आई अशी मी कोटी दिनांची नशिब माझ थोर ग
या घरट्यात पाजीन त्यांना ही मायेची धार ग
दुखीतांच शोषितांच शिरी वाहण्या बोझ
येणार बाई बरिस्टर साहब माझ
#त्यागमूर्ती_माता_रमाई
कुंकु भारी हे भाग्याच झाल आज धनवान
गड़ी पोत ही काळ्या मन्याचि भासे मौल्यवान
सांगू कस ग वाट अस ग हर्षदा दिलराज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ
#त्यागमूर्ती_माता_रमाई
आयुष्यभर कष्ट तुझ्या वाट्याला ,
तुझ्यामुळे फुलपन आम्हा वाट्याला,
कसे फेडु पांग कसे होवु उत्तराई ,
कोटी कोटी लेकराची तु आई !!!
माझी माता रमाई 😇🙏😇
#त्यागमूर्ती_माता_रमाई
गोड गोड ही काणी पडली सुमधुर ग वाणी
धन्य झाले मी ऐकून सारं त्या राज्याची राणी
साकार झाल फड़ाला आल सपान वैभव ताज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ
#त्यागमूर्ती_माता_रमाई