तिला पाऊस आवडतो...
कारण तो आनंद घेऊन येतो.
मला पाऊस आठवतो...
कारण तो संघर्षाची प्रत्येक कहाणी पुन्हा जगवतो.
तिच्या पावसात चहा, भजी आणि लाँग ड्राईव्ह असतात...
माझ्या पावसात भिजलेली स्वप्नं, जबाबदाऱ्या आणि उद्याची धडपड.
पाऊस सारखाच पडतो.... ✨
काही नाती ओळखीने जुळतात... काही स्वार्थाने टिकतात..
पण काही माणसं अशी भेटतात, ज्यांच्याशी नात्याला नाव द्यावं लागत नाही... कारण "मैत्री" हा शब्दच त्यांच्यासाठी पुरेसा असतो.
अशा प्रत्येक जिवाभावाच्या मित्राला... मनापासून मैत्री दिनाच्या शुभेच्छा! ❤️✨