पुणे जिल्हा परिषद आणि बारामती पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, प्रचाराचा भव्य शुभारंभ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
या निवडणुकीच्या माध्यमातून विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा आमचा निर्धार असून, जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि पक्षाची एकजूट हीच आमची खरी ताकद आहे. येत्या काळात बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने कार्य करणार आहोत. याप्रचार शुभारंभास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या बारामती पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रचाराचा शुभारंभ आदरणीय @AjitPawarSpeaks दादा आणि @sunetrapawar8 वहिनीसाहेब यांनी नारळ फोडून करण्यात आला.
📍कन्हेरी
Outstanding performance by our Women in Blue! 🇮🇳
Chasing a mammoth score in the semi finals is never easy, yet our team displayed skill, temperament and teamwork against defending champions Australia, especially Jemimah Rodrigues and Harmanpreet Kaur and their strong batting performances.
Heartiest congratulations to the entire team and best wishes for the finals!
#INDvsAUS
#ICCWomensWorldCup2025
नेतृत्व जे कृतीतून सिद्ध होतं..!
राजकारण, प्रशासन आणि लोकसेवा या तिन्ही क्षेत्रांमधील आदरणीय अजितदादांच्या सशक्त वाटचालीस मी पत्नी म्हणून कायमच जवळून पाहत आले आहे. तुमचं नेतृत्व संकटात मार्ग दाखवतं, निर्णयांतून दिशा ठरवतं आणि माणसांशी असलेली नाळ जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवून देतं.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
@AjitPawarSpeaks
आज दीपावली पाडवा निमित्त काटेवाडी येथील निवासस्थानी श्री. अजितदादा पवार यांनी बारामतीकरांची भेट घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
या शुभप्रसंगी, ही दिवाळी बारामतीकरांना सुखाची, समाधानाची, समृद्धीची, आर्थिक भरभराटीची, आरोग्यदायी जावो अशा सदिच्छा देखील व्यक्त केल्या. यावेळी मोठ्या संख्येने बारामतीकर उपस्थित होते. तसेच मोठ्या स्नेहभावाने, बंधूभावाने आजचा हा कार्यक्रम पार पडला.
#DiwaliPadwa
हे औक्षण निखळ प्रेमाचे,
हे औक्षण दृढ विश्वासाचे,
हे औक्षण भक्कम पाठिंब्याचे..!
बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पत्नी सुनेत्रानं आणि कुटुंब सदस्यांनी माझं औक्षण केलं.
#दादांची_बारामती
सुनेत्रा, आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आयुष्यातील प्रत्येक वळणावर आपण सावली बनून माझ्या पाठीशी खंबीर उभ्या राहिलात. म्हणूनच राजकीय-सामाजिक जीवनात मी इथवर यशस्वी झेप घेऊ शकलो. आपण माझा भक्कम आधारस्तंभ आहात. आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
आता माझ्या आया-बहिणींना, मुलींना काही घाबरायचं कारण नाही.. त्यांच्या सुरक्षेसाठी हा भाऊ समर्थ आहे.. बारामतीत 'शक्तीबॉक्स तक्रार पेटी' संकल्पना आम्ही प्रभावीपणे राबवण्यास हाती घेतली आहे. मायमाऊलींना एकच विनंती करतो की, निर्भयपणे आपल्या तक्रारी या शक्तीबॉक्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात.. कायदेशीर मार्गानं नक्कीच तुम्हाला न्याय मिळवून देण्यात आम्ही कुठे कमी पडणार नाही.. भयमुक्त सुरक्षित वातावरण तुमच्यासाठी निर्माण करू..!
जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!
योजनांची नांदी जशी बहिणींसाठी.. तशीच भावांसाठी सुद्धा..
माझ्या भावांना विनंती करतो की, आमचा महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाइन क्रमांक - ९८६१७१७१७१ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. प्रत्येक उपयुक्त योजनेची माहिती सविस्तर मिळवा. लाभ घ्या, पंखांना बळ द्या!
खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.co/FV9033ltRT
#MahaRashtrawadiHelpline
#महाराष्ट्रवादी_हेल्पलाइन