कोल्हापूरच्या लेकीची दैदिप्यमान कामगिरी, महाराष्ट्रात प्रथम येत PSI पदाला गवसणी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील जखनहट्टी या अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या प्रियांका शामल शांताराम पाटील या होतकरू तरुणीने आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम येत महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदाला गवसणी घातली आहे.
कोरोना काळात वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही खचून न जाता, प्रियांकाने अपार चिकाटीने स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आधार बनत अभ्यास व मेहनत सुरू ठेवली. अनेक अडचणींवर मात कर��� तिने महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधून यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून आज अधिकारी म्हणून स्थान मिळवले आहे.
तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला राज्यपातळीवर गौरव प्राप्त झाला आहे. प्रियांकाने केलेले कष्ट आणि अधिकारी होण्याची जिद्द आज फळाला आली असून तिचा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान आहे.
प्रियांका पाटील यांना पुढील उज्ज्वल कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#Congratulations #psi #maharashtrapolice #InspiringJourney #PrideOfKolhapur
जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून राज्य राखीव पोलीस बलाला ६ शासकीय वाहनांची भेट
राज्याचे पोलीस खाते हे सदैव जनतेच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असते. कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम आपले पोलीस अधिकारी व अंमलदार दिवसर���त्र करत असतात. विशेषतः बंदोबस्त, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती तसेच विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुके हे नागमोडी, घाटमाथ्याच्या दुर्गम भागात आहेत. अशा ठिकाणी पोलीस यंत्रणेला वेळेत पोहोचण्यासाठी जीप प्रकारातील छोटी, मजबूत व विश्वासार्ह वाहने अत्यावश्यक आहेत. ही बाब निदर्शनास येताच, जिल्ह्यातील राज्य राखीव पोलीस दलाची कार्यक्षमता वाढावी व त्यांचे काम अधिक सुलभ व्हावे, यादृष्टीने प्रयत्न सुरू केले.
जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून पोलीस बल गट क्रमांक १६ साठी ६१ लाख ७ हजार रुपये मंजूर करण्यात आले. या निधीतून राज्य राखीव पोलीस दलासाठी २ स्कॉर्पीओ व ४ बोलेरो अशा एकूण ६ शासकीय वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
ही वाहने पोलिसांच्या दैन��दिन कामकाजासाठी, विशेषतः दुर्गम भागातील बंदोबस्त, गस्त, आपत्कालीन मदत व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. पोलिस दलाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी असून, भविष्यातही पोलीस यंत्रणा अधिक सक्षम, आधुनिक व जनतेच्या सेवेसाठी सज्ज राहील.
याप्रसंगी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता व SRPF समादेशक डॉ. प्रशांत अमृतकर आणि पोलीस कर्मचारी उपस्थि��� होते.
२५ डिसेंबर २०२५ | 📍 कोल्हापूर
#Shivsena #prakashabitkar #policeinfrastructure #governmentvehicles #maharashtrapolice
कोल्हापूर जिल्ह्याची सुरक्षा होणार अधिक भक्कम!
जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) निधीतून राज्य राखीव पोलीस दलासाठी ६ नवीन शासकीय वाहने (२ स्कॉर्पिओ व ४ बोलेरो) समर्पित. दुर्गम भागातील बंदोबस्त, गस्त, आपत्कालीन मदतआणि कायदा सुव्यवस्था यासाठी वाहने ठरणार अत्यंत उपयुक्त.
🗓️ २५ डिसेंबर २०२५ l 📍 कोल्हापूर
#Shivsena #prakashabitkar #maharashtrapolice #PoliceForPeople #PublicSafety
पंचायत समि��ी भुदरगड, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत बचतगटांच्या अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटपाचा सोहळा उत्साहात पार पडला. स्वावलंबन, उद्यमशीलता आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतोय.
या सोहळ्यास जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर, भुदरगड गटविकास अधिकारी शेखर जाधव, भुदरगड पंचायत समितीच्या माजी सभापती कीर्ती देसाई, बाजार समिती सदस्य संदीप वरंडेकर, तालुका संघ संचालक मानसिंग पाटील, शरद सह सूत गिरण संचालक शहाजी देसाई, रामराव डेळेकर, कडगावचे सरपंच सुभाष सोनार, नितवडेच�� सरपंच सर्जेराव पाटील, सरपंच सुभाष चांदम, सारिका नांदेकर, धनंजय लाड, पाटील, एम. बी. टेलर, अजित देसाई, बाजीराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा हा प्रयत्न अधिक व्यापक व्हावा, अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. तसेच अशा योजनांमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, आत्मनिर्भरता आणि सामाजिक प्रगतीला निश्चितच गती मिळेल, ��सा विश्वासही व्यक्त केला.
🗓️ २६ डिसेंबर २०२५ l📍कडगाव ता.भुदरगड
#Shivsena #prakashabitkar #womenempowerment #InclusiveGrowth #GrassrootsDevelopment
जनसेवेच्या पाऊलखुणा आणि वारकऱ्यांच्या भक्तीचा मळा l
लोकहिताच्या पवित्र कार्याला लाभला श्रद्धेचा हा जिव्हाळ ll
विठू नामाच्या गजरात आणि वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने,विकासाची ही वारी अशीच अविरत सुरू राहो.
🗓️ २६ डिसेंबर २०२५ l 📍 राधानगरी ,कोल्हापूर
#Shivsena#prakashabitkar #warkari #spiritualjourney #CulturalHeritage
राधानगरीच्या विकासाला नवी दिशा देणारा बनाचीवाडी पाटबंधारे प्रकल्प!
राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करताना केवळ एक काम नव्हे, तर या परिसराच्या उज्ज्वल भविष्याचा एक आशेचा किरण डोळ्यांसमोर उभा राहिला. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर परिसरातील वाड्या-वस्त्या आणि गावांचे चि���्रच बदलणार असून, पाण्याअभावी संघर्ष करणाऱ्या घराघरात नवी उमेद निर्माण होणार आहे.
प्रकल्पग्रस्त बांधवांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि भावना अगदी जवळून समजून घेतल्या. तसेच विकासाच्या प्रवाहात समाजातील कोणताही घटक मागे राहणार नाही, याबाबत आश्र्वासित केले.
या भागातील प्रत्येक घरापर्यंत पाणी, समृद्धी आणि स्थैर्य प��होचावे, हे केवळ माझे स्वप्न नसून ध्येय आहे आणि त्या ध्येयाच्या पूर्ततेकडे टाकलेले, हे एक निर्णायक पाऊल आहे.
🗓️ २६ डिसेंबर २०२५ l📍 बनाचीवाडी, ता. राधानगरी
#Shivsena #prakashabitkar #minorirrigationproject #WaterForAll #InfrastructureDevelopment
निराधारांना आधारासाठी आता वाट पाहावी लागणार नाही!
निराधार व्यक्तींना जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये आणि त्यांनाही सन्मानाने जगता यावे, यासाठी सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजना, इ��दिरा गांधी योजना तसेच श्रावण बा�� योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
राधानगरी तालुक्यातील तहसील विभागामार्फत मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत मंजूर लाभार्थ्यांना नरतवडे येथे मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या १८८, इंदिरा गांधी योजनेच्या ७७ व श्रावण बाळ योजनेच्या १०३६ अशा एकूण १३०१ लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे देण्यात आली.
याप्र��ंगी राधानगरी प्रांत अधिकारी श्री. प्रसाद चौगुले, तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख, संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष श्री. अरुणराव जाधव, श्री. नंदकिशोर सूर्यवंशी, श्री. सुभाष पाटील, श्री. अजित देसाई, श्री. अशोक वारके, श्री. दादासो पाटील चंद्रे, श्री. रमेश घारे यांसह अनेक मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🗓️ २६ डिसेंबर २०२५ l📍नरतवडे, राधानगरी, कोल्हापूर
#Shivsena #prakashabitkar #WelfareSchemes #supportforneedy #GovernmentForPeople
विकास केवळ वर्तमानापुरता मर्यादित नसतो, तर येणाऱ्या कैक पिढ्यांच्या समृद्धीची बीजं रोवतो.
बनाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प राधानगरीच्या समृद्ध भविष्याचा पाया आहे आणि या ऐतिहासिक कार्यात योगदान देता आलं याचं मनापासून समाधान आहे!
🗓️ २६ डिसेंबर २०२५ l 📍बनाचीवाडी, ता. राधानगरी
#Shivsena #prakashabitkar #ruraldevelopment #WaterSecurity #SustainableGrowth