सोलापूरचे आमचे निष्ठावान सहकारी स्व. बाळासाहेब सरवदे यांच्या निधनानंतर आज पुन्हा एकदा तिथे गेलो, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, पण राजकारणी म्हणून नाही तर त्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून. सरवदे कुटुंब या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहून मनाला शांती मिळाली.
गुन्हेगारांना पाठबळ देणारी सिस्टीम आज ना उद्या कोसळेलच, पण या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बस��ार नाही.
माणुसकीचा हा धर्म आम्ही कधीच सोडणार नाही. त्यामुळे बाळासाहेबांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणताही मुद्दा राजकीय विरोध म्हणून उचलत नाही हे वारंवार सिद्ध होत आलं आहे. राज्��� सरकारने कोस्टल रोडवर म्युझिकल रोड सुरू केल्यावर त्याचा विरोध महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसे नेते अमित ठाकरे ह्यांनी केला होता, तेव्हा ह्याच सरकाने विकासाला विरोध म्हणून त्यांच्यावर टीका केली...पण आज शेवटी त्यांना हा म्युझिकल रोड बंद करावा लागला...असेच रेल्वेच्या अंतर्गत पदोन्नतीची परीक्षा स्थानिक भाषेत देता येते असा नियम असताना देखिल तिथे मराठीला डावण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेन���ने इशारा देताच रेल्वेने इंग्रजी आणि हिंदीसक्तीचा आदेश रद्द केला आहे.
हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करू शकते!
#MNSImpact #MNSAdhikrut #MNVSAdhikrut #RajThackeray #AmitThackeray
“कॅप्टन” हे भारतीय लष्करातील अत्यंत सन्मानाचे पद ��हे. या पदापर्यंत पोहोचणारा व्यक्ती अतिशय मेहनतीने, जिद्दीने व प्रखर राष्ट्रभक्तीने इथेपर्यंत पोहोचत असतो. भारतीय सेनादलांत या पदावर सेवा बजावणाऱ्या किंवा या पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तींनाचा नावासोबत “कॅप्टन” हे पद जोडण्याचा अधिकार असतो.
सर्व जनतेला आणि विशेषत: माध्यमांना माझी विनंती आहे की, घृणास्पद कृत्ये करणाऱ्या भोंदूच्या नावापुढे कुठेही हे पद लावू नये. हा भोंदूबाबा कधी��ी आपल्या सैन्यदलात अथवा नौदलात नव्हता. कधीकाळी व्यावसायिक व्यापारी जहाजांवर कर्मचारी असलेला हा व्यक्ती स्वयंघोषित कॅप्टन आहे. त्याने स्वतःला लावून घेतलेली खोटी पदवी आपण संमत करून नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान करू नये.
संघर्षाचा काळ संपला..,
२०२६ गुलालानेच सुरूवात झाली..
साहेबांना या वर्षात मुंबई महानगरपालिकेनंतर पुन्हा जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती मध्ये गुलाल लागलाचं...
मनसे अभिनंदन साहेब..❤️💐
Raj Thackeray Amit Thackeray
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीह��� मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजि��� पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महार���ष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुक��� लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स��वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवा�� कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धां��ली.
राज ठाकरे ।
प्रथम राजसाहेब अभिनंदन 💐
किती जागा आल्या हे महत्त्वाचं नाही, आमच्यासाठी या माणसाचा संघर्ष संपला हे महत्त्वाचं आहे..
नवीन वर्षात गुलालाने सुरुवात झाली हे महत्त्वाचं..
कित्येक वर्षांचा संघर्ष अखेर संपला...
Raj Thackeray 💐
संयम!!!! 🚂🚩✨
"एक युद्ध स्वतः विरुद्ध" सदैव राजसाहेब म्हणतील तिच पूर्व दिशा...
#sarkar 🤞
“ माझा नेता माझा अभिमान ”
#राजपर्व❤️
Raj Thackeray
#solapurkar#solapur