मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला आज भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत.
#MumbaiRains #MumbaiMonsoon #PublicSafety #BMC #MPLodha
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात स्टँडिंग कमिटी मधले अंडर स्टँडिंग आम्ही बंद केले आहे. यामुळे काहींना त्रास झाला आहे आणि ते मला टार्गेट करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून लक्ष भरकटवत आहेत.
– भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी
(2/2)
मुंबईकरांनी बघितले आहे, आम्ही घरात बसून नुसत्या पोस्ट लिहीत नाही, तर रस्त्यावर उतरून काम करतोय.
आत्ताच्या विरोधकांना ते सत्तेत असताना गेल्या २५ वर्षात जो मलिदा खाल्ला तो आता मिळत नाहीये...(1/2)
१९५६ पासून गणेशभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेला ‘खेतवाडीचा महाराजा’ हा मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहे. आज आमच्या महाराजाच्या रेखाचित्राचे अनावरण केले.
गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागलेली असताना बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक गणेशभक्त उत्सुक आहे. विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मंगलमयतेचा वास राहो, हीच प्रार्थना.
#खेतवाडीचा_महाराजा #KhetwadichaMaharaja
#गणेशोत्सव2026 #GaneshUtsav #MPLodha
गिरगावात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येबाबत आज BEST अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामांचा आढावा घेतला. नागरिकांना होणारा त्रास अजिबात मान्य नाही. कामात होणारा विलंब, समन्वयाचा अभाव आणि निष्काळजीपणा याबाबत संबंधितांना स्पष्ट शब्दांत जाब विचारला. तात्काळ तक्रारींचे निवारण करण्यासाठी गिरगाव गायवाडी येथे BEST ची बस तैनात करण्यात येणार आहे, जेणेकरून समस्या नोंदवणे आणि त्यावर कार्यवाही जलद होईल. तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन उपायांवरही भर दिला आहे लोड मॅनेजमेंट, नवीन सबस्टेशन्स आणि संपूर्ण गिरगावाचा सर्वे. गिरगावकरांना दिलासा मिळेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहणार.
#गिरगाव #Girgaon #BESTMumbai #MumbaiElectricity #CitizenFirst
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात @mybmc मध्ये भ्रष्टाचार विरहीत प्रशासन आणि सुशासनाचे 100 दिवस!
पारदर्शक निर्णय, विकासाला वेग आणि मुंबईकरांच्या पैशांची बचत!
#BMCCleanUpByDevaBhau
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर वेगाने प्रगती करत आहे. विशेषतः कौशल्य विकास आणि रोजगाराच्या क्षेत्रात राज्यातील तरुणांसाठी विविध धोरणे आणि उपयोजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.
या सर्व विषयांवर आज एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी माझे विचार मांडले.
ही संपूर्ण मुलाखत आपण खाली दिलेल्या लिंकद्वारे पाहू शकता.
#Maharashtra #SkillDevelopment
#Employment #YouthEmpowerment
https://t.co/GMOubM5XjI
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लीज लँड प्रणाली’चे लोकार्पण केले.
लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. मुंबई शहरातील भाडेपट्टीवर दिलेल्या शासकीय मालमत्तांच्या कामकाजासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.
#ELeaseLand #MaharashtraDay #MPLodha
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा मनापासून अभिमान आहे.
#FlagHoisting#MaharashtraDay#MaharashtraDin
आज भावन्स कॉलेज, मुंबई येथे मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित कामगारांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहिलो.
महाराष्ट्र स्थापना दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या डी विभागातील स्वच्छता कर्मचारी व कामगारांचा मनःपूर्वक सत्कार केला.
शहराच्या सेवेसाठी ते करत असलेल्या निःस्वार्थ योगदानाला मनःपूर्वक सलाम!
#MaharashtraDay #LabourDay #KamgarDin #Mumbai
जगातील सर्वात रुंद बोगदा आणि भारतातील सर्वात उंच केबल स्टेड पूल, मुंबई-पुणे Missing Link म्हणजे Inframan Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात अभियांत्रिकीची नवी उंची. १ मे रोजी महाराष्ट्राला मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे. #InfraMan