,
केंद्रीय निवडणूक आयोग
भारत सरकार
राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र राज्य
विषय - भाजप नेते आशिष शेलार यांना आपले अधिकृत प्रवक्ते म्हणून घोषित करणेबाबत …
महोदय,
मनसेने मतदार यादी, बोगस मतदार किंवा दुबार मतदार यादीवरुन निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले की भारतीय जनता पक्षाच्या लोकांना राग येतो,चीड येते.. आणि त्यांचे नेते निवडणूक आयोगाची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषदा घेतात.यावरुन भारतीय जनता पक्षाचा खरा जीव मतदार यादीत आहे, हे स्पष्ट दिसतय.
म्हणूनच भाजपचे नेते माननीय आशिष शेलार यांना निवडणूक आयोगाने आपले अधिकृत प्रवक्ते म्हणून घोषित करावे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमची मागणी आहे .
धन्यवाद …!!!
आपला विश्वासू,
गजानन काळे
प्रवक्ते,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@CEO_Maharashtra@ECISVEEP
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई ते कुर्डुवाडी येथे ट्रेनने शैक्षणिक सामान पार्सल पाठवायचे होते. परंतु त्या ठिकाणचे पार्सल बुकिंग बंद आहे असं रेल्वे प्रशासनाने सांगितले. #मराठी माणसाचे बुकिंग का नाकारलं❓
@RailMinIndia@AshwiniVaishnaw#एकहातमदतीचा
@BhatkhalkarA श्रीमान अतुल भातखळकर साहेब,
तुम्ही कोणा कोणावर कारवाई करणार ?थोडा तुमचा अभ्यास कमी पडतोय साहेब, माहिती करून घ्या, स्वायत्त फक्त एक्स वर नसून स्वायत्त हा विचार सर्वसामान्य मराठी लोकांच्या हृदयात आहे, अखंड महाराष्ट्रभर तो पेरला गेला आहे... #स्वायत्तमहाराष्ट्र#स्वायत्त#महाराष्ट्र
@BhatkhalkarA स्वायत्त मागणी करण्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेय अस तुम्ही म्हणालात, दोन भाषिक समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम करत आहेत असेही म्हणालात, यावर इतकेच सांगेन तुमची लाचारी जी काय आहे ती असू द्या पण अखंड महाराष्ट्रातल्या जनतेचे तुम्ही मालक बनण्याचा प्रयत्न करू नका
कृपया राजकीय चपला बाहेर काढून एक सर्वसामान्य मराठी म्हणून याकडे पहा...
नेत्यांसाठी लाचार होऊ नका, आपल्या माय भूमीसाठी लढण्यासाठी तयार व्हा !!!
स्वायत्त महाराष्ट्र अभियान
मराठीच्या हक्कासाठी,
महाराष्ट्राच्या हितासाठी
महाराष्ट्रात फक्त मराठी