रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी, दिवेआगार येथे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या आळंदी येथील विनर्स अॅकडमीच्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खदायक आणि दुर्दैवी आहे. मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये भारताच्या नितेश सिवाचने पुरुषांच्या ९७ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. अंतिम फेरीत जपानच्या युरी नाकाझातोविरुद्ध नितेशला ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला; मात्र अंतिम फेरीपर्यंतची त्याची दमदार वाटचाल भारतीय कुस्तीच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय ठरली. अंतिम फेरीपूर्वी नितेशने उपांत्यपूर्व फेरीत तुर्कमेनिस्तानच्या अमानबेर्दी अगामामेदोव्हचा ७-१ असा पराभव केला, तर उपांत्य फेरीत मंगोलियाच्या गानखुयाग गानबाटारला ९-० असे नमवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. विशेष म्हणजे, १९६२ नंतर भारतीय पुरुष खेळाडू ग्रीको-रोमन कुस्तीपटू आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे नितेशचे हे रौप्यपदक केवळ आणखी एक पदक नसून भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीच्या पुनरागमनाची ऐतिहासिक नोंद ठरली आहे.
नितेश सिवाचचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कुस्तीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
#AsianGames2026 #NiteshSiwach #Wrestling #GrecoRoman #India #SilverMedal #Cheer4Bharat
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन म्हणायचं आणि त्याच आंदोलनाच्या ठिकाणी पत्रकाराशी कथित मारहाणीचा प्रकार घडायचा आधी आंदोलनात शिस्त आणि संयम ठेवा, मग जनतेला लोकशाहीचे धडे द्या! @RRPSpeaks आपल्या आंदोलनाची जबाबदारी आणि तिथे घडलेल्या प्रकाराचं उत्तर जनतेला द्यायला हवं.
माजी खासदार किरीट सोमैया यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत जन्म/मृत्यू प्रमाणपत्र घोटाळा संदर्भात याआधी घेतलेल्या संयुक्त बैठकीनंतर पाठपुरावा करुन खालील मुद्दे मांडले.
1. ८७३४७ हून अधिक बेकायदेशीररित्या सुधारित जन्म प्रमाणपत्र देण्याचे महापालिकेने मान्य केले आहे.
2.१९,७३४ हून अधिक जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
3.हे जन्म प्रमाणपत्र रद्द करून परत घेण्यात आलेले नाही.
4.या संदर्भात पोलीस कारवाई, SIT कारवाई, गुन्हा/FIR झालेला नाही.
5.जन्माच्या सगळ्या नोंदी महापालिकेच्या CRS Portal वर अपलोड करावयाचे आहे.
याबाबत आज बैठक घेतली, सर्व बाबी समजून घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.
या बैठकीस माजी खासदार किरीट सोमैया, मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.
@KiritSomaiya
#BMC #BirthCertificateScam #Maharashtra #AshishShelar
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ च्या आवारातील अनधिकृत मशिदीबाबत आज बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
या प्रकरणी माजी खासदार किरीट सोमैया यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) तसेच एअरपोर्ट अथॉरिटीच्या संबंधित अधिकाऱ्यांचे उद्याच जबाब/स्टेटमेंट नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना दिले. या प्रकरणाची तात्काळ चौकशी सुरू करून उपलब्ध कागदपत्रे, परवानग्या आणि संबंधित बाबींची सखोल पडताळणी करुन, या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
या बैठकीस माजी खासदार किरीट सोमैया, मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #AshishShelar
Mumbai needs redevelopment that solves traffic and parking, not adds to the problem
Convened a crucial meeting to address Mumbai’s growing parking and traffic challenges. Directed the formation of a committee chaired by Additional Chief Secretary (UDD), with officials from BMC, Traffic Police, SRA and MHADA. The committee will undertake a comprehensive review of the different rules governing SRA, MHADA and major cluster redevelopment projects, including Dharavi, and suggest measures to reduce traffic bottlenecks, improve mobility and create adequate parking for Mumbaikars.
Such a coordinated approach will also help make redevelopment projects more viable while ensuring that Mumbai’s growth keeps pace with its infrastructure needs. Also, directed officials to complete the study and submit a detailed report to the Government within one month.
#Maharashtra #AshishShelar
मुंबईतील वाढत्या पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आज आढावा बैठक घेतली.
•नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीमध्ये मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) आणि म्हाडाच्या (MHADA) अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
•SRA, MHADA तसेच धारावी पुनर्विकासासह मोठ्या समूह पुनर्विकास (Cluster Redevelopment) प्रकल्पांसाठी लागू असलेल्या विविध नियमांचा समितीमार्फत सर्वंकष आढावा घेण्यात येईल. वाहतूक कोंडी कमी करणे, शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे तसेच मुंबईकरांसाठी पुरेशा पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्याचे काम समिती करेल.
•समितीने आपला अभ्यास पूर्ण करून एका महिन्याच्या आत सविस्तर अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
#Maharashtra #AshishShelar
Pleased to meet Chess Grandmaster Abhijeet Kunte, India’s 4th and Maharashtra’s 2nd Grandmaster, and Chief Coach of the Indian Chess Team. Under his mentorship, the Indian Chess Team has achieved remarkable success, winning the Best Team Award at the Chess Olympiad at Samarkand Uzbekistan for 3rd consecutive time.
We had a productive discussion on how the Esports Games Federation (ESGF) could organise an international-level Esports Chess Tournament in Maharashtra, further strengthening the state’s position as a hub for chess and esports.
Adv. Nandan Jha, Founder & Director, Esports Games Federation (ESGF), and Chairman, Chess Veda, a leading online chess platform, Ms. Supriya Keshri, Indo-Canadian actress and Founder, RM Films and Shri Lokesh Natu, Chess Influencer, Chess with Lokesh were present on the occasion.
A very enriching interaction focused on the future of chess, esports, and India’s growing role on the global stage.
#Maharashtra #AshishShelar
पाच दशकांचा समृद्ध वारसा… नव्या पर्वाची दिमाखदार सुरुवात!
आमच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन केले. उपस्थितांशी संवाद साधत सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात चित्रनगरीच्या पाच दशकांच्या गौरवशाली वाटचालीचा गौरव करत पुढील बाबींचे अनावरण केले.
▪️ चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण
▪️ सुवर्ण महोत्सवी गीताचे अनावरण
▪️ चित्रनगरीच्या पाच दशकांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या दृक्-श्राव्य चित्रफितीचे अनावरण
▪️ चित्रनगरीच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पे आणि ऐतिहासिक क्षण अधोरेखित करणाऱ्या कॉफीटेबल बुकचे अनावरण
▪️'चित्रपताका' नियतकालिकाचे प्रकाशन
दादासाहेब फाळके चित्रनगरीने महाराष्ट्रासह भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. या समृद्ध वारशाचा गौरव करताना, बदलत्या काळातील गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत आधुनिक, सक्षम आणि जागतिक दर्जाची चित्रनगरी घडविण्याच्या नव्या पर्वाला या सुवर्ण महोत्सवी वर्षातून सुरुवात होत आहे.
या कार्यक्रमात दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये चित्रनगरीच्या माध्यमातून ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित होते.
#DadasahebPhalkeChitranagari #GoldenJubilee #MarathiFilmIndustry #Maharashtra #AshishShelar
When a potential 9/11-scale tragedy loomed, Capt. Smit Machchhar’s unmatched grit and split-second courage saved hundreds of lives. As Hon’ble PM Narendra Modi Ji and global leaders have rightly noted, his bravery is nothing short of extraordinary.
Incredible to see the courage of an Indian making headlines worldwide. Extremely proud of our braveheart!
@narendramodi
#India
India’s first Sailing medal at the Asian Games!
Congratulations to Prince Noble and Manu Francis on winning the Silver Medal in the Men’s Skiff Sailing event at the Asian Games 2026. A historic achievement on the waters and a proud moment for India.
Wishing them many more successes ahead.
#AsianGames2026 #TeamIndia #Sailing
Congratulations to Tanvi Khanna, Anahat Singh, Shameena Riaz and Joshna Chinappa on securing Bronze for India in Women’s Squash at the Asian Games 2026. Well played, champions, and best wishes for many more achievements ahead.
#AsianGames2026#Squash#TeamIndia#WomenInSport