आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 28 जून 2026
पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी
https://t.co/vCRMLwHM7E
दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतूक वेगवान होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी
https://t.co/QJQqP0Tqbv
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपली जमीन, आपले हक्क’ या कॉमिकचे प्रकाशन
https://t.co/hrKUrJfvsg
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis
Palghar is becoming Maharashtra's next growth engine. This district is not just a part of Maharashtra's growth story. It is the chapter that will define it.
Under the visionary leadership of Hon. PM Shri Narendra Modi Ji, projects that once seemed distant possibilities are today taking concrete shape.
Reviewed key aspects of the proposed Vadhavan Port at Chinchani Beach, including internal road network, forest clearances, power supply, rail connectivity, land acquisition, water supply, skill development and compensation for fishermen. Spread over 1,448 hectares with an estimated cost of ₹76,220 crore, this greenfield port will handle next-generation vessels with a 20-metre deep draft, making it capable of berthing the world's largest ships, something no Indian port can offer today. At three times the capacity of JNPA, it will rank among the world's top 10 ports and is expected to generate 10 lakh jobs.
What matters equally to me is how we build this. Through open dialogue, fair rehabilitation, ITI upgradation, skill training and a dedicated fisheries institute, we are committed to ensuring that the people of this land, our tribal communities, our fishermen, our youth, are not just witnesses to this progress but its primary beneficiaries.
Also inspected the ongoing construction work and reviewed the project layout of the Boisar Station under the Mumbai-Ahmedabad Bullet Train Project. Work is progressing well and officials have been instructed to maintain pace and quality within the decided timelines. Once operational, Boisar will connect to BKC in under thirty minutes, opening up this entire region economically. This is a project that will genuinely change the character of Palghar.
Also reviewed the site of the proposed offshore Airport in Palghar district, which is going to be India's first offshore airport. This project adds a critical third dimension to this connectivity picture. Situated in proximity to the Dedicated Freight Corridor, the Bullet Train, the Uttan-Virar Sea Link, the Mumbai-Vadodara Expressway and the Mumbai-Ahmedabad National Highway, it will significantly improve connectivity while easing the growing passenger load on Mumbai Airport. The pre-feasibility report has confirmed the site as viable and the DPR has been ordered today.
Also discussed the MMRDA-developed Narangi Creek Bridge, a ₹850 crore, 4.10 km project that will directly connect Vasai-Virar with Saphale, Palghar and Boisar, reducing travel distance by nearly 40 km and travel time by around 45 minutes. Also held detailed discussions on the Uttan-Virar Sea Link, a proposed six-lane project worth approximately ₹58,754 crore that once complete will directly connect to the Mumbai-Ahmedabad National Highway, making travel between South Mumbai and Ahmedabad faster, safer and more convenient.
Inspected the construction and reviewed progress on the Vadodara-Mumbai section of the Delhi-Mumbai Expressway, one of India's most ambitious infrastructure undertakings. A defining feature of this 8-lane greenfield corridor is its direct connectivity to JNPA, enabling faster, more efficient and cost-effective freight movement from North India and giving a major boost to the country's logistics chain. It will also offer a reliable alternative to the congested Thane-Bhiwandi-Ghodbunder routes, with travel time between Vadodara and Mumbai set to reduce from 8 hours to approximately 4 once complete.
Vadhavan Port, Bullet Train, Offshore Airport, Delhi-Mumbai Expressway, Uttan-Virar Sea Link, Narangi Creek Bridge, Virar-Alibaug Corridor. Each project is significant on its own. Together, they are building the Fourth Mumbai, a new economic centre of gravity rising in Palghar, under the visionary leadership of Hon PM Shri Narendra Modi Ji and the resolve of a government that has cleared decades of stalled decisions.
Palghar is emerging as a major growth engine for Maharashtra, opening new opportunities in ports, transport, industry, exports and employment.This is the Maharashtra we are building, and Palghar is leading the way.
Minister Ganesh Naik ji, Minister Nitesh Rane, MP Dr Hemant Savara, MLA Rajendra Gavit and senior officials were present.
🙏 जय महाराष्ट्र
@NaikSpeaks@NiteshNRane@drhemantsavara@rajendra1gavit
#Maharashtra #Palghar #InfrastructureDevelopment
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी गती; पालघरमधील मेगा प्रोजेक्ट्स ठरणार मैलाचा दगड!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेत पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, देशातील पहिले प्रस्तावित ऑफशोअर विमानतळ जागा, मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावरील मुंबई-वडोदरा इंटर जंक्शनची पाहणी करून उत्तन–विरार सागरी सेतू व नारिंगी खाडी पूल प्रकल्पाबाबतही सविस्तर चर्चा केली व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोईसर स्थानकाच्या निर्माणाधीन कामांची आणि प्रकल्प आराखड्याची पाहणी केली. कामाचा वेग, दर्जा आणि नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिंचणी येथील समुद्रकिनाऱ्यावर प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाची पाहणी करताना अंतर्गत रस्त्यांचे जाळे, वन मंजुरी, वीजपुरवठा, रेल्वे कनेक्टिव्हिटी, भूसंपादन, पाणीपुरवठा, कौशल्य विकास तसेच मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसंदर्भातील कामांचा सविस्तर आढावा घेतला. सुमारे ₹76,220 कोटींच्या खर्चाच्या या ग्रीनफिल्ड बंदराची उभारणी 1448 हेक्टर क्षेत्रावर होणार असून पुढील 60 महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अत्याधुनिक ‘नेक्स्ट जनरेशन’ जहाजे हाताळण्याची क्षमता असलेले हे बंदर भारतातील सर्वात मोठ्या खोल समुद्री बंदरांपैकी एक ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी देशातील पहिल्या प्रस्तावित ऑफशोअर विमानतळाच्या जागेचीही पाहणी केली. या विमानतळाला डीएफसी (Dedicated Freight Corridor), बुलेट ट्रेन, उत्तन–विरार सी-लिंक, मुंबई–वडोदरा द्रुतगती मार्ग आणि मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची जोडणी (connectivity) राहणार आहे. यामुळे वाढवण व मुरबे बंदरांमधील मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. तसेच मुंबई विमानतळावरील वाढता प्रवासी ताण कमी करण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी एमएमआरडीए मार्फत उभारण्यात येणाऱ्या नारिंगी खाडी पुलाच्या कामाचाही आढावा घेतला. सुमारे ₹850 कोटी खर्चाच्या या 4.10 किलोमीटर लांबीच्या आणि 12 मीटर रुंदीच्या पुलामुळे वसई-विरारचा सफाळे, पालघर आणि बोईसर या शहरांशी थेट संपर्क प्रस्थापित होणार असून प्रवासाचे अंतर सुमारे 40 किलोमीटरने आणि वेळ 45 मिनिटांनी कमी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तन–विरार सागरी सेतू प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चासुद्धा केली. सुमारे ₹58,754.51 कोटी खर्चाच्या या सहापदरी सागरी सेतूला चारपदरी जोडरस्ते आणि दोन्ही बाजूंना आपत्कालीन मार्गिका प्रस्तावित आहेत. या सेतूची थेट जोडणी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी होणार असल्याने दक्षिण मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावरील मुंबई-वडोदरा इंटर जंक्शनची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या मुंबई-वडोदरा इंटर जंक्शनची पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासह दर्जेदार कामांवर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. भारत सरकारमार्फत सुमारे ₹1 लाख कोटी खर्चून उभारण्यात येणारा सुमारे 1400 किलोमीटर लांबीचा, 8-पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 5 राज्यांना जोडणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात वेगवान होणार असून देशातील प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA)शी असलेली थेट जोडणी. त्यामुळे उत्तर भारतातून जेएनपीएपर्यंत मालवाहतूक अधिक जलद, कार्यक्षम आणि कमी खर्चात होणार असून देशाच्या लॉजिस्टिक साखळीला मोठी बळकटी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील वडोदरा-मुंबई विभाग 157 किलोमीटर लांबीचा असून, त्यासाठी सुमारे ₹24,000 कोटी खर्च करण्यात येत आहे. 7 बांधकाम पॅकेजमध्ये विकसित होणाऱ्या या विभागातील 5 पॅकेजचे काम पूर्ण झाले असून ते वाहतुकीसाठी सज्ज आहेत, तर उर्वरित 2 पॅकेज ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्रातील हा संपूर्ण मार्ग 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
हा मार्ग सुरू झाल्यानंतर वडोदरा ते मुंबई प्रवासाचा कालावधी 8 तासांवरून सुमारे 4 तासांपर्यंत कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांना वेगवान, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार असून व्यावसायिक वाहतुकीलाही मोठी चालना मिळेल. जेएनपीएकडे जाणाऱ्या मालवाहतुकीची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. सध्या ठाणे, भिवंडी आणि घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे होणारा वेळ व इंधनाचा अपव्यय कमी होऊन मालवाहतुकीसाठी अधिक जलद आणि विश्वासार्ह पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
उत्तर आणि पश्चिम भारतातील औद्योगिक क्षेत्रांना मुंबईच्या बंदर व्यवस्थेशी अधिक सक्षम जोडणी मिळाल्याने निर्यात, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच हा प्रकल्प देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना अधिक वेगवान व आधुनिक द्रुतगती मार्गाने जोडणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, भारताच्या पायाभूत सुविधा विकास आणि आर्थिक प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणारा ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
राज्यातील बंदर, वाहतूक, उद्योग, निर्यात आणि रोजगारवाढीच्या दृष्टीने हे सर्व प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरणार आहेत .
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार स्नेहा दुबे पंडित व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@NiteshNRane@drhemantsavara@rajendra1gavit@snehadubepandit
#Maharashtra #DevendraFadnavis #Palghar #InfrastructureDevelopment
Global Honour for India’s Green Visionary
Heartiest congratulations to Hon PM Narendra Modi Ji on being conferred with the ‘Guardian of the Blue Horizon’, Seychelles’ highest honour, recognising his visionary leadership in environmental conservation and sustainable development.
This award is a testament to India's efforts to building a greener and more sustainable planet through various initiatives like Mission LiFE, the International Solar Alliance, the Coalition for Disaster Resilient Infrastructure and other forward-looking policies.
This honour further reinforces Hon PM Modi Ji's global leadership in climate action and sustainable development, adding to a distinguished list of international recognitions, including the FAO's Agricola Medal (2026), the Seoul Peace Prize, and the United Nations' prestigious 'Champions of the Earth' Award in 2018.
@narendramodi@StateHouseSey
#GuardianOfTheBlueHorizon #GreenGrowth #Sustainability
आदिवासी व मच्छिमार बांधवांना सोबत घेऊनच पालघर जिल्ह्याचा विकास करणार.
आदिवासी और मछुआरे भाई-बहनों को साथ लेकर ही पालघर जिले का विकास करेंगे।
(पालघर | 28-6-2026)
#Maharashtra#Palghar
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे 'ग्रोथ इंजिन' ठरणाऱ्या पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची पाहणी...
महाराष्ट्र की अर्थव्यवस्था का 'ग्रोथ इंजन' बनने जा रहे पालघर जिले की विभिन्न परियोजनाओं का निरीक्षण...
(पालघर | 28-6-2026)
#Maharashtra#Palghar#GrowthEngine
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरार, पालघर येथे मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावरील मुंबई-वडोदरा इंटर जंक्शनची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तन–विरार सागरी सेतू प्रकल्पाबाबतही सविस्तर चर्चा केली.
या उत्तन–विरार सागरी सेतूची वैशिष्ट्ये :
✅ सुमारे ₹58,754.51 कोटींच्या या सहापदरी सागरी सेतूला चारपदरी जोडरस्ते आणि दोन्ही बाजूंना आपत्कालीन मार्गिका प्रस्तावित आहेत
✅ या सेतूची थेट जोडणी मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी होणार असल्याने दक्षिण मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे
मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावरील मुंबई-वडोदरा इंटर जंक्शनची वैशिष्ट्ये :
✅ महाराष्ट्रातील मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावरील मुंबई-वडोदरा विभाग 157 किमी लांबीचा असून त्यासाठी सुमारे ₹24,000 कोटी खर्च करण्यात येणार
✅ या विभागातील 7 पैकी 5 बांधकाम पॅकेजचे काम पूर्ण
✅ मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई-वडोदरा प्रवासाचा कालावधी 8 तासांवरून सुमारे 4 तासांपर्यंत कमी होणार
✅ ठाणे, भिवंडी आणि घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी होऊन वेळ व इंधनाची बचत होणार
✅ जेएनपीएकडे जाणारी मालवाहतूक अधिक जलद व विश्वासार्ह होऊन लॉजिस्टिक्स क्षेत्राची कार्यक्षमता वाढणार
✅ उत्तर व पश्चिम भारतातील औद्योगिक क्षेत्रांना मुंबईच्या बंदर व्यवस्थेशी सक्षम जोडणी मिळाल्याने निर्यात, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार स्नेहा दुबे पंडित व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@NiteshNRane@drhemantsavara@rajendra1gavit@snehadubepandit
#Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment
पालघर येथील देशातील पहिल्या प्रस्तावित ऑफशोअर विमानतळाच्या जागेची व आराखड्याची पाहणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याप्रसंगी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले.
या विमानतळाची प्रमुख वैशिष्टे -
✅ या विमानतळाला डीएफसी (Dedicated Freight Corridor), बुलेट ट्रेन, उत्तन–विरार सी-लिंक, मुंबई–वडोदरा द्रुतगती मार्ग आणि मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची जोडणी (connectivity) राहणार आहे.
✅यामुळे वाढवण व मुरबे बंदरांमधील मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे
✅मुंबई विमानतळावरील वाढता प्रवासी ताण कमी करण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@NiteshNRane@drhemantsavara
#Maharashtra #DevendraFadnavis #AirportDevelopment
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तारापूर, पालघर येथे 'आपली जमीन, आपले हक्क' या कॉमिकचे प्रकाशन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबांसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावत वैयक्तिक व सामूहिक वनहक्क (वनपट्टा) तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून हातभार लावावा, यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे व प्रशिक्षित करणे हा या कॉमिकचा मुख्य हेतू आहे. यामुळे कायदेशीर नोंदी अद्ययावत करून आदिवासी समुदाय अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@NiteshNRane@drhemantsavara@rajendra1gavit
#Maharashtra #DevendraFadnavis #Palghar
शिखरापलीकडची झेप!
'नॅशनल इंटरस्टेट सीनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मधील मेन्स हाय जंप प्रकारात महाराष्ट्राचा सुपुत्र सर्वेश कुशारे याने 2.31 मीटर उंच उडी मारत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने ही अभूतपूर्व कामगिरी साध्य केली. त्याच्या या कर्तृत्वाचा महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला अभिमान आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याने 'एशियन गेम्स 2026' साठी भारतीय संघात आपले स्थानही निश्चित केले आहे.
या देदीप्यमान यशाबद्दल सर्वेश कुशारे याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#Maharashtra #NationalRecord #AsianGames2026
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding various infrastructure development projects in Palghar.
Minister Ganesh Naik, Minister Nitesh Rane, MP Dr. Hemant Savra, MLA Rajendra Gavit and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघरमधील विविध पायाभूत विकास प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक.
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में पालघर के विभिन्न बुनियादी विकास परियोजनाओं के संदर्भ में समीक्षा बैठक।
इस अवसर पर मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, सांसद डॉ. हेमंत सवरा, विधायक राजेंद्र गावित एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑 2.10pm | 28-6-2026📍Tarapur, Palghar | दु. २.१० वा. | २८-६-२०२६📍तारापूर, पालघर.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@NiteshNRane@drhemantsavara@rajendra1gavit
#Maharashtra #DevendraFadnavis #Palghar #InfrastructureDevelopment
Proud Moment for Bharat!
Hon PM Narendra Modi Ji conferred with Seychelles’ Highest Civilian Award! 🇮🇳 🇸🇨
Heartiest congratulations to Hon PM Narendra Modi Ji on being conferred Seychelles’ prestigious ‘Guardian of the Blue Horizon’ award. This distinguished honour reflects his growing global influence, visionary leadership in sustainability and commitment to environmental conservation.
The award marks Hon PM Modi Ji's 4th international environmental honour, reaffirming India’s rising global stature in green development.
@narendramodi@StateHouseSey
#GuardianOfTheBlueHorizon #GreenGrowth #Sustainability
The love and trust of the people of Maharashtra is my greatest motivation. It inspires me to serve with greater dedication every single day.
Grateful for your constant support.
#CommittedToServe
डहाणू आणि परिसरात डीटीईपीएच्या निर्बंधांमध्ये विकासासाठी आवश्यक तेवढीच शिथिलता...
डहाणू और आसपास के क्षेत्र में डीटीईपीए के प्रतिबंधों में विकास के लिए आवश्यकतानुसार ही शिथिलता...
( पालघर | 28-6-2026)
#Maharashtra#Palghar#VadhavanPort
लोकांचे हित विकासातूनच होणार आहे, त्यामुळे माझे संपूर्ण लक्ष विकासावर आहे.
लोगों का हित केवल विकास से ही सुनिश्चित होगा, इसलिए मेरा पूरा ध्यान विकास पर है।
( पालघर | 28-6-2026)
#Maharashtra#Palghar#VadhavanPort