केंद्र सरकारच्या पर्यावरण,वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सेंट्रल एम्पॉवर्ड समिती सदस्यपदी कोल्हापूरचे सुपुत्र व महाराष्ट्राचे निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमयेजी यांची निवड झाल्याबद्दल ब्रँड कोल्हापूर तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग, सांस्कृतिक, संशोधन अशा विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या कोल्हापूरकरांना "ब्रँड कोल्हापूर" पुरस्क���राने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. यावर्षी हा सोहळा कोल्हापूरचे सुपुत्र व निवृत्त प्रधान मुख्य वनसरंक्षक श्री. सुनील लिमये जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल श्रीमती विजयमाला मेस्त्री यांना तसेच हॉकी खेळाच्या विकासासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल श��री. कुमार आगळगांवकर यांना ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग, सांस्कृतिक, संशोधन अशा विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर यश मिळविलेल्या 60 गौरवमूर्तींना ब्रँड कोल्हापूर पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच 6 गौरवमूर्तींचा विशेष सत्कार करण्यात आला.
सर्व गौरवमूर्तींचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
2020 साली ब्रँड कोल्हापूर म्हणून आम्ही स्वप्निलचा गौरव केला होता | 2022 मध्ये त्याला अर्जुन अवॉर्ड जाहीर झाले आहे | स्वप्निलच्या या यशाचा आम्हाला अभिमान वाटतो |
कोल्हापूरचा झेंडा सात��समुद्रापार नेण्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा !
@SwimSwapnil
#BrandKolhapur
#Brand_Kolhapur
आयर्नमॅन नगरी म्ह्णून जागतिक पातळीवर ओळख ���सणाऱ्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची हीच ओळख आणखी ठळक करणारी कामगिरी करणारे कोल्हापूर शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी स्पर्धा १३ तास २८ मिनिटामध्ये पूर्ण करून आयर्नमॅन हा किताब मिळविल्याबद्ल त्यांचे मनस्वी अभिनंदन!
खेलो इंडिया सारख्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोल्हापूराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सर्वच ���ेळाडूंचे मनापासून अभिनंदन. तसेच हे सर्वजण आपल्या खेळामध्ये अशीच उत्कृष्ट कामगिरी करत आपले, आपल्या गावाचे, कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मोठे करण्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा!
जून महिन्यामध्ये पंचकुला (हरियाणा) येथे पार पडलेल्या यंदा��्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आज #BrandKolhapur अंतर्गत त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता
त्यामुळे, या सर्वांचा आपल्या गावाच्या नावाने सन्मान केला पाहिजे असा विचार आला आणि त्यातून २०१८ साली सन्मान���य सतेज पाटील जी यांनी #BrandKolhapur हा उपक्रम सुरू झाला.
#Brand_Kolhapur
इंडोनेशिया येथील जकार्ता येथे होणाऱ्या आशियाई रग्बी सेव्हन एस या स्पर्धेसाठी आपल्या कोल्हापुरच्या वैष्णवी पाटील यांची भारतीय वरिष्ठ गट महिला संघामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
एशियन टेनिस फेडरेशनच्यावतीने इंग्लड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झाल्याबद्दल कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिचे आज तिच्या घरी जाऊन अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
हार्दिक अभिनंदन!
कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करत अशी कामगिरी करणारी कस्तुरी ही 'पहिली कोल्हापूरकर' बनली आहे. #Brand_Kolhapur@SavekarKasturi
अभिमानास्पद!
आपल्या कोल्हापूरची गिर्यारोहीका कस्तुरी सावेकर हिने ८०९१ मी. उंची असलेले अन्नपूर्णा शिखर सर करत ही कामगिरी करणारी जगातील सर्वात कमी वयाची महिला होण्याचा बहुम��न मिळवून कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. #BrandKolhapur
कस्तुरी आम्हाला तुझा अभिमान आहे!
एवढ्या लहान वयामध्ये जगभरातील सर्वोच्च शिखरे तू यशस्वीपणे सर करत आहेस. जगातील सर्वात उंच शिखर ��ाऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे तुझे स्वप्न लवकरत लवकर पूर्ण होवो या सदिच्छा!
#BrandKolhapur
हार्दिक अभिनंदन!
कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने ८०९१ मी. उंची असलेले अन्नपूर्णा शिखर सर करत मिळविला जगातील सर्वात कमी वयाची महिला होण्याचा बहुमान. #BrandKolhapur