मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होत असून यात आज सहभागी झालो.
मराठा आरक्षणासाठी याआधी २०१४ आणि २०१८ मध्ये तत्कालीन सरकारने महत्त्वपूर्ण प्रयत्न केले होते. पण, ते न्यायालयात टिकू शकले नाहीत. आज विशेष अधिवेशनात विधेयक मांडले जाणार आहे. त्यामुळे आजचा दिवसही तितकाच महत्त्वाचा आहे.
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे, टिकणारे आरक्षण द्या, अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करा, सगेसोऱ्यांच्या आरक्षणासाठी कायदा करा... या मागण्या पूर्णत्वास याव्यात यासाठी आम्ही अधिवेशनात आवाज उठवू.
सरकारने मराठा समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. त्यांना झुलवत ठेवणे, चालढकल करणे, खोटी आश्वासने देणे योग्य नाही. अशा धोरणांमुळे सर्वच समाजात सरकारविरोधात रोष वाढत आहे, याची जाणीव आम्ही आजच्या अधिवेशनात करून देऊ.
#maratha_reservation #marathaaarakshan #ekmarathalakhmaratha
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@bb_thorat@prithvrj@AmitV_Deshmukh@INCMaharashtra
@mieknathshinde साहेब मोसंबी जूस दिले पण ते किती काळ जूस राहील सांगता येत नाही कारण त्याचे रूपांतर होणार आहे ज्यात मराठयांच्या मागण्यांचा घात होईल.........