कानात घुमणाऱ्या त्या लकेरी,
मी ओळखीच्या असूनही नाकारल्या;
दुर्लक्ष केले तरीही त्या हसण्याच्या लहरी,
माझ्या मनाच्या कोपऱ्यात येऊन आदळल्या.
:-निशांत
#मराठी#marathi
Its Official Now..IAS Omkar Madhukar Pawar..
आयुष्यातील एका पर्वाचा अंत आणि दुसऱ्या एका जबाबदार पर्वाची सुरुवात..
Thank You everyone and especially my Aai for believing in me...
..no words to express my emotions!!!!🥰🥰
#upsc#happiness#IAS
उमदी (ता. जत) येथे कार्यक्रमानिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळेजी आले असता त्यांचे स्वागत केले. सोबत सांगली लोकसभा क्षेत्र खासदार मा. संजयकाका पाटील उपस्थित होते.
@cbawankule@PatilSanjaykaka
धोनीने सचिनला वर्ल्डकप मिळवून दिला हे म्हटलं तर एवढं का झोंबलं ते समजलं नाही. वर्ल्डकप जिंकणे म्हणजे काय ? फक्त एक टूर्नामेंट खेळणे असते का ? अनेक वर्षाची त्यासाठी केलेली मेहनत असते. 2003 च्या वर्ल्डकपच्या आठवणी सांगताना लोकं 2007 च्या वर्ल्डकपकडे दुर्लक्ष करतात, मला आठवते कि 2007 च्या त्या वर्ल्डकपमध्ये सगळे लेजंड प्लेयर असूनही भारताला नामुष्कीचा पराभव स्वीकारावा लागलेला. अतिशय कमकुवत असलेल्या बांगलादेश अन श्रीलंकेने हरवल्याने साखळी सामन्यातूनच संघ बाद झाला, भारतात परतल्यावर क्रिकेटच्या देवांना सुद्धा तोंड लपवत फिरावं लागलं होत, एवढा जनप्रक्षोभ देशात झालेला. या पराभवाचा परिणाम असा झाला कि पुढे होणाऱ्या अनेक सिरीजमध्ये सिनियर खेळाडूंनी सहभाग घेणे सोडले. मे 2007 बांगलादेश विरोधात वनडे सिरीज झाली, धोनी त्यात प्लेयर ऑफ द मॅच होता. T20 वर्ल्डकपची घोषणा ICC ने केली. 50-50 च्या वर्ल्डकपसारखे काही होऊ नये या भीतीने अनेक दिग्गज खेळाडूंनी आम्ही हा क्रिकेट प्रकार खेळणार नाहीत असं जाहीर केलं, आयरनी म्हणजे कि हेच क्रिकेटपटू पुढे IPL खेळताना दिसले. धोनीच्या गळ्यात कॅप्टनशी घातली. अपयश आले तरी आपल्यावर खापर नको. आपल्या कॅप्टन्सीच्या जोरावर अन चांगल्या टीम निवडीने धोनीच्या टीमने सुंदर खेळ केला, पहिला T20 चा वर्ल्डकप आपण जिंकला. टीम अन खेळाडूंना पराभूत मानसिकतेतून बाहेर यायला मदत झाली. पुढे धोनीला वनडेच कॅप्टन केले. ICC क्रमवारीत 6 नंबरला असणारा भारत हा पहिल्या क्रमांकावर पोहचला. 2008, 2009 साली धोनी ICC ODI रँकिंगमध्ये बॅट्समन म्हणून एक नंबरवर होता. पाकिस्तानला हरवलं, न्यूझीलंडला त्यांच्या देशात धूळ चारली. त्रिकोणी श्रुंखला, आशिया कप, रेकॉर्डवर रेकॉर्ड बनत गेले. धोनी नंतर स्वतः खाली खेळायला येऊ लागला. सिनियरशी जुळवत नवख्या खेळाडूंना संधी देऊ लागला. जिंकणे हे ब्रीद झाले. 2007 ते 2011 हा टीम मध्ये झालेला आमूलाग्र बदल होता. 2011 चा वर्ल्डकप हा आपल्या देशात असल्याने आपल्याला फायदा झाला. 2011 चा वर्ल्डकप फक्त धोनीमुळे आला असं आम्ही कधीच म्हणत नाही, पण त्यासाठी मागील गेल्या 2-3 वर्षातील धोनीची मेहनत कशी विसरता येईल ? राहिला फायनलचा विषय तर तिथेही धोनीचे काहीच योगदान नसल्यागत विरोधक बोलत असतात. धोनी स्वतः वर खेळायला आला, जर तो move चुकला असता अन आपण मॅच हरलो असतो तर ? दोष कोणाला गेला असता ? बरं धोनी खेळायला आला तेव्हा स्कोअर होता 114, गंभीर 54 रनवर खेळत होता, 223 स्कोअर असताना गंभीर आउट झाला तेव्हा धोनी 60 रणवर खेळत होता. 97 रनसाठी 121 बॉल गंभीरने घेतले. धोनीने 79 बॉलमध्ये 91 केले, तरी धोनीच काहीच योगदान नव्हतं असं समजणाऱ्या लोकांना कितपत क्रिकेट कळते ते समजत नाही. गंभीरचे योगदान कोणीच कधी नाकारले नाही पण कॅप्टन अन प्रभावी खेळी खेळल्याने धोनीला लोकांनी डोक्यावर घेतलं यातून ईर्षा का व्हावी ? हार्दिक पांड्या जस बोलला कि धोनीचा द्वेष करायला राक्षसाचे मन असावं लागेल. सिनियर खेळाडूंना बाजूला करून जसं गांगुलीने धोनीला संधी दिली तशीच संधी धोनीने अनेकांना दिली त्यामुळे धोनीवर आरोप केला जातो कि सिनियर खेळाडूंना बसवलं, आपण एकवेळ हे मान्य करू पण त्यांच्याजागी खेळलं कोण ? रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, अश्विन, जडेजा, हार्दिक, बुमराह, शमी हेच ना ? कि स्वतः धोनी त्यांच्या जागी येऊन खेळला ? हे खेळाडू पुढे आल्याने क्रिकेटचे नुकसान झाला कि फायदा ? निरर्थक आरोप... बाकी हळूहळू लिहू
@shriramd7 माझे होस्टेलवर अनेक मित्र खानदेश ,विदर्भ,मराठवाडा इ. विविध भागातील शिक्षण घेण्यासाठी प.महाराष्ट्रात आले होते.
यांच्यावरून चित्र स्पष्ट दिसत.
येसलेवाडी, बेर्डेवाडी, कोकणेवाडी (ता. शिराळा) या वाड्यांसाठी होणाऱ्या जल जीवन मिशन योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 1 कोटी 30 लाख रुपये खर्चून वाड्यांसाठी पाणीपुरवठा योजना करण्यात येत आहे. (1/3)