अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सु��य विखे पाटील, माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यासह उपस्थित सहकाऱ्यांसोबत राजकीय आणि विविध सामाजिक विषयांवर औपचारिक गप्पा मारल्या.
@RVikhePatil @drsujayvikhe @sangrambhaiya
जगाला सत्य, अहिंसेचं महत्त्व पटवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज, दिल्ली येथील त्यांच्या राजघाट समाधीस्थळी जाऊन पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
“मी थांबलो नाही, थांबणार नाही!”
आज शारदा प्रांगण, बारामती येथे विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आणि मा.श्री. अजित���ादा पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पद भुषवल्याबद्दल समस्त बारामतीकरांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी दादांनी सर्वांशी आपुलकीने मनमोकळा संवाद साधला, समस्त बारामतीकरांच्या प्रेम आणि आशीर्वादासाठी त्यांचे मनापासून आभार मानले. आजपर्यंतच्या ७ टर्ममध्ये ज्या वेगाने विकासकामे झाली, त्याहून अधिक वेगाने येत्या काळात विकासकामे बारामतीसह राज���यभरात करून दाखवेन, असा विश्वास दादांनी दिला.
या भव्य नागरी सत्कार सोहळ्याप्र��ंगी राज्यसभा खासदार मा. सुनेत्राताई पवार, आमदार श्री. अमोल मिटकरी यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks @SunetraA_Pawar @amolmitkari22
।। ॐ महालक्ष्म्यै नमो नमः ।।
आज कोल्हापूर येथे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले, आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झालो. हे नववर्ष सर्वांसाठी सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावो अशी प्रार्थना केली.
आज बारामतीतील कन्हेरी वन उद्यानाच���या कामाची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती जाणून घेत, कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार आणि राज्यसभा खासदार सौ. सुन��त्राताई पवार समवेत भेट घेतली. यावेळी मा. मोदी साहेबांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या अभूतपूर्व यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
@NarendraModi @AjitPawarSpeaks
@SunetraA_Pawar
आज बारामती येथे आयोजित ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ (पर्व २) चा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमात, खासदार श्रीमती सुनेत्रा पवार आणि लहानथोर बारामतीकरांच्या उपस्��ित मॅरेथॉन मोठ्या जल्लोषात सुरू झाली.
@AjitPawarSpeaks @SunetraA_Pawar
नागपूर येथील राजभवन परिसरात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात आणि थाटात पार पडला. यावेळी राज्याचे महामहिम राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडण���ीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे तसेच महायुतीतील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि महायुतीतील अन्य मित्र पक्षांच्या नवनिर्वाचित मंत्री महोदयांना मंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले आणि आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
@CPRGuv @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नवनिर्वाचित कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदावर नियुक्त झालेल्या मंत्री महोदयांचे हार्दिक अभिनंदन!
@mahancpspeaks#NCP#Maharashtra
Sticking my neck out to make a personal prediction for #MaharashtraAssemblyElection 2024:
Ajit Pawar’s victory in Baramati this election will be one for the history books.