भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून एक वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण करणारे मा. आमदार रवींद्रजी चव्हाण साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा!
या वर्षभरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण पोहोचलात या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधून एक घट्ट नाळ आपण पक्षाशी जुळवून घेतली, संघटनेला अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक भागात प्रत्येक घटकातील व्यक्तीस आपला वेळ देऊन पक्षाची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी सातत्याने आजही प्रयत्न करीत आहात, हा तुमच्या कार्यशैलीचा ठळक पैलू राहिला आहे.
आगामी काळातही आपल्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक वाटचाल अधिक बळकट होवो, महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळो आणि भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास अधिक दृढ होत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
@RaviDadaChavan
#RavindraChavan #BJP4Maharashtra #BJP #1YearComplete #snehadubepandit
आठवडा २ | दिवस ३
लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत, प्रत्येक मुद्द्यावर ठाम भूमिका घेत, वसईच्या विकासासाठी विधानसभेत आजचा आणखी एक दिवस.
Vidhan Bhavan | Week 2 | Day 3
Another day in the Assembly, raising the voice of the people, standing firm on every issue, and working towards the development of Vasai.
#day3 #assembly #monsoon #vasai #snehadubepandit
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईकजी यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे स्व. वसंतराव नाईक यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचा जयंती दिन 'कृषी दिन' म्हणून साजरा करताना, त्यांचे दूरगामी विचार आपल्याला शेतकरी कल्याणासाठी सदैव प्रेरणा देत राहतील.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषद सभापती प्रा.रामजी शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री आणि विविध आमदार उपस्थित होते.
📍१ जुलै २०२६, मुंबई
#वसंतरावनाईक #कृषीदिन #महाराष्ट्र #VasantraoNaik #Maharashtra #KrushiDin
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra@Prof_RamShinde@rahulnarwekar@RaviDadaChavan
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे (MSBTE) संचालक डॉ. प्रमोद नाईक यांच्याकडे आज तंत्रशिक्षण संचालनालय (DTE)चा अतिरिक्त कार्यभार सुपूर्द करण्यात आला.
डॉ. प्रमोद नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तसेच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली तंत्रशिक्षण संचालनालयाचे कामकाज अधिक गतिमान आणि विद्यार्थीभिमुख होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
📍३० जून २०२६, मुंबई
#DTE #MSBTE #HigherAndTechnicalEducation #Maharashtra
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
भावपूर्ण श्रद्धांजली..!
मराठी नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजयाजी मेहता यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी दिग्दर्शिका आणि निर्मात्या म्हणून जी पिढी घडवली, त्याचे ऋण मराठी संस्कृती कधीच विसरणार नाही. चित्रपट असो वा नाटक, त्यांची प्रत्येक कलाकृती म्हणजे अभ्यासाचा विषय होती. एका युगाचा अंत झाला असला, तरी त्यांनी दिलेला वारसा अनंत काळ जिवंत राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो.
ॐ शांती 🙏🏻
आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड होऊन आज यशस्वी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
गेल्या एका वर्षात आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे पक्ष संघटनेला नवी ऊर्जा आणि गती मिळाली. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दृढ करत संघटन विस्तारासाठी आणि पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी आपण घेतलेले परिश्रम निश्चितच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहेत.
आगामी काळातही आपल्या प्रभावी मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र अधिक बळकट होऊन नवे यश संपादन करेल, असा दृढ विश्वास आहे.
आपल्याला पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#भाजपा_महाराष्ट्र #प्रदेशाध्यक्ष #रवींद्र_चव्हाण #RavindraChavan
#BJPMaharashtra
@BJP4Maharashtra@RaviDadaChavan
भावपूर्ण श्रद्धांजली..!
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जालिंदरभाऊ कामठे त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. समाजकारणात आपल्या कर्तृत्वाने एक आदर्श निर्माण करणाऱ्या या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जालिंदरभाऊंनी आपल्या कार्यकाळात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. आपल्या साध्या, मनमिळावू स्वभावाने आणि लोकसेवेने त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि कामठे परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
ॐ शांती 🙏🏻
@BJP4Maharashtra@BJPForPuneCity
आठवडा २ | दिवस २
📍विधान भवन
वसईच्या प्रत्येक प्रश्नासाठी माझा आवाज सभागृहात ठामपणे घुमत राहील.
Week 2 | Day 2
Every day in the House is another opportunity to raise the voice of Vasai.
📚 शाळा हस्तांतरित झाल्या… पण निधीचा प्रश्न अजूनही कायम!
११६ शाळांचे भवितव्य आणि हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण अनिश्चित राहू नये, हीच आमची भूमिका.
Education cannot be compromised. This issue deserves immediate attention and action.
#education#school#nocompromise#vasai #snehadubepandit
विकासाची आश्वासने भरपूर… पण प्रत्यक्षात प्रश्न अजूनही कायम!
✅ वसईची ओळख असलेल्या बावखळांच्या संरक्षण आणि पुनर्स्थापनेसाठी निधी नाही.
✅ एमएमआरडीएकडून हजारो कोटींचा निधी उपलब्ध असूनही भूसंपादनातील दिरंगाईमुळे रस्ते आणि पुलांची कामे रखडली आहेत.
वसईकरांना कारणं नाहीत, तर ठोस कृती हवी आहे.
Promises are plenty, but where is the action?
✅ No funds are being allocated to protect and restore Vasai’s iconic salt pans and wetlands.
✅ Even with thousands of crores available from MMRDA, delays in land acquisition are stalling road and bridge projects.
The people of Vasai deserve solutions, not excuses.
Vasai Development Infrastructure Environment Action
#vasai #environment #mmrda #infra #snehadubepandit
निधी होता… पण काम थांबवलं गेलं!
🏥 आचोळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासनाकडून ₹२५० कोटींचा निधी मंजूर झाला, तरीही अनावश्यक विलंब आणि चुकीच्या प्रक्रियांमुळे नागरिकांना आजही दर्जेदार आरोग्यसेवेची प्रतीक्षा करावी लागत आहे.
वसईकरांचा हक्काचा रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण व्हावा, हीच ठाम मागणी! ✊
Funds were sanctioned. So why the delay?
🏥 Even after the Government sanctioned ₹250 crore for the Achole Multispeciality Hospital, unnecessary delays and flawed execution of the process have held back the project.
The people of Vasai deserve timely, quality healthcare not endless waiting. Raising this issue and demanding accountability until the hospital becomes a reality.
#Vasai #hospital #healthcareforall #publichealth #snehadubepandit
आरोग्यसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टर बांधव-भगिनींना राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले समर्पण, सेवाभाव आणि मानवतेप्रती असलेली निष्ठा समाजासाठी प्रेरणादायी आहे. निरोगी आणि सशक्त भारताच्या निर्मितीत आपले योगदान अमूल्य आहे.
#doctorsday #care #vasai #SnehaDubePandit
भारताचे माजी उपराष्ट्रपती, ज्येष्ठ राजकारणी मा. श्री. व्यंकय्या नायडू जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपण निरोगी, दीर्घायुषी राहून राष्ट्रसेवेचे कार्य असेच अखंडपणे करत राहावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@MVenkaiahNaidu#VenkaiahNaidu#happybirthday#snehadubepandit