@Core_punekar तुम्ही हे जे काही लिहिले आहे ते अगदीच चूक नाही. परंतु याचबरोबर रेशन फुकट वाटणे, सामान्य जनतेला कोणत्यातरी शीर्षा अंतर्गत पैसे वाटणे, नैसर्गिक आपत्ती आली की पैसे वाटणे हे देखील बंद व्हायला हवे. आणि आता 2005 नंतर अंशदायी पेन्शन योजना लागू आहे त्यामुळे सरकारवर जास्त बोजा नाही.
या कॅप्टन सारखे अनेक भोंदू बाबा आपल्या आजूबाजूला आहेत. पण मला एक समजत नाही की सर्वसामान्य लोकांना या बाबांची गरज का बरं पडत असेल? बुवाबाजी हा सुद्धा एक व्यवसाय ठरावा यासारखे दुर्दैव काय ते दुसरे.
@Core_punekar बिलकुल सत्य वचन. भारतीय लोकांना विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांना आणि त्यातूनही विशेषतः मराठी माणसाला नोकरी खूप महत्त्वाची वाटते आणि व्यवसाय कनिष्ठ समजला जातो.