विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न केवळ आश्वास��ांवर सोडून चालणार नाहीत. MPSC परीक्षांतील पारदर्शकता, रखडलेल्या भरती प्रक्रिया, रिक्त सरकारी पदे, वसतिगृहांची अवस्था, शिक्षणाचा वाढता खर्च आणि DBT संदर्भातील तक्रारी यावर सरकारने ठोस आणि वेळबद्ध निर्णय घ्या��ला हवेत.
स्पर्धा परीक्षांची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या हजारो तरुणांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यांच्या मागण्या ऐकून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि परीक्षा व भरती व्यवस्थेवरील विश्वास मजबूत करणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष कृती आणि न्याय मिळायला हवा.
The Congress President, Shri Mallikarjun Kharge, has approved the following persons as party candidates for the ensuing biennial elections to the Graduates' & Teachers' Constituencies of Bihar Legislative Council, as mentioned below:
विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांनी नुकतीच महाराष्ट्रातील छोटे कंत्राटदारांच्या एका शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
शिष्टमंडळाने सांगितले ��ी, त्यां��ी पायाभूत सुविधा विकासाची कामे पूर्ण केली आहेत; मात्र सरकार त्यांचे देयक अदा करत नसल्यामुळे अनेक छोटे कंत्राटदार गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, नियमांमध्ये फेरफार करून मोठ्या कंत्राटदारांना फायदा करून दिला जात आहे, तर छोटे कंत्राटदार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली हजारो कुटुंबे संघर्ष करत आहेत.
यावेळी राहुल गांधी यांनी शिष्टमंडळाला विश्वास दिला की, तुमच्या हक्काचा आवाज आम्ही बुलंद करू आणि न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढू.