“बदलाव जरुरी है” रॅलीचे पोस्टर्स प्रकाशित.
१ सप्टेंबरला रामलीला मैदान, दिल्ली येथे भव्य आंदोलन. महागाई, बेरोजगारी, MSP, शिक्षण-आरोग्य, सामाजिक न्यायासह लोकशाही वाचवण्याची मागणी.
६-१५ ऑगस्ट दरम्यान देशभर पदयात्रा काढली जाणार. सहभागी व्हा!
#DelhiChalo#BadlaavZarooriHai#CPI
डी. राजा यांनी जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या अकार्यक्षमतेविरोधात विद्यार्थ्यांचा संघर्ष देशाच्या भविष्याचा प्रश्न असून केंद्र सरकारने तात्काळ राजीनामा मागणी मान्य करावी, अशी मागणी.
#StudentStruggle#D_Raja#CPI100
महायुती सरकारला पेपरफुटीबाबत काहीच गांभीर्य नाही का!
पेपर फुटल्यामुळे TET परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. शिक्षण व्यवस्थेत मोठे रॅकेट कार्यरत आहे व ते महायुती सरकारच्या पाठिंब्यानेच कार्यरत आहे. विद्यार्थी शिक्षकांच्या जीवाशी, करिअरशी आणि भविष्याशी चाललेला हा खेळ कधी बंद होणार?
राम मंदिर देणगी घोटाळा: कनिष्ठांना बळी देऊन वरिष्ठ वाचवणे म्हणजे श्रद्धेशी विश्वासघात. कॉम्प्रोमाईज्ड SIT नको, स्वतंत्र न्यायिक चौकशी हवी. मोदी-योगींनी जबाबदारी घ्यावी. कोट्यवधींची लूट कनिष्ठांच्या चौकशीने झाकता येणार नाही!
#RamMandirScam#जनतेसोबतफसवणूक
स्मार्ट मीटर ला विरोध का? जनतेने हा विरोध कसा नोंदवावा!?
जाहीर व्याख्यान:
वक्ते: कॉ कृष्णा भोयर(वीज कामगारांचे राष्ट्रीय नेते)
वक्ते: ॲड अभय टाकसाळ(भाकप नेते, संभाजीनगर)
अध्यक्ष: ॲड सुभाष लांडे (राज्य सचिव,भाकप)
दिनांक: 17 जून | वेळ सायं 7 वा
CPI maharastra फेसबुक पेज वरून live
आज दिल्लीत झालेल्या इंडिया (INDIA) आघाडीच्या बैठकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) प्रतिनिधित्व पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड डी. राजा आणि राष्ट्रीय सचिव तसेच खासदार कॉम्रेड पी. संतोष कुमार यांनी केले.
वसाहतवादविरोधी चळवळीचे प्रमुख प्रवर्तक, २० व्या शतकातील सर्वात प्रभावशाली कम्युनिस्ट नेत्यांपैकी एक, व्हिएतनामी क्रांतिकारी नेता कॉम्रेड हो ची मिन्ह यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! लाल सलाम !!
#HoChiMinh#Vietnam#Revolution#Guerilla#Comrade
भाकपचे माजी आमदार शहीद कॉम्रेड कृष्ण देसाई यांच्या पत्नी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या कॉम्रेड सरोजिनी कृष्णा देसाई यांना अखेरचा लाल सलाम! भावपूर्ण आदरांजली!!
#SarojiniDesai#KrushnaDesai#CPI100#आदरांजली#Comrade
बेरोजगार तरुणांची तुलना “झुरळांशी” करणारी भाषा देशाच्या सरन्यायाधीशांना शोभणारी नाही. लाखो तरुण बेरोजगारी आणि असुरक्षिततेचा सामना करत असताना हे वक्तव्य त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे.
रोजगारनिर्मितीतील अपयशाची जबाबदारी सरकारची आहे, तरुणांची नाही.
#Unemployment#Youth#CJI
NEET पेपर पुन्हा फुटणे हे केंद्र सरकार व परीक्षा यंत्रणेचं गंभीर अपयश आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि पालकांच्या संघर्षाशी ही क्रूर थट्टा आहे.
दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी मोफत प्रवास-निवास द्या, CPIची मागणी.
#NEET#CPI100#Education
पंतप्रधान मोदींनी काटकसरीचे उपदेश सामान्य जनतेला नव्हे, आधी आपल्या धनाढ्य मित्रांना, मंत्री, आमदार, खासदार आणि अंधभक्तांना द्यावेत. पेट्रोल, प्रवास, सोने, खाजगी वाहने यांचा अमर्याद उपभोग घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आधी स्वतःवर निर्बंध लावावेत!
#NarendraModiAppeal#CPI100#Petrol
भ्याड शाईफेकीतून विचार दडपणार नाहीत!
विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करून केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष तीव्र निषेध करीत आहे.. आता लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पुरोगामी विचारांवर हल्ला करणाऱ्या अशा प्रवृत्तींना जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे!
केरळ विधानसभा निवडणुकीत बहुमतांनी निवडून आलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विजयी आमदार कॉम्रेड गोविंदम पल्लिकाप्पिल, मुहम्मद मुहसीन, के. राजन, गीता गोपी, के.के. वलसराज, पी. प्रसाद, सी. अजय प्रसाद, जी. आर. अनिल यांचे हार्दिक अभिनंदन!
#Keralam#ElectionResults#CPI100#Comrade#India