एकत्र ठाकरे बंधु येत आहेत... त्यांच्या एकत्र येण्याने काही फरक पडत नाही असे लिहीण्यासाठी सध्या आयटी गँगचा रेट ४० पैशावरून पर ट्विट ७५ पैसे केला आहे बीजेपीच्या छगन गँगने... त्यामुळे तरूण आयटी गँगवाले सुद्धा खुश आहेत... सटासट ट्विट करत आहेत... नेते बुट पॉलिश करत आहेत... उरलेले रंगा-बिल्लाचे पाय चाटत आहेत...
महाराष्ट्रात आज राजकीय सूर्योदय होणार ..
प्रत्येक मराठी मनाच एक "मत" होणार ..
मराठी माणसासाठी " ठाकरे "हे नाव नाही ठाकरे ही भावना आहे ...
मुंबई,महाराष्ट्र वाचवण्याची लढाई लढूया ...
सगळे सोबत होऊन ठाकरेंना साथ देऊया ...!!!
आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती... आजोबांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रं वापरून पुराणमतवाद्यांशी दोन हात केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्रोत. यातूनच त्यांच्या समाजसुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर आजोबांनी सामाजिक कार्याचा पाया घातलाच पण त्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची पार दाणादाण उडवून दिली.
आज जेंव्हा एखाद्या कळकळीच्या विषयवार तरी भूमिका घ्या म्हणून साहित्यिक आणि कलाकारांना सांगावं लागतं, त्यावेळेस समाजसुधारणेची स्पष्ट भूमिका घेऊन अफाट साहित्य निर्माण करून वेळेस अंगावर येणाऱ्या सगळ्या पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबांच कौतुक करावं तितकं कमी आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे. ही अशी एक चळवळ होती ज्यात संपूर्ण महाराष्ट्राची एकजूट दिसली, ती पक्षविरहित होती, विचारधारा विरहित होती, या सगळ्या शक्तींना एकत्र ठेवण्याचं काम आजोबांनी केलं.
आजोबांचं एक पुस्तक आहे त्यांचं नाव आहे 'देवांचा धर्म की धर्माची देवळे'... आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली, उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे, त्याला पण आर्थिक महत्वकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहून, धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते.
असो. पण आम्हा सर्व ठाकरे परिवाराला ओळख , ताकद, आणि विचारांची स्पष्टता मिळाली ती निव्वळ आजोबांमुळेच.
आजोबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
तळटीप :- हा माझा आजोबांसोबतचा फोटो.
ऐका हो ऐका 👂👂👂🔊🔊🔊📢
भारतीय जनता पक्ष आणि मराठी !
मराठी शाळेत हिंदी सक्ती करा आणि मराठी शाळेतून मराठी हद्दपार करा ह्यासाठी भाजपची मंडळी कसे किडे करतात ते खुद्द भाजप ची जुनी जानती मंडळी सांगत आहेत , नीट ऐका. #मराठीभाषा
"लहान मुलांना सहजपणाने भाषा शिकायला जमतं पण त्यांना पाठयपुस्तक, अभ्यासक्रम अशा प्रकारांनी जर लहान वयात एखादी भाषा शिकवण्याचा किंवा लादण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याचा ताण मुलांवर येतो. त्यामुळे सरकारने पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा शिकलीच पाहिजे असा आग्रह धरणं याचा ताण मुलांवर येणार आहे. "
डॉ श्रुती पानसे, मस्तिष्काधारित अध्ययन तज्ज्ञ.
डॉ.श्रुती पानसे यांनी 'मेंदू आणि शिक्षण व शिक्षणशास्त्र' या विषयांत पीएचडी केली आहे.
#महाराष्ट्र #मराठी #राजठाकरे
#हिंदी_सक्ती #MNSAdhikrut
"मराठी भैयांनी हा व्हिडिओ बघावा!"
जर आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला मातृभाषा जिवंत ठेवणे आवश्यक!
मी हिंदी नाही, मी गुजराती आहे- गृहमंत्री अमित शहा
हे असे बोलू शकतात पण राज ठाकरे यांनी बोलले तर ते भाषेचे राजकारण करतात, वाह रे वाह!
#Marathi