हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे !
आज भाऊबीज, अर्थात भाऊ बहिणींच्या पवित्र आणि कोमल नात्याचा सन्मान करणारा पवित्र सण ! या पवित्रदिनी भाऊ बहिणीचे नाते अधिक घट्ट होवो, हीच मंगल सदिच्छा! समस्त बंधू-भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
#dilipmane#dilipmaneforsouthsolapur
आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा !
आपल्या गुणांनी परमेश्वराला अवतार घ्यायला लावणाऱ्या दानशूर राजा बलीच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा सण, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य प्रदान करो हीच सदिच्छा !
#dilipmane#dilipmaneforsouthsolapur
शब्द दिला खरा केला.. ही उमेदवारी केवळ माझी नाही तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. मला उमेदवारी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे व देशाचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे यांचे देखील मनापासून आभार..!
@INCIndia
माझा काँग्रेस पक्ष, त्याचे नेतृत्व आणि काँग्रेसच्या विचारधारेवर संपूर्ण विश्वास आहे. आपल्या काँग्रेसचा पारंपारिक सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार आहे आणि तो आपणच लढवणार आहोत..!
महाराष्ट्राची आदिशक्ती नवरात्र महोत्सव मंडळाने प्रतिष्ठापना केलेल्या देवीची आरती केली. माझ्यासह माजी महापौर महेश कोठे, सी. ए. सुशील बंदपट्टे, अक्षय वाकसे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#navratri2024
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी!
अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला..! मराठी भाषिकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. वर्षानुवर्षे चाललेल्या ��थक प्रयत्नांना अखेर यश मिळाले.!
#मराठी_भाषा #अभिजात_दर्जा #DilipMane #Solapur
दत्त चौक येथे वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडळात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणेनिमित्त मिरवणूक उत्साहात पार पडली. माझ्यासोबत माजी आमदार राजन पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, उद्योजक शिखर पहाडिया व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माथाडी कामगारांचे आराध्यदैवत, अ. भा. मराठा महासंघाचे संस्थापक, मराठा आरक्षणाचे क्रांतिसूर्य, आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#क्रांतिसूर्य#अण्णासाहेबपाटील#जयंती#अभिवादन
मजरेवाडी येथील भारतमाता सांस्कृतिक मंडळास भेट देऊन गणरायाची आरती केली आणि श्री गणेशाचे दर्शन घेतले. यानंतर, उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि ��पेक्षा जाणून घेतल्या. श्री गणेशाच्या आशीर्वादाने सर्वांना सुख, शांती, आणि भरभराट लाभो, अशी प्रार्थना केली.
कुमठा नाका येथील मानाच्या जय विजय गणपती तरुण मंडळास भेट देऊन श्री गणेशाची आरती केली. यावेळी उपस्थित असलेल्या गणेशभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री गणेशाच्या आशीर्वादाने सर्वा���ना सुख, शांती, आणि समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली.
#Ganeshotsav2024 #GanpatiBappaMorya
तिऱ्हे येथील मोरया गणेशोत्सव मित्र मंडळाच्या श्री गणरायाच्या मिरवणुकीत सहभागी होत श्री गणरायाची आरती करण्याचा योग आला. मंडळातर्फे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला आणि कार्यकर्त्यांसोबत लेझीमचा आनंद देखील घेतला.
गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मार्केट यार्ड येथील भुसार मार्केट येथील गणेशोत्सव मित्र मंडळास विशेष भेट दिली. याप्रसंगी माजी मार्केट यार्ड कमिटी संचालक केदारनाथ उंबरजे यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाचे दर्शन घेत मनोभावे आरती केली.