मा. @mpsc_office
4 मार्च 2025 रोजी जा.क्र. 048/2024 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका आली, पण अजून पर्यंत तरी 60 दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर नाही.
काम होत नाहीयेत की करावं वाटत नाहीयेत आयोगाने सांगावे ?
#COMBINE24PRERESULT
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट_अ पदाची जवळपास 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि Combine गट_ब साठी साध्या PSI च्या जागा 2024 घ्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा..! 🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट अ पदाची 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि..
कंबाईन गट ब साठी साध्या PSI च्या जागा वाढवायच्या म्हणलं की आर्थिक परिस्थिती कारण दिलं जातं...
हा अन्याय नेहमी कंबाईनच्या पोरांवरच का ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#Combine_2024_जागावाढ
✨काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट_अ पदाची जवळपास 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि Combine गट_ब साठी साध्या PSI च्या जागा 2024 घ्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा..! 🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks
MPSCच्या विद्यार्थ्यांची आजची लढाई ही फक्त नोकरीसाठी नाही, तर न्यायासाठीची आहे. परीक्षा वेळेवर होत नाहीत, नियम सतत बदलले जातात, आरक्षणावर अजूनही गोंधळ आहे, आणि या सगळ्याचा फटका थेट मेहनती विद्यार्थ्यांना बसतोय. हजारो तरुणांचं आयुष्य फक्त प्रतीक्षेत जातंय ना स्थिरता, ना दिशा.
ही मुलं रस्त्यावर उतरली आहेत, कारण त्यांना फक्त ऐकून नकोय, उत्तर हवंय, कृती हवीये. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर व्हावी, आरक्षणावर एकदाच स्पष्ट निर्णय व्हावा, राज्यसेवेचा पेपर ४५ दिवस पुढे ढकलावा, MPSC Combined च्या जागा वाढवण्यात याव्या, आपलं सरकार पोर्टल बंद पडले आहे ते तत्काळ सुरू करण्यात यावे एवढंच मागणं आहे. पण जर यंत्रणेनं अजूनही डोळेझाक केली, तर ही शांत लढाई उद्या मोठा आवाज बनू शकते. आणि तो आवाज थांबवणं कोणाच्याही हातात राहणार नाही.
#MPSC #आंदोलन
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसे नाही म्हणणाऱ्या सरकारने मोठ्या कंपन्यांचे १६.३५ लाख कोटींचे कर्ज २०१४-२४ मध्ये बिनदिक्कतपणे बुडीत खात्यात टाकले! ही दांभिकता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे!
#राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे हे यश आहे. आदरणीय पवार साहेब नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि आयोगाकडे पाठपुरावा केला त्याबद्दल साहेबांचे देखील आभार!
#MPSC ने आपली जबाबदारी पार पाडली आता #combine जागावाढीबाबत शासनानेही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
एकीकडे कोट्यावधींच्या जाहीरातबाजीतून तरुणांना 'बेरोजगारीमुक्त राज्याचं' असं स्वप्न दाखवायचं, आणि दुसरीकडे त्यांचं भविष्य घडवण्याच्या सगळ्या वाटा बंद करून टाकायच्या हाच दुटप्पीपणाचा खेळ भ्रष्टयुती सरकार राज्यातील तरूणाईसोबत खेळत आले आहे.
* MPSC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करावं लागतं हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे !
MPSC च्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, एकत्रित (Combine) परीक्षेसाठी जागा वाढ व्हावी आणि आणि स्पर्धा परीक्षेतील प्रक्रियेला पारदर्शक ठेवा. इतक्या मागण्या आहेत आणि या मागण्या रास्त आहेत, तरीही राज्यसेवा आयोग आणि सरकार यावर गंभीर का नाही ?
#unemployment #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra
एका महत्त्वाच्या विषयावर आज (गुरुवार दि. १७ एप्रिल) सायंकाळी ५:३० वाजता पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहे. पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, ही विनंती.
स्थळ - पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे.
#राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात दोन दिवसापूर्वी पवार साहेबांनी आयोगाशी केलेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज आयोगासोबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी आयोगासमोर मांडल्या आहेत. आता आयोगाने देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सरकारने देखील कुठलीही अडचण आणू नये, ही अपेक्षा !
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ