घरात #म्हातारं माणूस
असेल तर त्याला
"भार" समजू नका
"भाग्य" समजा.
कारण म्हातारं
झालेलं झाड फळ
देवो किंवा न देवो
"सावली" मात्र नक्कीच देते.
#म#मराठी#वाचलेलं#आवडलंम्हणूनलिहिलं
संघर्ष हा आयुष्याचा कठीण टप्पा असतो, पण तोच आपल्याला मजबूत बनवतो.
अपयश येतं, अडचणी येतात, पण जो थांबत नाही तोच पुढे जातो.
आजचे कष्ट उद्याच्या यशाची पायाभरणी करतात.
हार मानू नका… कारण तुमची वेळ नक्की येणार आहे. ✨
🚩!! 💪 !! ✨ !! 🔥 !! 💯 !! 🙏 !! 🚩
#संघर्ष#प्रेरणा
✍️🏻
ज्याला पक्क कळतं ना की आपल्या आईला काय पाहिजे (समाधान) त्याच्या जवळ आईचा वास निरंतर दरवळत राहतो ....मनाने ,विचाराने,आशिर्वादाने ❤️
तिला तुमच्याकडून दुसरं काहीही नको असतं. कारण परिस्थीती कितीही बिकट असो ठाम उभं राहायचं सत्व तिच्यात जन्मापासूनच असतं.
#वर्तक
युद्ध सुरू झालेय,पहिले काही दिवस मजा येईल हसू येईल मीम बनवावे वाटतील पुढे युद्ध सुरू राहिले तर हळू हळू आनंद दुःखात बदलेल आपल्या सैनिकांचे नागरिकांचे शव बघून अश्रू येतील,शेवटी विजय मिळाल्यावर सगळ काही बाजूला राहील,
फक्त आपल्यासाठी दिलेल्या बलिदानाचा विसर पडू देऊ नका.
#IndianArmy
- पालघरच्या वाडा तालुक्यातला गावठाण पाडा
- वेळ रात्री २ ते ३ दरम्यानची... एक हात डोक्यावरच्या हंड्यांवर आणि एका कडेवर लेकरु.. काळोखात पायात साधी चप्पल सुद्धा नाही
- आपण ज्या वेळी साखरझोपेत असतो त्याच वेळी या बायकांना अंधाऱ्या रात्री लेकरा बाळांसह विहीर गाठावी लागते... कधी कधी रात्री २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाण्यासाठी ताटकळत उभं राहावं लागतं. -एवढं केल्यानंतर पाणी किती मिळतं तर ते फक्त २ हंडे. ते सुद्धा विहीरीच्या झऱ्यातून तळाशी आलं तर.... नाहीतर नुसता तळ खरवडत राहावं लागतं.
पाणी नाही म्हणून गावातल्या लोकांनी आंघोळी करणं सुद्धा सोडलंय. पिण्यापुरता कसंबसं भागतं.
- दिवसभर हजारो लिटर पाणी वाया घालून आपण झोपलेलो असताना त्याच वेळी काहींना हंडाभर पाण्यासाठी कसं धडपडावं लागतंय त्याचं हे उदाहरण
तुम्ही मुलीचे किंवा बहिणीचे #लग्न ठरवताना सगळ्या गोष्टीची खातरजमा करणार...!!
पण तुम्हाला सुन किंवा पत्नी करताना समोरच्यांनी काही चौकशी नाही केली पाहिजे अश्या अपेक्षा ठेवणार, असं कसं चालेल भाऊ..!!
शंतनू नायडू याने सामूहिक पुस्तक वाचण्याचा सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, मी ही काही वेळा गेलो आहे. दर रविवारी कूपरेज गार्डन, नरिमन पॉईंटला, सकाळी ८ ते १२, शंतनूने ही साखळी देशातील इतर शहरात पण सुरू केली आहे