��ाजप म्हणजे पत्त्यांचा उलटा बंगला आहे. या बंगल्यातील खालचा पत्ता *नरेंद्र मोदींचा* आहे. तो एकदा काही सटकला की सगळं कोसळेल.
- मा.श्री.राजसाहेब ठाकरे 💪🔥🚂🚩
.
.
.
.
.
#rajthackeray #narendramodi #bjp #mns #DigitalManse
ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं निधन झालं. विजयाबाई जवळपास ७० वर्ष तर नक्कीच रंगभूमीवर कार्यरत होत्या. कदाचित गेली काही वर्ष किंवा एखादं दशक असं असेल की त्या कदाचित फारशा सक्रीय नसतील, पण विजयाबाईंसारख्या व्यक्ती���्या असण्याने सुद्धा अनेक माणसं प्रेरणा घेऊन, प्रयोग करत राहतात, त्यामुळे त्यांच्यासारख्यांचं असणं महत्वाचं. जेंव्हा आसपास खुज्यांची खोगीरभरती सुरु आहे असं वाटत असतं तेंव्हा विजयाबाईंसारखी माणसंसुद्धा आहेत हे देखील त्या क्षेत्रातील माणसाला दिलासादायक असतं.
माझी विजयाबाईंच्या बाबतीतील पहिली आठवण १९८८ च्या आसपासची. माझ्या आणि शर्मिलाच्या साखरपुड्यात अर्थात माझ्या सासऱ्यांमुळ��� म्हणजे ��ोहन वाघांमुळे पहिल्यांदाच विजयाबईंना भेटण्याचा योग आला . त्यानंर अनेकदा गाठीभेटी झाल्या. मला त्यावेळेस पहिल्यांदा प्रश्न पडला की या मेहता इतक्या सुंदर मराठी कसं काय बोलतात आणि त्यात मराठी रंगभूमीसाठी एवढं काम का करतात ? मग समजलं की मूळच्या विजया जयवंत ! मराठी कुटुंबात जन्मलेल्या ! अर्थात रंगभूमीच्या बाहेरच्या लोकांना अजूनही बऱ्याचदा हा प्रश्न पडतो ! असो . .
माझे मराठी रंगभूमीवर काम कर��ारे अनेक कलाकार हे परिचयाचे आहेत , अनेक कलाकार, दिग्दर्शक यांच्याबद्दल चर्चा होत असते परंतु जेव्हा कधी विजयाबाईंचं नाव येतं तेव्हा ते सर्व आपापले कान पकडतात ! मी नेहमी सांगत असतो की मला नाटक हा कलाविष्कार कधी समजलाच नाही , म्हणजे त्याची मांडणी ! माझ्या मते नाटक हा विषय चित्रपट , वेब सिरीज , सिरियल किंवा अजून काही असेल यापेक्षा प्रचंड कठीण आहे ! आणि त्यात विजयाबाईंबद्दल ही सर्व मंडळी जेव्हा भरभरून बोलतात तेव्हा समजतं की या बाई देखील त्याहून समजण्या पलीकडे आहेत !
एखादा माणूस काळाला आकार देतो, का काळ त्या माणसाला घडवतं? याचं उत्तर या दोहोंचा संगम जिथे घडतो तिथे काहीतरी सज्जड घडतं.
मराठी रंगभूमीच्या बाबतीत घडलं ते विजयाबाई, विजय तेंडुलकर असतील, डॉ. श्रीराम लागू असतील किंवा त्यांच्यासारख्या इतरांच्या रूपाने. या सगळ्या���ना आसपासचा काळ कसा बदलतोय, जग कसं बदलतंय याचं अचूक भान होतं. त्या जगाकडे बघण्याची हिंमत होती. इथे हिंमत होती अशा अर्थाने म्हणतोय की आपल्या जगापेक्षा खरंच काहीतरी वेगळं, मोठं बाहेर सुरु आहे हे बघणं, ते मान्य करणं. आणि आपल्या जगात असलं काही नाही हे मान्य करणं आणि त्यातून काहीतरी आपल्या अस्सल भारतीय, मराठी जाणिवांना साजेसं निर्माण करणं, याला एक वेगळी शक्ती लागते. ती शक्ती त्या काळात अनेकांच्���ात होती. ती विजयाबाईंच्यात पण होती.
रंग��यन' नाट्यसंस्थेच्या त्या प्रमुख संस्थापक. 'रंगायन'ने प्रायोगिक रंगभूमीला आकार दिला. १९६० च्या दशकांत जेंव्हा रंगायनची स्थापना झाली, तेंव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. तेंव्हा प्रबोधन आणि सामाजिक सुधारणा याच्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात, औद्योगिक पाया रचला जात होता.
यंत्रयुगाशी आणि त्या यंत्रयुगाचा उगम ज्या जगात झाला त्या जगाशी मराठी माणसाची तोंडओळख व्हायल�� लागली होती. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला सुरुवात झाली होती. साहित्यात प्रयोग होत होते. नेमाडेंचं “कोसला” ज्याने मराठी साहित्यात खळबळ उडवली ते त्याच काळातलं. त्यामुळे मराठी रंगभूमी म्हणजे भव्य सेट्स, मेलोड्रामा याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं नाटक असावं, त्याने किती तिकिटं विकली गेली याची चिंता करू नये, त्याने खऱ्या अर्थाने प्रायोगिक व्हावं याची गरज निर्माण झाली. आणि ती पोकळी विजया���ाईंनी भरून काढली. मराठी सिनेमा बदलायला तया�� नसल्यामुळे मोठ्या अपेक्षेने तेंव्हाचा तरुण रंगभूमीकडे अपेक्षेने बघत होता आणि ती अपेक्षा विजयाबाईंनी पूर्ण केली.
विजयाबाईंना कुठेतरी, अस्तंगतला काय चाललं आहे, किंवा गेल्यात जमा आहे याचं एक सुप्त आकर्षण पण होतं आणि भान पण असावं. विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांची संख्या मोठी, त्यांनी अभिनय केलेली नाटकं पण अनेक. पण त्यांनी दिग्दर्शित केलेली आणि रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली ना��कं म्हणजे हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, पुरुष, संध्याछाया, वाडा चिरेबंदी.
श्री.नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही ?
.
.
.
.
.
#rajthackeray#narendramodi#rammandir#mns#bjp
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे तयारी !
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रमुख राज साहेबांच्या नेतृत्वात पक्ष बांधणी सुरु आहे. मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मह���राष्ट्र धर्मासाठी नेहमीच तत्पर आणि कृतीशील असणारा मनसैनिक, मुंबई आणि मराठीसाठी नव्या जोमात लढण्यासाठी सज्ज होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी नेते संदीप देशपांडे यांची निवड झाल्याबद्दल आणि इतर प्रमुख नेत्यांना अन्य महत्वाच्या जबाबदारी मिळाल्याबद्दल सर्वांचे मनसे अभिनंदन !
#MaharashtraNavnirmanSean #MNS #Mumbai #Maharashtra
सस्नेह जय महाराष्ट्र,
येत्या २७ फेब्रुवारी २०२५ ला, मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे २ मार्च २०२५ पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत आहेत. मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल याची मला खात्री आहे.
या प्रदर्शनाचं औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला, आणि जवळपास १७ मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनु��व असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला याच.
पण, या पुस्तक प्रदर्शनाला, तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या. आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली शक्ती पण.
या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढयांना कळायलाच हवं. आणि हे का करावं लागेल तर आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. असं का होतंय हे कळत नाही…मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरु आहे ,पण मराठी ही आता ज्ञानची भाषा देखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे. हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावं लागेल. आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील.
मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत. जरूर या प्रदर्शनाला भेट द्या.
वाट बघतोय...
राज ठाकरे ।
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे... यामुळे १०३ शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नाही.
प्रश्न हा या जमिनीपुरता नाहीये, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे ?काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्रसरकारने सादर केलं होतं, त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळं सांगायला ��को. पण मुळात सुधारणा म्हणजे नक्की काय आहेत हे थोडक्यात समजून घेऊया...
१) एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे; वक्फ बोर्डाची जी मनमानी सुरु आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल.
२) एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे का सरकारी जमीन आहे याचा निवडा पूर्वी वक्फ ट्रिब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमणं केली गेली आहेत. हे नवीन विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी हा यापुढे निवाडा करेल
३) वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे आणि तसंच मुस्लिमेतर समाजाचं पण प्रतिनिधित्व असलं पाहिजे
४) आणि कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचे ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला राहील
५) आणि यापुढे एखाद्या व्यक्तीला त्याची संपत्ती वक्फ बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखं ब���ली करार नाही तर लेखी करार करावा लागेल, ज्याने त्याला कायदेशीर चौकट मिळेल.
या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नाही. श्री.नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ३७० कलम हटवणं, तिहेरी तलाकवर बंदी आणणं, राम मंदिर उभारणी अशी पावलं उचलली होती. ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता. आणि त्यातूनच आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठींबा दिला होता. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्य��ही विरोधाला बळी न पडता, शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं. आणि हो, राज्य सरकारने पण, अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं...
यानिमित्ताने देशातील एकूणच वक्फ बोर्डांना पण एका गोष्टीची जाणीव मला आज करून द्यायची आहे ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी 'भूदान चळवळ' सुरु क���ली जिच्यात लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी, सरकारला परत केली होती जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल.
हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डानी पण दाखवावा.. सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं.
राज ठाकरे ।
विधानसभा निवडणुक 2024 वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी दिल्याबद्दल मा.राजसाहेब ठाकरे,मा.अमीतजी ठाकरे नेते,मा.योगेशजी परूळेकर,मा.@ThakareShalini सर्व सहकारी व कार्यकर्त्यांचे मनस्वी आभार!!🌺#versovavidhansabha#voteforMNS