नवनाथ बन हा पाकिस्तानच्या शाळेत नागरिकशास्त्र शिकून आला आहे, वाटतंय…!
भारताच्या नागरिकशास्त्रात शहराचा प्रथम नागरिक आणि प्रमुख महापौर असतो, तर राज्याचा प्रथम नागरिक आणि प्रमुख राज्यपाल असतो…
बहुदा रामभाऊ म्हाळगीमध्ये उशिरा प्रवेश झाल्याने नागरिकशास्त्र कच्चे राहिले आहे, वाटतंय या बनेल प्रवक्त्याचे!
भैय्या जनता पार्टीने या बनेलचा नीट अभ्यासवर्ग घ्यावा आणि मग ठाकरेंवर बोलायला पाठवावे…
पाठांतरी, कच्चा लिंबू, चतुरलिंगम…
बाकी भैय्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीने मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा गळा घोटणारा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची इतिहासात नोंद होईल ...
मराठी शिकण्यासाठी रिक्षाटॅक्सी चालक भैय्यांना अजून ४ महिने दिले म्हणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ... ढकलत ढकलत निवडणुकी पर्यंत मुदत देतील असं दिसतंय ...
दिल दिया है,जान भी देंगे ये 'भैय्या' तेरे लिये ... मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन गाणे असे असेल बहुदा मग ...
सत्तेत असलेली बाळासाहेबांच्या विचारांची शिंदे सेना गप्प आहे ... ?
" संस्कार" हे कोणी कोणावर करत नाही तर ते वेचायचे असतात ...
आपले हे वाक्य मनावर कायम कोरलेले आहे ...
आपल्याकडे पाहूनच राजकारणातले प्रत्येक पाऊल टाकत असतो ...
#गुरुपौर्णिमा#राजसाहेबठाकरे#अमितसाहेबठाकरे ♥️
संयुक्त मोर्चा!
विद्यार्थ्यांचा संताप केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी
रविवारी २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता
छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते सिद्धिविनायक मंदिर, मुंबई
“आम्हाला संविधानाने रस्त्यावर शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. आमच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. तरीही तुम्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेणार असाल, तर मीदेखील त्यांच्यासोबत गाडीत जाऊन बसेन.”
— सौ. शर्मिला राज ठाकरे यांनी सत्तेच्या मस्तीत वावरणाऱ्या व्यवस्थेला खडे बोल सुनावले.
लोकशाही लंगडी झाली आहे... आणि सत्तेचा माज बेभान झाला आहे...
ज्यांना मुलांच्या भविष्यासाठी निवडून दिलं तेच आज मुलांच्या भवितव्याचा प्रश्न विचारला म्हणून लाठ्या चालवत आहेत, बंदुका रोखत आहेत...
सांडलेल्या थेंबाचा हिशेब तर नक्की द्यावा लागणार कारण हा देश क्रांतीकारी लोकांचा आहे...
न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली पण कायदा मात्र आंधळा केला सत्ताधीशानी...
लाजा विकून खाणाऱ्या मोदी सरकारचा निषेध...
इन्कलाब जिंदाबाद...!!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राजसाहेब ठाकरे आज दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक यांची भेट घेणार होते. मात्र, सकाळीच सरकारकडून आंदोलन दडपण्याच्या कारवाईत सोनम वांगचुक यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर श्री. अमित ठाकरे यांनी जंतर-मंतर येथे भेट देत आंदोलनातील सहकारी अभिजित दीपके यांची भेट घेतली आणि घडलेल्या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली.
#MNSAdhikrut
प्रश्न जिथे जनतेचा ... मार्ग तिथे मनसेचा ...
श्रेया फिरके आणि त्यांच्या पालकांच्या सोबत मनसे ठामपणे उभी आहे ...
दोषींना शिक्षा होणार ...
आणि श्रेया च्या उपचाराचा संपूर्ण खर्च पालिका आणि कंत्राटदाराला द्यावा लागणार ...
मनसेचा दणका...
नवी मुंबई मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर मनपाच्या घंटागाडीच्या भरधाव व निष्काळजीपणा मुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या १८ वर्षीय तरुणी श्रेया फिरके यांच्या पालकांना आज 7 लाख 20 हजारचा चेक ( धनादेश ) मिळाला तसेच आतापर्यंत झालेला आणि यापुढे होणारा उपचार खर्चही कंत्राटदाराकडून देण्यात येईल असे मनपा उपायुक्त डॉ अजय गडदे यांचे आश्वासन ...