तेथ प्रियाची परम सीमा । तो भेटे माउली आत्मा । तये खेवी आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥
प्रियांची परम सीमा असलेला तो माउली आत्मा भेटतो त्या ब्रह्मरूप आत्म्यास ऐक्याने आलिंगन देतांच " अहंममात्मक " सांसारिक नगाऱ्याचा घोष जागचे जागी विलयास जातो . +
तेथ प्रियाची परम सीमा । तो भेटे माउली आत्मा । तये खेवी आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥
प्रियांची परम सीमा असलेला तो माउली आत्मा भेटतो त्या ब्रह्मरूप आत्म्यास ऐक्याने आलिंगन देतांच " अहंममात्मक " सांसारिक नगाऱ्याचा घोष जागचे जागी विलयास जातो . +
अपूर्णतेची जाण सतत होत असते , त्यामुळे दुःख होते व असमाधान असते .सर्व भोगसमृद्धि अगर उपर्युक्त वैषयिक सुखें केवळ एका देहाच्याच निकोपपणावर अवलंबून आहेत . ती सर्व देहाच्याच आश्रयाने - आधाराने राहत असतात , +
जो आपणच अधिष्ठान ब्रह्मरूपाने विश्वस्वरूप झाला आहे . तर जीव - जीवांतील , जीव - जडांतील जीव - ईश्वरांतील , जड - जडांतील , ईश्वर - जडांतील भेद असा पंचविध भेदभाव आपोआपच नाहीसा झालेला आहे . त्याच्या साठी " द्वेष ' हा अजिबात रहात नाही .
#सार्थज्ञानेश्वरी#मराठी#रिम
जो आत्मलाभासारिखे। गोमटे कांहींचि न देखे। म्हणौनि भोगविशेखे। हरिखेजेना॥ आपणचि विश्व जाहला। तरी भेद भावो सहजचि गेला म्हणौनि द्वेषु ठेला।जया पुरुषा॥
जो आत्मानंदाच्या लाभासारखे विश्वांत चांगले असे कांहींच जाणत नाही म्हणून कोणत्याहि भोग विशेषाच्या लाभाने तो हर्षास प्राप्त होत नाही .
“ स्थितप्रज्ञ "
आध्यात्मिकादि नाना प्रकारची दुःखें प्राप्त झाली असतांहि ज्याच्या चित्तांत उद्वेग-खिन्नता नाही , वैषयिक सुखाची इच्छा नाहीं , विषयासक्ति , काम , क्रोध हे ज्यास नाहीत , त्याला केव्हांहि भय कसले ,हे माहितच नसते . कारण ,तो आत्मस्वरूपाने सर्वत्र परिपूर्ण व्यापक असतो . +
जगच्या जगच देह झाले आहे म्हणून ज्याची सुखदुःखे नाहीशी झाली आहेत . द्वैतच उरले नाही , त्यामुळे अनुकूल वस्तूच्या लाभाने हर्ष , दुसऱ्याच्या उत्कर्षास पाहून अमर्ष ही दोन्ही त्यांस होत नाहीत . असा तो सुखदुःखादि द्वंद्वांपासून सर्वथैव मुक्त असतो , भय - उद्वेगरहित असतो . +
◆ समाधान ◆
मनाची एकाग्रता झाली असतां जी एक " प्रसन्न " स्थिति प्राप्त होते त्यास " समाधान " म्हणतात . मन-बुद्धीची स्थिरता लाभली तरच ही समाधाची दशा प्राप्त होते .
असें पहा की , चित्ताला अखंड प्रसन्नता असेल तेथे कोणत्याच संसार-दुःखाला प्रवेश नाही . +
ज्याचा जठरच अमृत प्रसवते . त्यांस तहान - भूकेच्या पीडेची कधीच भीति नसते . त्याप्रमाणे हृदय प्रसन्न झाले तर दुःख कसे व कोणास होईल ? त्या दशेत बुद्धि आत्मस्वरूपाचे ठिकाणी आपोआपच स्थिर होईल . +
मी-माझे पणाच्या भ्रमाचा निरास करणे अत्यंत जरूरीचे आहे . म्हणून फलदृष्टीने कर्मसंन्यास व निष्काम कर्मयोग समानच आहेत . " संन्यास " परमार्थसाधनेंतील एक असा हा " उपरम महत्त्वाचे अंग होय .
#सार्थज्ञानेश्वरी#म#मराठी#रिम
◆ नित्य संन्यासावस्था ◆
तोच संन्यासी आहे की , जो हरवलेल्या किंवा पार नष्ट झालेल्या वस्तूंची आठवण करीत नाही . अप्राप्त वस्तू मिळाल्याच नाहीत तर त्यांची इच्छा करीत नाही . ज्याला देह मी आहे व स्त्री , धन , पुत्रादि माझे आहेत याची आठवणहि राहात नाहीं तो " निरंतरचा संन्यासी " होय .
मी - माझें पणाच्या भ्रांतीचा त्याग करून जो निद्वंद्व झाला जो विषयासक्तीकडून सोडून दिला गेला , तो सहजच मोक्ष सुखास प्राप्त होतो . अर्थात् मोक्षप्राप्तीसाठी विधिपूर्वक गृहादिकांचा त्याग आणि सर्व कर्माचा संन्यास करणाऱ्या अधिकाऱ्यानेहि मी-माझे +