पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ऊन, पाऊस आणि रात्र-दिवसाची पर्वा न करता दिलेल्या लढ्याला मनापासून सलाम! शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांतून आलेल्या या मुलांच्या मेहनतीचा, त्यांच्या कुटुंबीयांच्या अपेक्षांचा आणि भविष्याचा प्रश्न या परीक्षांशी जोडलेला आहे. त्यामुळे परीक्षांमधील पारदर्शकता आणि भरती प्रक्रियेतील विश्वासार्हता ही सरकारची जबाबदारी आहे.
ऋषिकेश गांगुर्डे, विवेकानंद पाटील, अक्षय कांबळे, आमीर शेख, धनंजय यांच्यासह सर्व विद्यार्थी, उपोषणाला बसलेले सातही विद्यार्थी, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, भाऊसाहेब आजबे आणि प्रमोद पाटील यांचे मनापासून आभार. या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी भूमिका घेणारे आमदार रोहित पवार, तसेच विद्यार्थ्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवणारे पत्रकार, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि डिजिटल माध्यमांचेही मनःपूर्वक आभार.
या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवताना, त्यांच्या समस्या समजून घेताना आणि त्यांच्या जेवणाची-पाण्याची व्यवस्था करताना त्यांच्या संघर्षाची तीव्रता जवळून अनुभवली. माझ्या युवक काँग्रेसच्या काळातील आंदोलनांच्या आठवणीही पुन्हा जाग्या झाल्या. विद्यार्थ्यांसोबत उभं राहणं ही माझ्यासाठी राजकीय नव्हे, तर सामाजिक जबाबदारी आहे.
आंदोलन स्थगित झालं असलं, तरी प्रश्न संपलेले नाहीत. सरकारने दिलेल्या आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी आणि पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित झाली पाहिजे.
विद्यार्थ्यांनो, तुमचा लढा महाराष्ट्राच्या भविष्याचा लढा आहे. तुम्ही अभ्यास करत राहा; तुमच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.
— डॉ. विश्वजीत कदम
#पुणे
हा आहे गोपाळकृष्ण गोखले रोड अर्थात FC रोड. यावर भयंकर अतिक्रमण, अनधिकृत स्टाॅल आहेत. इथ महापालिकेचे काहीच चालत नाहीत म्हणे. जर भाजपचे खासदार, आमदार, ४ नगरसेवक व महापालिका अधिकार्यांमध्ये हिंमत असेल तर गुडलक चौक ते FC गेट पर्यंतचा रस्ता मोकळा करून दाखवावा
#Pune#Punenews
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये आज जोरजोरात थाळ्या वाजवून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
काहींनी गो भिमनवार गो अशी घोषणा देत थाळी वाजवली .
आज आंदोलनाचा १० वा दिवस आहे.
#Pune#Punenews#MPSCआंदोलन#पुणे
मुख्यमत्र्यांनी पोस्ट करताच प्रोटोकॉल बाजूला ठेवत क्षणार्धात रिप्लाय देणारे भिमनवार साहेब, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार नाहीत का ?
#तेरा_यार_हू_मै …………..
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCStudents
गेल्या तीन-चार दिवसांपासून MPSCचे विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करत आहेत. काही विद्यार्थी उपोषणालाही बसले आहेत.
या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची तीव्रता आणि त्यांच्या मनातील अस्वस्थता लक्षात घेता, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.
माझे सहकारी आणि लहान बंधू आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसोबत मुक्काम करून त्यांचे मनोबल वाढवत आहेत. काल मीदेखील विद्यार्थ्यांसोबत मुक्काम करून त्यांच्याशी संवाद साधला.
ही तरुणाई महाराष्ट्राची ताकद आहे. उद्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत काम करून राज्याच्या विकासात योगदान देणारे अनेक अधिकारी याच विद्यार्थ्यांमधून घडणार आहेत.
त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने पाहून त्यावर योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे.
शासनाने या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांना दिलासा द्यावा.
आत्ताच विवेकानंद पाटील यांच्याशी बोलणं झालं!
उद्या मी पुण्यात MPSCच्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत जाऊन बसणार आहे.
पण एक गोष्ट अजूनही समजत नाही, ती ही की किती कोणी निर्दयी असावं!
अहो, MPSC चे अध्यक्ष महाशय, हजारो-लाखो विद्यार्थी तुम्हाला नाकारताहेत. बाजूला व्हा, सांगताहेत!
गद्दार ज्ञानेशकडून धडे घेतले का आपण?
की आता विद्यार्थ्यांनी येऊन बसायचं MPSCच्या दारात आणि मगच आपण राजीनामा द्याल?
#MPSCStudentsProtest #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
@PatilKailasB ji @rautsanjay61 ji
आज पहिल्यांदाच बंटी पाटील यांना ऐकलं....
कॉग्रेस ने या नेत्याला खरंच पुढं आणलं पाहिजे
जबरदस्त अभ्यास आहे या माणसांचा एकदम मुद्देसूद बोलतात...
आज बरेच नेते आले पण बंटी पाटलांनी मुलांच्या मागण्यावरच मुद्देसूद मांडणी केली
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#पुणे
मी आज नाही, अनेक वर्ष झाले पाहतोय, तुम्हीही पाहत असाल की सामाजिक आंदोलन असो, उत्सव असो किंवा मग इतर कुठला कार्यक्रम सगळ्यात जास्त तणाव पोलिसांवर येतो.
दिवसातले १२-१४ तास पोलिस उभे असतात. साधं पाणीसुद्धा पुरवले जात नाही. सगळ्यात तणावाची नोकरी.
त्यात हे असले शूज. काळ्या रंगाचे. चामड्याचे. हे शूज घालून १२-१४ तास मुंबईच्या गरमीत उभे राहायचे, किती अवघड आहे.
अनेक पोलिसांशी बोललो, पायाला फोड येतात. टाचा दुखतात. पोटऱ्या भरून येतात.
कॉन्स्टेबल बोलू शकत नाहीत. हे सगळ्यांना दिसते, अनेकदा विषय निघतो. पण निर्णय होत नाही ..
उत्तम स्पोर्ट शूज, आरामदायी आणि चांगले ventilation असलेले ही गरज आहे.
नाहीतर ही मंडळी साठी येईपर्यंत खरच सक्षम राहतील का ?
गृहमंत्री, डीजीपी आणि सीपी सरांनी यावर सहानुभूतीने विचार करावा.
@CMOMaharashtra@DGPMaharashtra
#Maharashtra #Police
हा आहे पंचगंगेचं पाणी पिणारा कोल्हापूरचा पठ्ठ्या… विवेकानंद पाटील. #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात रात्री एकटाच अडीच-तीन तास ‘बॅटिंग’ करत होता आणि सकाळीही जब्बर ‘टोलेबाजी’ केली. चौफेर वाचन, ग्रामीण आणि शहरी समज, सामाजिक-राजकीय परिस्थितीचा आवाका असलेला आणि प्रामाणिक… असे अनेक विद्यार्थी हे #MPSC ची तयारी करतात पण भ्रष्ट व्यवस्थेमुळं शेवटी त्यांच्या हाती केवळ निराशा येते. त्यामुळं #MPSC मधील भ्रष्टाचाराचं प्रमुख खोडच मुळासकट उपटून काढण्यासाठी हे विद्यार्थी सत्याग्रहाला बसले आहेत. एकदा भ्रष्टाचाराचं खोड हटवलं तर फांद्या आपोआप बाजूला होतात.. त्यामुळं भिमनवारांचा राजीनामा होईपर्यंत आता माघार नाही..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा__राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही
#MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा हीच विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असून सरकार याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने आम्ही आजपासूनच पुण्यात एस. एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थ्यांसोबत सत्याग्रह सुरु केला आहे.
आता राजीनाम्याशिवाय माघार नाही..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
जर पायलटच इस्लामीक कट्टरतावादाच्या आहारी जाऊन विमाने हायजॅक करायला लागल्यास या लोकांवर विश्वास कसा ठेवणार? आणि सुरक्षेच्या कितीही उपाययोजना केल्या तरी अशा आतंकवाद्यांना कसे आवरणार?
ओमानी पायलटने कॅप्टन स्मित मच्छारवर मागून चाकू हल्ला करून जखमी केलं आणि आता विमानातील सगळे मरणार म्हणून आत्मघाती आतंकवादी हसू लागला.एवढ्या जबर हल्ल्यातही धाडसी स्मित यांनी धाडस दाखवत कॉकपीटचे दार उघडले.त्यामुळे विमानातील धाडशी प्रवाशांनी त्या आत्मघातकी पायलटला पकडले आणि डांबून ठेवले.
विमानात एक पायलट असल्याने त्याने नंतर विमान सुरक्षितरित्या लँड केलं.
इस्लामीक दहशतवादाचा जगाला धोका आहे.भारत या धोक्याची किंमत अजूनही मोजतोय.
कॅप्टन स्मितसारखे हिरोज आहेत म्हणून जग सुरक्षीत आहे.एक भारतीय अशा प्रकारचे धाडस दाखवतो याचा अभिमान आहे.