@anjali_damania बदली ही शिक्षा नाही. बडतर्फ करायला पाहिजे. मात्र तुम्ही सरकारचे भाट आहात. त्यामुळे तुम्ही अशी मागणी करणार नाही. सरकारच्या नावाने चांगभलं.
@iAditiTatkare केवायसीच्या नावाखाली तुम्ही लोकांना गंडवत आहात. हा नंबर लागत नाही. हा खोटेपणा तुम्हाला महागात पडणार आहे. लोक ग्रामीण भागात फिरू देणार नाहीत. एकदा मराठवाड्यात फिरा. मग कळेल तुम्हाला.
@IRCTCofficial
Irctc official application technical error. This is how problems are encountered while booking Tatkal tickets. Please sort out this problem.
@iAditiTatkare मा. मंत्री,
लाभधारक महिलांनी अगोदर ई-केवायसी केलेली आहे. त्यांना लाभही मिळत आहे. मग
वारंवार ई-केवायसी करण्याचा उद्देश काय? खरे लाभधारक वगळण्याचे हे कटकारस्थान आहे का? असे केल्याने मूळ लाभधारक योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ई-केवायसी झालेल्यांना यातून वगळा.
महाराष्ट्राचा सुपुत्र, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा गाढा अभ्यासक डॉ. रोहन चौधरी यांना जेएनयूच्या कुलगुरूंनी हुकूमशाही पद्धतीने निलंबित केले आहे. हा निर्णय विद्यापीठाच्या अधिनियम व कायद्याला धाब्यावर बसवून, वैयक्तिक आकसातून घेतलेला आहे. महाराष्ट्र आपल्या होतकरू प्राध्यापकावरचा हा अन्याय कधीही सहन करणार नाही. कुलगुरूंनी हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा महाराष्ट्राचा आवाज दिल्ली ऐकेल! #JusticeForDrRohanChaudhary
@PMOIndia@AmitShah@Dev_Fadnavis@RSSorg@AUThackeray@RajThackeray
छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली. याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत, तरीही पोलिस त्यांची दखल घेत नाहीत. या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, याबाबत सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा साहेब आणि अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील साहेब यांच्याशीही चर्चा केली.
यावेळी प्रशांतदादा जगताप, अंजलीताई आंबेडकर, सुजात जी आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सार्वजनिक वाहतुकीचा बोऱ्या वाजला आहे. रेल्वे असो की पीएमपीएमएल सर्वत्र सारखीच स्थिती आहे. कधी गाडीच बंद पडते तर कधी वाहतूक कोंडी होते. तिकीट दर दुप्पट केले पण सेवा शून्य टक्के.
#Pmpml#आळंदीतेमनपा#पुणे
‘ॲग्रोवन’च्या शाश्वत शेती परिषदेत सहभागी…
📍यशदा, पुणे
गेली दोन दशके शेतकऱ्यांचा मार्गदर्शक राहिलेल्या, सकाळ माझ्या समूहाच्या ‘ॲग्रोवन’ या कृषी दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘शाश्वत शेती परिषदे’त सहभाग घेत उद्घाटन सत्राला संबोधित केले. राज्याचे कृषिमंत्री मा.श्री. माणिकरावजी कोकाटे, सकाळ समूहाचे अध्यक्ष मा.श्री. प्रतापराव पवार सर, संपादक श्री. आदिनाथजी चव्हाण आदी यावेळेस व्यासपीठावर होते. यावेळी शेती क्षेत्रातील प्रयोगांबद्दल पद्मश्रीने सन्मान झालेले श्री. सुभाष शर्मा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शाश्वत शेती संदर्भात शेतकऱ्यांना योग्य दिशा मिळावी आणि मार्गदर्शन व्हावं, या उद्देशाने ‘ॲग्रोवन’च्या वतीने हे अतिशय स्तुत्य असे आयोजन करण्यात आले होते.
भारत हा कृषिप्रधान देश असताना २०१४ सालापर्यंत कृषी खात्याचे बजेट केवळ २१ हजार कोटींच्या आसपास होते. मात्र मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर हेच बजेट आता १ लाख ३७ हजार कोटींहून अधिक आहे. म्हणजेच यात तब्बल सहा पट वाढ करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या माध्यमातून २०१८ साली सुरू झालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आज देशातील शेतकऱ्यांना मोठा आधार देत आहे. शिवाय यात १३ कोटी शेतकरी जोडले गेले असून ३ लाख ६५ हजार कोटींहून अधिक निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आला आहे. शिवाय पिक विमा योजनेअंतर्गतही सरकारने मंजूर केलेली रक्कम पावणेदोन लाख कोटीपर्यंत आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना आधार देत असताना दुसरीकडे कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे ६० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवून सरकारचा अजेंडा शेतकरी केंद्रस्थानी असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
देशाचे गृह आणि सहकार मंत्री मा.श्री. अमितभाई शाह जी यांच्या नेतृत्वात सहकार विभागाच्या माध्यमातूनही क्रांतिकारी बदल घडवण्यात येत असून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना आणि एकूणच कृषी क्षेत्राला होत आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून सेवा संस्थांना मजबूत करण्याची मोहीम देशभर हाती घेतल्यामुळे त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
वाढते शहरीकरण आणि जागतिक हवामान बदलांमुळे शेतीवर होणारा परिणाम, तसेच शेतीमधील वाढत्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे माती, पाणी, मानवी आरोग्यासह पशुधनाचे आरोग्य धोक्यात आहे. यामुळे आता हवामान बदलाला सामोरे जाताना रासायनिक कीटकनाशकांचा बेसुमार वापर टाळत, शाश्वत शेतीकडे वळावे लागणार आहे. यासाठी केंद्र सरकार विशेष मोहिमा राबवत असून देशी बियाणांचे संवर्धन, सेंद्रिय शेतमाला प्रोत्साहन, रसायनमुक्त शेतीसाठीच्या विविध योजनांवर भर दिला जात आहे.
#ॲग्रोवन #Agrowon #शाश्वत #शेती #परिषद #पुणे #सहकार
आज विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. लवकरच प्रचाराची राळ उडायला सुरुवात होईल. या धामधुमीत सोयाबीन दराचा मुद्दा मागे पडेल. २०२४-२५ साठी हमीभाव प्रतिक्विंटल ४८९२ रुपये आहे. मात्र, राज्यात ४५०० हजारपर्यंतही दर मिळत नाही. हमीभाव केंद्रे अपुरी आहेत.
soyabean rate#
vidhansabha election#
पहिली गोष्ट ॲपमधील तिकिटाचा स्क्रीन शॉट काढता येत नाही. त्यामुळे हे ॲप बंद पडल्यावर प्रवाशांकडे तिकीट काढल्याचा काहीच पुरावा नसतो. त्यामुळे कंडक्टर परत तिकीट काढायला लावतात. दुसरी गोष्ट ही शुद्ध प्रवाशांची फसवणूक आहे. ऑनलाइनच्या नावाखाली लूट आहे. कृपया लक्ष देऊन हा प्रश्न सोडवा.
Your Apli PMPML application is shut down.
'आपली पीएमपीएमएल' हे ॲप बंद पडले आहे. यामध्ये तिकीट काढलेले आहे. मात्र आता ते some error occurred, please try later. असं म्हणत आहे. तिकिट काढलेलं असतानाही परत काढावे लागत आहे. हा मानसिक त्रास आहे. कृपया मदत करा.
Your Apli PMPML application is shut down.
'आपली पीएमपीएमएल' हे ॲप बंद पडले आहे. यामध्ये तिकीट काढलेले आहे. मात्र आता ते some error occurred, please try later. असं म्हणत आहे. तिकिट काढलेलं असतानाही परत काढावे लागत आहे. हा मानसिक त्रास आहे. कृपया मदत करा.