पुणे जिल्ह्यातील चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येला घेऊन आज प्रत्यक्ष चाकण येथे ��िविध ठिकाणी पाहणी केली. या पाहणीवेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. वाहतूक कोंडी होण्याची प्रमुख कारणं समजून घेतली आणि अधिकाऱ्यांना यावर त्वरित उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांनी देशासाठी दिलेले अपार योगदान आणि अर्थशास्त्रातील द्रष्टेपण देशवास���यांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शा��ती लाभो.
#DrManmohanSingh #मनमोहन_सिंह #भावपूर्ण_श्रद्धांजली #Purandar
पोलीस स्मृती दिन !
देशातील सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवेसाठी पूर्ण बांधिलकी आणि अढळ निष्ठेने कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिस कर्मचाऱ्यांना विनम्र आदरांजली!
#PoliceCommemorationDay#पोलीस_स्मृतिदिन#purandar#abhidurgade
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार आणि कवी व��. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #durgadeabhi #dugambardurgade
नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांबाबत आज बैठक संपन्न झाली. यावेळी दरड प्रतिबंधक, धूप प्रतिबंधक कामांबाबत तांत्रिक सादरीकरण करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी, आपत्तीपूर्व अंदाज येण्यासाठी शासन नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत आहे. कोकणातील सागरी किनारा क्षेत्रात पूरप्रतिबंधक बंधारे बांधण��, दरड कोसळण्यास अटकाव करणं, पूरप्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण विभागासह आयआयटीमधील तज्ज्ञांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यासंदर्भात वापरण्यात येणाऱ्या आधुनिक, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. त्याचा आपल्या राज्यात कसा वापर करता येऊ शकतो, याबाबत अभ्यासपूर्ण अहवाल सादर करावा, असे निर्देश बैठकीत दिले. राज्यात विशेषतः कोकण परिसर, डोंगरी भाग आणि प्रमुख नदी परिसरात आपत्तींना अटकाव करणाऱ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आज सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विव��ध कामांना वित्त विभागाची मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठक पार पडली.
राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खु��ताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसंच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय चाचणी आणि अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी. औषधांचा पुरवठा नियमित सुरु राहील, याची दक्षता घ्यावी. रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले.
राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य यंत्रणा प्राधान्यानं सक्षम करण्यात येत आहेत. कोविड संकट काळात आरोग्य यंत्रणेचं महत्त्व आपल्याला समजलं आहे. ��्यामुळे आरोग्य सुविधांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नवीन उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालये सुरू करण्याची मागणी येत आहे. अस्तित्वात असलेल्या शासकीय रूग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवून त्यांचं श्रेणीवर्धन करण्याची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ��ूग्णालय यांना मान्यता देणं, खाटांची संख्या वाढवून श्रेणीवर्धन करणं याबाबत सर्वंकष निकष ठरवण्यात यावेत. निकष ठरवताना २०२१ ची वाढीव लोकसंख्या आणि आरोग्य केंद्रांमधील अंतर लक्षात घेऊन आरोग्य विभागाचा बृहत आराखडा मंत्रिमंडळासमोर आणावा. या सुविधा देताना आदिवासी भाग, आकांक्षित तालुक्यांचा प्राधान्यानं विचार करावा. त्यांच्यासाठी वेगळे निकष ठरवावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल���या.
रुग्णालयांच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पदनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. ज्याठिकाणी रूग्णालयांचं बांधकाम पूर्ण झालं आहे, अशा ठिकाणी फर्निचर देण्यासाठी जिल्हा निय���जन समितीमधून निधी देण्यात येईल. त्यानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असल्यानं या विभागातील डॉक्टर, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी, त्यांच्या पदांसाठी किमान ३ महिने आधी भरती प्रक्रिया सुरू करावी. लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेऊन आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांची बांधकामं सध्याच्या निकषांच्या आधारे तातडीनं पूर्ण करावीत. यासाठी १५ व्या वित्त आयोगातील निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश बैठकीत दिले.
समाज परिवर्तनासाठी लोकशिक्षणावर भर देणारे महान स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक चळवळींत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे विचारवंत, थोर समाजसु��ारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या भव्य रक्तदान शिबिराची आढावा बैठक पुणे जिल्हा मध्य.सह.बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडेसर यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते @AjitPawarSpeaks@DurgadeGanpat
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा 5000 रुपयांऐवजी प्रतिकुटुंब 1000 रुपयांची मदत केली जाईल यांची घोषणा आज @AjitPawarSpeaks दादांनी केली.
@NCPSpeaks1
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्याठिकाणी मदतकार्य वेगानं सुरु आहे. आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीनं पाच हजार रुपयांसह मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे. या मदत कार्यात कोणताही भेदभाव करण्यात येत नाही. आपत्तीत असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं राहील. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्यानं नैसर्गिक आपत्ती येत आहेत, याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा 'एनडीआरएफ'चा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल.
#पावसाळीअधिवेशन२०२३