जगाला हेवा वाटेल असा महाराष���ट्र घडवण्याचा छंद आदरणीय श्री.राजसाहेबांचा आहे. सध्याच्या कलुशीत राजकीय व्यवस्थेत महाराष्ट्राला राज विचारांची गरज आहे.
#राजसाहेबठाकरे #छंदट्रेंड #महाराष्ट्र
पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक २०२९ ला होईल, पुढील पालिका निवडणूक साधारण २०३१ ला होईल.
येणाऱ्या चार पाच वर्षात महाराष्ट्राच मराठमोळ स्वरूप पुसण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील तेव्हा कुणीही खचून न जाता "गद्दारांच्या रखेल व्यवस्थे" विरोधात भक्कम उभे रहा !
लढाई संपलेली नाही...
"बस झाली आता भाजपची मुजोरी, मराठी माणसाला आणि मुंबईला हवी आता ठाकरेंची जोडी"
मुंबईचा महापौर हा ठाकरेंचा मराठी नगरसेवकच होणार!
मुंबई आपली आहे आपली आणि इथे आवाज ही आपलाच असणार!
#Marathi#Mumbai#Maharashtra#Thackeray
सदैव जनमानसात राहून जनतेच्या सेवेचा ध्यास बाळगून असणारे हिंदुत्ववादी लोकनेते आनंद दिघे यांचा आज स्मृतिदिन..
ठाणे जिल्ह्याला जागतिक पटलावर घेऊन जाणाऱ्या लोकप्रिय नेत्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏
मराठी रंगभूमीवर एकपात्री नाट्यप्रयोगांची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री 'सुहासिनी मुळगांवकर' यांचा आज स्मृतिदिन.
किर्लोस्कर लिखित #सौभद्र हे त्यांनी सादर केलेले एकपात्री नाटक.
गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
🔸निवडणूक आयोगाने आता आरोग्यसेवकांनाही निवडणुकीच्या कामात जुंपलं आहे, हे चुकीचं आहे. आरोग्यसेवकांनी रुग्णांची सेवा करत रहावी, तुम्हाला निवडणुकीच्या ���ामात कोण जुंपतं हेच मी पाहतो.
🔸अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, माझी भूमिका मी योग्यवेळी मांडेन. मग उगीच ��ाळत ठेवल्यासारखी माध्यमं का वागतात ? माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, आणि करावीच लागेल. मी आडपडदा ठेवून, आत एक बाहेर एक असं करणारा नेता नाही.
🔸काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... "अरे मूर्खांनो व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. ते सर्व बाजूला सारून मी महाराष्ट्र दौरा केला आणि माझा पक्ष उभा केला. कारण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही."
🔸तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका... मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तेच मी वाढवणार, त्याचं संगोपन करणार... मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत.
🔸माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा पेरल्या... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार. माझ्या पक्षाच्या चिन्हावर कोणतीही तडजोड करणार नाही. कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका.
🔸म्हणे 'ठाकरे' कधीच दिल्लीत गेले नाहीत. काहीजणांना राजकीय इतिहासचं माहित नसतो... स्व. बाळासाहेब १९८० साली दिल्लीत संजय गांधी आणि इंदिरा गांधी ह्यांना भेटायला गेले होते. नेत्यांना भेटणं, चर्चा करणं... ह्यात वावग��� काय ?
🔸मी अमित शहांना भेटल्यानंतर... २०१९ च्या 'लाव रे तो व्हिडीओ' लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. २०१४ ची निवडणुकीआधी मोदी पंतप्रधान नव्हते ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मी गुजरात पाहिलं आणि तिथल्या पत्रकारांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र अजूनही गुजरातच्या पुढे आहे. पण तेव्हा जे वातावरण उभं झालं होतं त्यात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी आश्वासक वाट�� होते. म्हणून ते पंतप्रधान व्हावेत असं म्हणणारा देशातील पहिला राजकीय नेता मीच होतो. त्याप्रमाणे देशानेही कौल दिला.
🔸नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांच्या राज्यकारभारात ज्या त्रुटी आढळल्या त्याकडे दुर्लक्ष केलं नाही त्यावरही सडकून टीका केली. पण जेव्हा ३७० कलम हटवलं गेलं तेव्हा अभिनंदनाचा ट्विटही सर्वप्राथच मीच केलं... ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात.
🔸एक गोष्ट स्पष्टच सांगतो... एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो... आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो.
🔸आज उद्धव ठाकरे , संजय राऊत नरेंद्र मोदींवर टीका करतात. कारण काय तर मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून. पण मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल��या नाहीत म���हणून विरोध केला, मला काही वैयक्तिक मिळालं नाही म्हणून नाही. मग उद्धव ठाकरे , संजय राऊतांना मोदींच्या भूमिका अजिबात पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता तेव्हाच माझ्याबरोबर मैदानात का नाही उतरलात. तेव्हा सत्तेचा मलिदा खात राहिलात.
🔸माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या... तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या.
🔸जगातला सर्वात तरुण देश आपला भारत देश आहे. पण आपला देश भलत्याच मुद्द्यांमध्ये भरकटला तर मात्र ह्या देशात अराजक येईल.
🔸आज निवडणुकीच्या जागावाटपाची जी हाणामारी सुरु आहे ती पाहता विधानसभेला सर्व पक्ष कोथळाच काढतील एकमेकांचा. ह्यासाठी निवडणुका असतात का?
🔸मतदारांनो माझं तुम्हाला आवाहन आहे कि, "राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल."
🔸��ाझा माझ्या सहकाऱ्यांवर, त्यांच्या क्षमतांवर पूर्�� विश्वास आहे. सर्वसामान्य घरातून येणाऱ्या ह्याच सहकाऱ्यांना घेऊन मला महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे.
🔸महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे.
🔸 माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधण�� करा, मतदारसंघ बांधा. मागे-पुढे पाहू नका आणि तुम्ही विधानसभेच्या जोरदार तयारीला लागा.
#मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally
संघर्षाच्या पुस्तकातील पाने देवाने लवकर संपवावी इतकीच देवाकडे प्रार्थना,१८ वर्ष कधी झालेत हे कळलंच नाही, पक्षाचा आज १८ वा वर्धापन दिन, महाराष्ट्रातील सर्व मनसे सैनिकांना शुभेच्छा.
मराठी नाट्यसृष्टीत, चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज कलावंत आहेत त्यांना मान-सन्मान द्या. आपुलकीचं संबोधन चार भिंतीत ठेवा पण सार्वजनिक मंचावर अदबीने वागा, एकमेकांच्या योगदानाचा आब राखा !
#राजठाकरे#मराठीनाटक#RajThackeray#MarathiTheatre
���ुस्तकांमुळे आपलं अस्तित्व कळतं, जिवंतपणाच महत्व, नवी दिशा, दृष्टीकोन मिळतो. वादळ, वारा, ऊन, पावसात पाय घट्ट रोवून उभं राहता येत.....!
जोपर्यंत आपण स्वतः वाचते होत नाही तोपर्यंत गुलामगिरी रक्तातून नाहीशी होत नसते.
वाघाचा बछडा हा वाघच असायला लागतो”
पण इकडे मुंबईत उलटंच आहे.
एकेकाळी मुंबईवर राज्य करणाऱ्या वाघाच्या मुलाला “टोमणाबाई,बायकी टोमणे,बायकी हावभाव” अशी नाव पडलीत…🤦🏻
कोण ते विचारू नका !!!
सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनी, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात, ते विचार समाजाला प्रेरित करत राहतात.
महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष ह्या भ��मीत होऊन गेले.
स्वराज्याची मुहूर्तमेढ ह्याच राज्यात झाली, स्त्रीशिक्षणासारखं पवित्र कार्य ह्याच राज्यात आकाराला आलं आणि शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान करणारा महामानव पण ह्याच भूमीतील.
हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्या सोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र असलेला हा फोटो.
तीन उत्तुंग कार्य करून गेलेली आ���ि एकेमकांबद्दल पराकोटीचा आदर असणारी ही माणसं. हा आपला महाराष्ट्र होता. ह्याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागला आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे.
ह्यातून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा तो म्हणजे देशाला आकार देणारं, स्वभान देणारं हे राज्य आहे ह्याचं भान गमावू नये.
उत्तर आणि दक्षिण अशा संस्कृतींना जोडणारा ��ांधा म्हणजे महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय तो वेळीच थांबवावा. कारण महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि आपण पण वाहवत गेलो तर हे फक्त राज्याचं नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल.
आजचा महापरिनिर्वाण दिन ह्यासाठी महत्वाचा आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून आपल्यातले सगळे भेद गाडून हा देश, हे राज्य पुन्हा एकसंध करण्यासाठी सगळ्यांनी श���थ घेण्याचा हा दिवस.
पुन्हा एकदा महामानवाच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन
राज ठाकरे
#babasahebambedkarar #MahaparinirvanDiwasnirvanDiwas #महापरिनिर्वाण_दिवस #Maharashtra
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे...
साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. 'अ'कार पीठ माहूर 'उ'कार पीठ तुळजापूर 'म'कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तशृंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत ��ाही म्हणून अर्धपीठ.
#दसरा
#नवरात्री२०२३