राजेश कुमार राजीनामा द्या! स्वर्गातून खाली या आणि राजीनामा द्या!
अरे काय हे? आंदोलन कुणासाठी करत हे सुद्धा माहिती नाही. हे महाशय प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे.
२ जागांपासून ते ३०३ पर्यंत... हा आकडा नाही ही एका विचाराची जिद्द आहे. एका कार्यकर्त्याचा घाम आहे. एका नेत्याची दूरदृष्टी आहे. आणि करोडो मतदारांचा विश्वास आहे.
२ जागांपासून ते ३०३ पर्यंत...
हा आकडा नाही ही एका विचाराची जिद्द आहे. एका कार्यकर्त्याचा घाम आहे. एका नेत्याची दूरदृष्टी आहे. आणि करोडो मतदारांचा विश्वास आहे.
भाजप टिकतो कारण तो घराण्यावर नाही, जातीवर नाही, पैशावर नाही विचारावर उभा आहे. आणि विचार कधी मरत नाही!!
#47YearsOfNationFirst
#४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची
#Glorious46Years_of_BJP
"जो टूट जाए वो दल नहीं, जो झुक जाए वो विचार नहीं।" या एका वाक्यात भाजपचा आत्मा आहे!!
वर्षानुवर्ष सामाजिक, राजकीय क���षेत्रात काम करून एक ओळख निर्माण होते एखाद्या दिवशी कोणीतरी उठून सोशल मिडियावर खोटे आरोप करत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांनी आता कायदेशीर कारवाईला तयार रहावे.
माननीय महसूल मंत्री @cbawankule जी यांच्या बाबत सुनियोजितरित्या खोटी व दिशाभूल करणारी माहिती सोशल मिडिया प्रसारित करून सगळ पचवून जाईल असा समज असणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. कामठी पोलिस ठाण्यात काल एक गुन्हा देखील दाखल झाला आहे.
सोशल मिडियावरील हा आक्षेपार्ह कंटेंट हटवण्यासंदर्भात तसेच संबंधित आरोपी यांच्या विरोधात स्वतः महसूल मंत्री यांनी 25 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहेत.
अभिव्���क्ती स्वातंत्र्याच्या नावाने रडू नका तुमची बाजू खरी असणार तर न्यायालयात या आणि कायदेशीर कारवाई ला सामोरे जा.
हा प्रवास सत्तेचा नाही, तर राष्ट्रनिर्माणाचा आहे!
संघर्ष, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या घामाने घडलेला भाजपा प्रवास..."वादळं आली, संकटं आली, पण ज्यांनी कधी झुकणं शिकलंच नाही, त्यांनीच इतिहास लिहिला… कारण त्यांना सत्ता नव्हे, तर राष्ट्र घडवायचं होतं!"
६ एप्रिल १९८० हा दिवस केवळ एका पक्षाच्या स्थापनेचा नव्हता, तर तो एका विचाराच्या पुनर्जन्माचा दिवस होता. जनसंघाच्या रूपात ज्याची बीजे रोवली गेली, त्याच विचाराने अनेक पराभव, उपेक्षा, अपमान आणि संघर्ष झेलत ‘भारतीय जनता पार्टी’ या नावाने पुन्हा उभं राहण्याचा ��िर्णय घेतला. त्या वेळी ना सत्ता होती, ना संसाधने होती, ना राजकीय पाठबळ पण एक गोष्ट होती अढळ विश्वास! आज, जेव्हा आपण भाजपा हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणतो, तेव्हा त्या मागे असलेला प्रवास समजून घेतला पाहिजे. हा प्रवास ‘एका रात्रीत’ झालेला नाही; हा प्रवास आहे हजारो कार्यकर्त्यांच्या झोपेच्या रात्रींचा, घामाच्या थेंबांचा आणि अनेक वेळा झालेल्या पराभवांचाही.
१९८४ च्या निवडणुकीत फक्त २ जागा! आजचा भाजपा पाहणाऱ्यांना हे ऐकून विश्वास बसणार नाही. पण, हीच ती सत्यकथा आहे, जी या पक्षाची खरी ताकद सांगते. जिथे इतर पक्ष दोन पराभवानंतर अस्तित्व गमावतात, तिथे भाजपा कार्यकर्त्यांनी पराभवाला शिकवण मानलं, अपमानाला प्रेरणा बनवलं आणि पुन्हा उभं राहण्याचा संकल्प केला. भाजपाचा खरा कणा म्हणजे त्याचा कार्यकर्ता. हा कार्यकर्ता टीव्हीवर दिसत नाही, तो मोठ्या मंचावर भाषण करत नाही… पण तो गावा��ावात, गल्लीबोळात, समाजाच्या प्रत्येक स्तरावर शांतपणे काम करत असतो. निवडणूक असो वा नसू दे, तो कायम सक्रिय असतो. कारण त्याच्यासाठी राजकारण म्हणजे ‘इव्हेंट’ नाही, तर ‘सेवा’ आहे.
भाजपाचा प्रवास हा नेहमीच सोपा नव्हता. या पक्षाने राजकीय बहिष्कार सहन केला, माध्यमांमध्ये बदनामी सहन केली, अनेक वेळा राजकीय ‘अस्पृश्यता’ वागणूकही सहन केली. पण या सगळ्यांवर मात करत हा पक्ष उभा राहिला. कारण, त्याच्या ���नात सत्तेची लालसा नव्हती, तर ध्येयाची जिद्द होती. भाजपाने कधीही शॉर्टकटचा मार्ग निवडला नाही. इतर पक्ष जिथे सत्तेसाठी तडजोड करतात, तिथे भाजपाने दीर्घकालीन संघटन उभारण्यावर भर दिला. प्रत्येक बूथवर कार्यकर्ता तयार करणे, समाजाच्या प्रत्येक घटकात पोहोचणे, लोकांशी थेट संवाद साधणे या पद्धतीने भाजपा हळूहळू लोकांच्या मनात रुजत गेला.
या प्रवासात अनेक मोठे टप्पे आले. राम जन्मभूमी आंदोलनाने ज��भाव��ा जागृत केल्या, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाने देशाला स्थैर्य दिलं, आणि पुढे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा राष्ट्रीय पातळीवर एका नव्या उंचीवर पोहोचला. पण या प्रत्येक टप्प्याच्या मागे एक गोष्ट कायम राहिली संघटनाची ताकद.
भाजपाने केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत, तर लोकांचा विश्वास जिंकला. कारण, हा पक्ष निवडणुकीच्या आधीच नाही, तर निवडणुकीनंतरही लोकांसोबत राहतो. आपत्ती अस���, संकट असो, महामारी असो भाजपा कार्यकर्ता नेहमीच पहिल्या रांगेत उभा असतो. हेच त्याचं वेगळेपण आहे.
आज भाजपा सत्तेत आहे… पण त्याची मानसिकता अजूनही संघर्षाचीच आहे. कारण, हा पक्ष विसरलेला नाही की तो कुठून आला आहे. २ जागांपासून सुरू झालेला प्रवास आज शेकडो जागांपर्यंत पोहोचला, पण त्या प्रत्येक यशामागे असंख्य कार्यकर्त्यांचे न दिसणारे त्याग आहेत. भाजपा हा ‘रेडीमेड’ पक्ष नाही…तो घडवला गेला आहे. विटा विटांनी, पाऊल पाऊलाने, संघर्षातून आणि संयमातून. म्हणूनच त्याचा पाया इतका मजबूत आहे. स्थापना दिनाच��या निमित्ताने हा केवळ उत्सव नाही… हा त्या प्रत्येक कार्यकर्त्याला सलाम करण्याचा दिवस आहे, ज्याने कधी नावासाठी काम केलं नाही, पण ध्येयासाठी आयुष्य झिजवलं.
" चिखलात उगवलेलं कमळ, वादळांनी कधी कोमेजलं नाही,
कारण त्याच्या मुळाशी संघर्ष आहे, आणि नसानसात वाहतंय राष्ट्रभक्तीचं पाणी…"
#47YearsOfNationFirst
#४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची #Glorious46Years_of_BJP
टिपू सपकाळ काल आमच्या जिल्ह्यात येऊन गेले म्हणे… पण त्याची दखल घ्यायला तरी कोणी तयार नाही—काँग्���ेसचे स्वतःचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना सिरियस घेत नाहीत, म्हणजे बाकीच्यांनी काय घ्यायचं!
@BJP4Maharashtra
टिपू सपकाळ काल आमच्या जिल्ह्यात येऊन गेले म्हणे… पण ���्याची दखल घ्यायला तरी कोणी तयार नाही—काँग्रेसचे स्वतःचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना सिरियस घेत नाहीत, म्हणजे बाकीच्यांनी काय घ्यायचं!
@BJP4Maharashtra
शेअर करा...
पेट्रोल , डिझेल मिळत नाही म्हणणाऱ्या फेसबुकवरील निर्बुद्ध विरोधकांनी हा व���हिडीओ जरूर बघावा..
आज , बीड जिल्ह्याच्या प्रवासात असताना पेट्रोल पंपावर काढलेला हा व्हिडिओ आहे. पेट्रोल , डिझेलची कोणतीही कमी नाही. नियमितपणे पेट्रोल डिझेल पेट्रोल पंपावर पुर���ठा होत आहे.
देशात पेट्रोल डिझेलची कोणतीही कमी नाही...
अफवांवर विश्वास ठेवू नका...
धाराशिव जिल्हा परिषदेवर प्रथमच भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवत ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर तसेच जिल्हा परिषद अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या सौ. अर्चनाताई पाटील यांची निवड झाल्याबद्दल आज मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. @RaviDadaChavan साहेब यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या विजयामागे प्रदेश नेतृत्वाचे योग्य मार्गदर्शन, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेचा भारतीय जनता पार्टीवर असलेला दृढ विश्वास यांचा मोठा वाटा आहे. आगामी काळातही विकासाची हीच गती कायम ठेवत धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी प्रदेश नेतृत्वाकडून पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीबाबत मार्गदर्शनही लाभले. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर ठाम राहून जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी श्री. मल्हार दादा पाटील, श्री. धनंजय सावंत, श्री. अभय चालुक्य, श्री. हर्षवर्धन चालुक्य, श्री. शहाजी पाटील आदी उपस्थित होते.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
#BJP #Dharashiv #ZP #BJP4Maharashtra