मागील वर्षी #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. मा. @CMOMaharashtra देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करत ही बातमी सांगितली होती. या १२ किल्ल्यांमध्ये स्वराज्याची राजधानी रायगडचाही समावेश होता. पण आज दुर्गराज रायगडची काय अवस्था आहे ?
रायगडावरील महिला स्वच्छतागृहांची एका पर्यटक महिलेने पोलखोल केली आहे. या स्वच्छतागृहांच्या भिंतींना मोठमोठी छिद्र पाडलेली आहेत, दारं नाहीत, योग्य पाण्याचा पुरवठा नाही अशामध्ये "महिलांनी काय उघड्यावर स्वच्छास बसावे का ?" हा त्या पर्यटक महिला भगिनीचा प्रश्न रास्त आहे.
सरकार म्हणतंय की आम्ही महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवू. आधी नीट स्वच्छतागृह बांधा मग १ ट्रिलियन डॉलरच्या बढाया मारा ! स्वच्छतागृह नसल्याने, अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे महिलांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. स्वच्छतागृहांचे महत्त्व इतर देशांना पटले आहे आपल्या देशातील सरकारला स्वच्छतागृहांचे महत्त्व कधी समजेल? फक्त #स्वच्छ_भारत_अभियानाची घोषणा करून, त्यासाठी करोडो रुपये जाहिरातींवर खर्च करून चालणार नाही. करोडो रुपये स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातींवर खर्च करता तर मग तुम्ही स्वच्छतागृहांची नीट सोय ठेवू शकत नाही ?
#swachhbharatabhiyan #Raigad #MaharashtraGaurav #shivajimaharaj #unseco #heritagesite
IAS तुकाराम मुंडे साहेब म्हणजे खणखणीत नाणं आहेतं! 🔥
अन्न आणि औषध विभागात वाढलेली भेसळ, निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार यावर कायमचा चाप बसवायचा असेल, तर मुंडे साहेबांसारखं कडक आणि प्रामाणिक अधिकाऱ्याचीच गरजे आहे.
कामात तडजोड नाही आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही हीच त्यांची खरी ओळख!
न्युज १८ मराठी: बडे मुद्दे
देशात पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होणार का, याबाबत विरोधकांचे दावे आणि सत्ताधाऱ्यांचे प्रतिदावे यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे. महागाई, आर्थिक अस्थिरता आणि गुंतवणुकीची चिंता सामान्य माणसाला सतावत आहे. भीतीचे वातावरण निर्माण करून राजकीय फायदा घेतला जातोय का, असा सवालही उपस्थित होत असून सुरक्षित गुंतवणुकीबाबत नागरिक मार्ग शोधताना दिसत आहेत.
(लिंक कॉमेंट बॉक्स मध्ये)
सगळे म्हणतं आहे ह्या महिलेने गोंधळ घातला.. पण कोणी म्हणतं नाही की तिने स्वतःच्या प्रश्नासाठी मंत्र्यांना प्रशासन व्यवस्थेला जाब विचारला ... तिने केलं ते योग्यच...पण गोंधळ घातला म्हणणारे कधी सुधारणार आहेत....
मराठी बोलणार नाही म्हणण्याची हिंमत येते कुठून? Black & White | Nilesh Khare
#Marathi#MarathiAsmita#LanguagePride#Maharashtra#Culture
(Marathi Language, Language Pride, Cultural Identity, Maharashtra, Marathi Asmita, Social Issue, Regional Language, Nilesh Khare, SP31)
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय?
एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा!
महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
𝐕𝐕𝐈𝐏 मंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवताच, रहदारीत आडकलेल्या सर्व वाहन चालकांनी एकसुरात हॉर्न वाजवले आणि ते वाहतुक पोलिसांना न जुमानता निघाले...
𝐕𝐕𝐈𝐏 ताफ्यांसाठी रस्ते बंद करणे यापुढे सहन केले जाणार नाही... जनतेने या अशिक्षित नेत्यांना असाच धडा शिकवलाच पाहिजे...
छत्रपती शिवाजी महाराजांनी कुंभमेळ्यात स्नान केले का?
खूप शोध घेतला; त्यांनी तेथे स्नान केल्याचा संदर्भ मिळाला नाही.
त्यांनी कुंभमेळ्यासाठी खर्च केला का?
संदर्भ मिळाला नाही!
त्यांनी ५०–६० किल्ले बांधले आणि ताब्यातील ३००–३५० किल्ल्यांचा विस्तार किंवा विकास केला.
त्यासाठी त्यांनी मुहूर्त पाहिला का?
पायाभरणी आणि उद्घाटन समारंभांवर वेळ व पैसा खर्च करून प्रसिद्धी मिळवली का?
संदर्भ मिळाला नाही!
त्यांनी पुतळे उभारले का?
संदर्भ मिळाला नाही!
दरवर्षी धार्मिक उत्सवांत समाज गुरफटून राहावा, म्हणून सार्वजनिक समारंभांचे अवडंबर व्हावे, अशा वातावरणाला त्यांनी प्रोत्साहन दिले का?
संदर्भ मिळाला नाही!
त्यांनी स्वराज्याचा कणा असलेल्या शेतीवर लक्ष केंद्रित केले का?
होय, केले!
आदर्श आणि सर्वसमावेशक, न्याय्य प्रशासन दिले का?
होय, दिले!
अपराध्यांची गय केली का?
नाही, केली!
आपण त्यांचे वारसदार आहोत का?
होय, आहोत!
मग त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मार्गक्रमण करत आहोत का?
अंतर्मुख व्हा. जागे व्हा!
-महेश झगडे
काही कंपू अज्ञानाच्या मक्तेदारीवर कूटनीतीने समाज कुरडतात हे मी समजू शकतो,
पण समाजाने त्याला का बळी पडावे हे माझ्या आकलनापलीकडे!
कंपू आहे.
लहान.
पण कपटी.
तो अज्ञानाची मक्तेदारी करतो.
जाणूनबुजून.
योजनाबद्ध.
निर्दयपणे.
अज्ञानाच्या वर्चस्वाखाली ज्ञान दडपले जाते.
प्रश्नांना गळा घोटाला जातो.
विवेकाची चेष्टा होते.
आणि अंधश्रद्धेला सिंहासन.
हे मला समजते.
कारण सत्ता मोहक असते.
अज्ञान ही त्यांची चलनवलन .
भीती हा त्यांचा भांडार.
ते समाज कुरडतात.
हळूहळू.
आतून.
विचारांना पोखरतात.
आत्मविश्वास गिळतात.
हे सर्व मी समजू शकतो.
इतिहास साक्षी आहे.
कपट नवे नाही.
शोषण अनोळखी नाही.
पण प्रश्न इथेच उभा राहतो.
समाज का झुकतो?
का शरण जातो?
का विचार सोडतो?
का तो स्वतःच बेड्याचे वर्चस्व स्वीकारतो?
का तो स्वतःच अंधार निवडतो?
का तो प्रश्न विचारण्याची हिंमत हरवतो?
का तो सत्याला घाबरतो?
हीच खरी शोकांतिका.
कंपू नव्हे—समाज दोषी.
कारण संमतीशिवाय शोषण टिकत नाही.
मूक मान्यतेशिवाय अत्याचार वाढत नाही.
म्हणून जागे व्हा.
प्रश्न विचारा.
विवेक जपा.
अज्ञानाला नकार द्या.
कंपू तुटतील.
मक्तेदारी कोसळेल.
पण आधी समाज उठला पाहिजे.
नाहीतर अंधारच राज्य करेल.
-महेश झगडे
जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी, निवेदिता प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा #ललना_कलारत्न_पुरस्कार🏅
माझ्या सौ. प्रतिभा सुर्यकांत भांडेपाटील यांस बालगंधर्व नाट्यगृह पुणे येथे देऊन सन्मानित करण्यात आले
धन्यवाद 🙏
निवेदिता प्रतिष्ठान पुणे.
🚆 भारतीय रेलवे की रफ्तार बनी मासूम काव्या की ढाल! 🇮🇳
तीन साल की नन्ही काव्या को अगवा कर किडनैपर राप्ती सागर एक्सप्रेस में सवार हुआ लेकिन उसे क्या पता था कि इस बार ट्रेन सिर्फ यात्रियों को नहीं, न्याय को भी मंज़िल तक ले जाएगी!
ललितपुर से भोपाल तक करीब 260 किलोमीटर तक ट्रेन को बिना रुके दौड़ाया गया, ताकि बच्ची सुरक्षित बचाई जा सके। रेलवे, जीआरपी और आरपीएफ ने जिस तेजी और समन्वय से काम किया, उसने पूरे देश का दिल जीत लिया।
ये घटना 2020 की है तब रेलमंत्री पीयूष गोयल के नेतृत्व में भारतीय रेलवे ने यह साबित किया कि जब बात देश की बेटियों की सुरक्षा की होतो एक-एक इंजन, एक-एक पटरियां दिल से चलती हैं।
🙏 सलाम है उन सभी अधिकारियों और कर्मचारियों को जिन्होंने वक्त से लड़कर इस मासूम की ज़िंदगी बचाई।
भारत की पटरियां सिर्फ लोहा नहीं, हिम्मत और उम्मीद की रगें हैं! 💪🇮🇳
#IndianRailways #AshwiniVaishnaw
आदित्य अमोल धुमनखेडे (वय 15, रा. किरकटवाडी फाटा, सिंहगड रोड) हा मुलगा सकाळी 11 वाजल्यापासून बेपत्ता आहे. नांदेड फाटा येथून क्लास वरुन सुटल्यावर मित्राकडे जातो असे आईला फोन करून सांगितले होते. आईने विरोध केला होता.
दुपारी तीन वाजेपर्यंत आईने वाट पाहिली. मित्रांकडे, क्लासमध्ये विचारपूस केली परंतु आदित्य मिळून आला नाही. आई व वडील दोघे नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे गेले परंतु तेथे लवकर त्यांना गांभीर्याने घेतले नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
24 तास वाट पाहू असे तेथील पोलीस सांगत असल्याचे पालकांनी सांगितले. पोलीस योग्य प्रतिसाद देत नाहीत हे पाहिल्यावर पालकांनी अधिक शोधाशोध सुरू केली. नांदेड सिटी परिसरातील एका कंपनीच्या कॅमेऱ्यात आदित्य सकाळी 11:40 वा. दिसून आला.
नांदेड सिटी पोलीसांनी याबाबत गांभीर्याने तपास करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करुन शोध घ्यायला हवा. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी पालकांशी असंवेदनशील वर्तन केले त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः पहाटे 4 वाजेपर्यंत परिसरातील गावांमध्ये फिरत होतो. अद्याप काहीही तपास लागलेला नाही. वेगाने तपास होणे आवश्यक आहे. @PuneCityPolice@CPPuneCity@PuneCityTraffic@AjitPawarSpeaks@supriya_sule@MahaDGIPR@DGPMaharashtra@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@KirkatwadiForum@BJP4Maharashtra@ShivSenaUBT_@NCPspeaks@mnsadhikrut
ऐतिहासिक सुवर्णक्षण 🔥🔥
आजच्याच दिवशी म्हणजे १० नोव्हेंबर इ स १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा तर बाहेर काढलाच सोबत दगाबाज कृष्णा भास्कर कुलकर्णी या गद्दार हारामखोराला पन ठार केला होता …!
#शिवप्रतापदिन#अफजलखान_वध#किल्लेप्रतापगड
#supremecourtupdate
Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 (RTE Act)”
या कायद्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी Teacher Eligibility Test (TET) उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले होते...
परंतु अनेक राज्यांमध्ये शिक्षकांची भरती RTE लागू होण्याच्या सुरुवातीच्या काळात झाली होती, आणि त्या वेळेस काही शिक्षकांकडे TET पात्रता नव्हती.
तेव्हा केंद्र सरकारने त्या शिक्षकांना TET परीक्षा पास करण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली होती..
तरी देखील अनेक शिक्षकावर या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येते. ...पण आता मात्र यावर सुप्रीम कोर्टचा निकाल आला आहे. ..
“ज्या शिक्षकांनी शासनाने दिलेल्या वाढीव मुदतीपूर्वी (३१ मार्च २०१९ च्या आत) TET परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना केवळ मूळ नियुक्तीच्या वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढून टाकणे अन्यायकारक आणि अवैध आहे....” असं सुप्रीम कोर्टने स्पष्ट केले आहे. .
तसेच न्यायालयाने स्पष्ट केले की. ...
1.RTE कायद्यानुसार शिक्षकांना योग्य पात्रता मिळवण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
2.त्या मुदतीचा लाभ घेऊन TET पास करणारे शिक्षक “पात्र” ठरतात.
3.त्यामुळे अशा शिक्षकांची नियुक्ती मागे घेणे किंवा त्यांना सेवेतून काढणे, हा कायद्याचा चुकीचा अर्थ लावण्यासारखा आहे.
4.न्यायालयाने सरकार आणि शिक्षण खात्यांना सांगितले की हे शिक्षक सेवा सुरू ठेवू शकतात.
यानिर्णया मुळे हजारो TET उतीर्ण पण प्रारंभी पात्रता नसलेले शिक्षक यांना मोठा दिलासा मिळणार..
राज्य सरकारांकडून पूर्वी झालेल्या सेवामुक्ती आदेशांना धक्का बसू शकतो…
शिक्षण खात्याने या निर्णयाचा पुनरावलोकन करून योग्य अंमलबजावणी करावी लागेल…
तसेच. ..हा निर्णय शिक्षकांसाठी न्याय restoring करणारा आणि शिक्षण व्यवस्थेतील स्थैर्य टिकवणारा आहे....
त्याचा मूलभूत संदेश असा आहे की ...
“पात्रता मिळवण्यासाठी दिलेल्या संधीचा योग्य वापर करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होऊ नये.”
citation - Uma Kant & Another vs Uttar Pradesh & Others (Appeal arising out of SLP (C) No. 22164 of 2024)
#SupremeCourtofIndia #teachers #TET