गेले एक महिने झाले पूर्ण पुण्याचे आणि पिंपरी चिंचवड शहराचे रंगरंगोटीचे आणि रस्त्याचे काम चालू आहे, मला वाटलं निवडणुका आहेत म्हणून करत असतील पण नाही कारण आहे "बजाज पुणे ग्रँड टूर 2026", पूर्ण शहर धुवून काढलं आहे रस्ते धुवत आहेत, दुभाजक धुवत आहेत, त्या भूमकर चौकामध्ये इतकं ट्रॅफिक असत रोज तर फक्त 1 पोलीस आणि 1 ट्रॅफिक वॉर्डन हाताची घडी घालून बघत थांबलेले असतात रोज, तर आज 10-15 पोलीस थांबले आहेत, पूर्ण महाराष्ट्रातून पोलीस फौजफाटा बोलवला आहे, प्रति 450 लोकांपाठीमागे 1 पोलीस असले पाहिजेत असा संयुक्त राष्ट्रांनी शिफारस केलेले मानक आहे असे म्हटले जाते, याची जाणीव अचानक पोलिसांना झाली आणी पूर्ण महाराष्ट्रामधून पोलिसांना बोलावून घेण्यात आले, भूमकर चौकाजवळील गरीब लोकांची मातीची घरे दिसू नयेत म्हणून सर्व ठिकाणी कापड लावून गरिबी झाकण्यात आली आहे, पूर्ण शहरात रोज इतके ट्रॅफिक होऊन सुद्धा लक्ष न देणारे प्रशासन आज प्रत्येक चौकामध्ये कमीत कमी 10 पोलीस उभे आहेत, फुटपाथ वर वेग वेगळ्या प्रकारची झाडे आणून ठेवली आहेत. तर एवढा सगळं खटाटोप कशासाठी तर त्या ग्रँड टूर साठी, सामान्य नागरिक रोज ट्रॅफिक मधून जातो, धुळीतून प्रवास करतो त्यावेळी बरे प्रशासन कुठे दिसत नाही. एक खाजगी कंपनी काय येते प्रशासनासमोर पैसे काय फेकते प्रशासन सगळी रस्ते नवीन चकचकीत करून धुवून भांडवलदारांच्या सेवेसाठी हाजीर होते. अरे बाबांनो कधी लोक एवढ्या खड्ड्यातून जातात या विचाराने कधी रस्ता केला आहे काय? कधी लोकांसाठी रस्ता धुवून काढला आहे काय? गरिबांची मातीची घरे झाकता लाज वाटते काय तुम्हाला? पोलीस प्रशासन सगळी काम सोडून रस्त्यावर उभी आहेत कशासाठी जनतेसाठी नाही तर "बजाज पुणे ग्रँड टूर 2026" चे हट्ट पुरवण्यासाठी. अवघड आहे सगळं..... कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा...🙏🏻
@PuneCityPolice@PMCPune@pcmchsgsociety@PCcityPolice@PCMCSarathi@punekarnews
#BajajPuneGrandTour #PuneGrandTour
#Pune #PCMC
India's youth is so busy with "SYSSHTUMMM ne ro diya" that they don't give a sh!t about how our states are burning due to riots #MANIPUR & #HARYANA violence!