दुर्गराज रायगड सभोवतालचा असलेला परिसर अत्यंत संवेदनाशील असून यावर रायगडाचे अस्तित्व अवलंबून आहे. हा गड भारतीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहे. गेल्या काही महिन्यांपासून गडा पासून ५०० मीटरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे, मातीचे उत्खनन केले जात आहे.
महाराष्ट्र जिल्हा रायगड महाड ते दापोली रस्ता अत्यंत सुस्थिती त असतानाही पावसामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचे अपघात होतात आणि या कारणावरून रस्त्याला जेसीपी ने खड्डे पाडण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. सा.बा. विभागाचे अजब तंत्रज्ञान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर असलेल्या कुत्र्याचा चबुतरा हटवण्यास स्थानिक शिवभक्तांचा तीव्र विरोध आहे. कुत्र्याच्या चबुतरावरून करण्यात येत असलेल्या राजकारणाचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड मधील युवा शेतकरी दीपक अमराळे यांनी दासगाव मध्ये एका पडीक जमिनीतून सूर्यफुलाची भरघोस उत्पादन घेऊन कोकणातील शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श उभा केला आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन केले होते. या घटनेला ९७ वर्षे पूर्ण झाली असून मनुस्मृती दहन वर्धापन दिन महाडमध्ये २५ डिसेंबर २०२४ रोजी साजरा केला.
महाड. (जि.) -शिवसेना (शिंदे गट) विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांची महाड राष्ट्रातून विजय मिरवणूक काढण्यात आली. सलग चार वेळा आ. गोगावले या मतदारसंघातून निवडून आले.
नमस्कार मित्रांनो गेली 17 वर्ष एबीपी माझा बरोबर सुरू असलेला प्रवास आज थांबला. महिनाभरापुर्वीच विचारपुर्वक हा निर्णय घेतला होता. एका नव्या वाटेवर लवकरच पुन्हा भेटूया…
@nitin_gadkari
महाड, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. मुंबई गोवा महामार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या सावित्री पूलाची धोक्याची अवस्था.... त्वरित दुरुस्त करण्याची गरज आहे.
महान साहित्यिक,कलाकार, विचारवंत अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे पु.ल.देशपांडे यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.