मराठी भाषेचा शब्दसंचय आटला नसून, आपली शब्दग्रहणक्षमता संकुचित झाली आहे, एवढाच काय तो दुर्दैवी विरोधाभास!
दैनंदिन संभाषणाच्या नावाखाली आपण भाषेचे जे सरलीकरण केले, त्याचे पर्यवसान शब्ददारिद्र्यात झाले आणि आता एखाद्याने अस्खलित, व्याकरणशुद्ध, संस्कृतप्रचुर मराठीचा प्रयोग केला की आपण त्यास भाषाप्रभुत्व समजून विस्मयचकित होतो!
वस्तुतः हे असामान्य नसून, विस्मरणात गेलेल्या आपल्या भाषिक वैभवाचे पुनःस्मरण आहे.
मराठी कठीण नाही महोदय…
आपला मराठीशी असलेला संवादच दुर्दैवाने क्षीण झाला आहे!
@chetakofficial@heydigit If insurance procedure is completed then how many days you required for completion of the vehicle work.
Waiting since almost 1 month still didn't confirm when it will be complete?
RBI spent ₹6,372 crore on printing currency notes in FY25.
Meanwhile, UPI costs the govt around ₹2,500 crore a year.
Keeping UPI free is a good investment in Digital India.
अजिंक्य हा माझा लहानपणीचा हिरो व आतापर्यंतचा सर्वात आवडता खेळाडू
अजिंक्यच्या निवृत्तीची बातमी समजल्यापासून मला माझ्याच आयुष्याचा एक भाग संपल्यासारखे वाटत आहे.
तुझ्याबद्दलच्या आठवणी सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतील,पण शेवटी एकच सांगेल - त्या सर्व आठवणींसाठी अगदी मनापासून धन्यवाद ❤️
गाबा जिंकणारा कर्णधार... आणि शांतपणे निरोप घेणारा योद्धा
अजिंक्य रहाणे निवृत्त झाला.
ही फक्त एका क्रिकेटपटूची निवृत्ती नाही. हा त्या शांत स्वभावाच्या योद्ध्याचा निरोप आहे, ज्याने कधी स्वतःसाठी टाळ्या मागितल्या नाहीत, पण भारतासाठी इतिहास लिहिला.
36 धावांत ऑलआऊट झाल्यानंतर संपूर्ण देश निराश झाला होता. तज्ज्ञांनी मालिका संपल्याचा निकाल लावला होता. पण रहाणेने एकही मोठी घोषणा केली नाही. त्याने फक्त बॅट हातात घेतली आणि मेलबर्नमध्ये शतक झळकावलं.
त्यानंतर सिडनीत लढा दिला गेला.
आणि शेवटी गाबा... गाबा गाबा करणाऱ्यांना त्यांचा अब्बा दाखवणारा...
32 वर्षे ऑस्ट्रेलिया ज्या मैदानावर हरला नव्हता, तिथे एका जखमी, अनुभवहीन भारतीय संघाने इतिहास घडवला. त्या विजयाचा चेहरा होता अजिंक्य रहाणे.
तो आक्रमक नव्हता, पण निर्भय होता.
तो मोठ्याने बोलत नव्हता, पण त्याचे निर्णय संघाला प्रेरणा देत होते.
त्याने शिकवलं की नेतृत्व म्हणजे आवाज चढवणं नाही, तर संकटातही शांत राहून योग्य दिशा दाखवणं.
आज त्याच्या आकडेवारीपेक्षा लोकांना गाबा आठवतो.
मेलबर्नचं शतक आठवतं.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भारतीय क्रिकेटला मिळालेला तो आत्मविश्वास आठवतो.
काही खेळाडू विक्रमांनी अमर होतात.
काही ट्रॉफींनी.
पण अजिंक्य रहाणे...
तो एका ऐतिहासिक मालिकेने आणि आपल्या संयमी नेतृत्वाने कायमचा लक्षात राहील.
धन्यवाद, रहाणे.
प्रत्येक वेळी सिद्ध केल्याबद्दल की शांत माणसंही इतिहास घडवू शकतात.
@ajinkyarahane88
राजस्थान विद्यापीठात मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारण्याचे निर्देश राज्यपाल हरिभाऊ राठोड ह्यांनी कुलपती ह्या नात्याने दिले. त्याला प्रचंड विरोध करत राजस्थानात त्यांचे पुतळे जाळत आंदोलने करण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मा.राजसाहेबांवर देश तोडण्याचे आरोप केले गेले. निलेशचंद्र सारखे तथाकथित मुनी आता राजस्थानात अक्कल शिकवण्यासाठी जाणार आहेत का ?
तसं असेल तर मग महाराष्ट्रात इतर राज्यांची भाषा अभ्यास केंद्र आणि इतर राज्यातील त्या राज्याच्या नावाने असणारी भवने कशाला पाहिजेत ? ती सुद्धा सगळी बंद करून टाका.
योगेश खैरे
प्रवक्ता - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
A train that emits water, not smoke. How cool is that? This is India's first Hydrogen Cell Powered Train 🚆
What's cooler? India is one of only 6 nations to develop this technology ⚡
What's even cooler? India has developed the most powerful hydrogen train in the world 🔥
वारी प्रथेला ८००+ वर्षांचा इतिहास आहे.
पुण्यात २ दिवस वारी असते, यात नियोजनासाठी अनेक रस्ते बंद केले जातात. हे प्रत्येक पुणेकराला माहित आहे.
यानुसार प्रत्येकाने आपापले नियोजन करणे गरजेचे आहे.
काल परवा पुण्यात आलेल्यांनी आमच्या संस्कृती बद्दल न बोललेले बरे !
🚨 Lionel Messi gave Argentina the World Cup 2022
🚨 Kylian Mbappé gave France the World Cup 2018
🚨 Cristiano Ronaldo gave Portugal the Nations League 2025
🚨 Neymar gave Brazil…. Love
भाई गावाकडं जबरदस्त पाऊस चाललाय 🔥🔥
24 तासात कोयना धरण 15.76 TMC वरुन 22.51 TMC कडं भरलंय.
एका दिवसात खडकवासला चे धरण 2 वेळा भरून ओव्हरफ्लो आणि होईल एवढा पाऊस फक्त एका दिवसात 😍
कोविडमध्ये स्थगित केलेली सह्याद्री एक्स्प्रेस अजूनही सुरू झालेली नाही.
ती तात्पुरती बंद केली… आणि ६ वर्षे होत आले आजपर्यंत कायमचीच गायब झाली.
रेल्वेची कारणं दरवेळी बदलतात…
• प्रवासी कमी
• नवीन टाइमटेबल
• रूट बदल
• तोट्याचा दाखला
कोल्हापूर–मुंबई मार्गावर रोज हजारो लोक प्रवास करतात.
बस, इतर गाड्या, खच्चून भरलेल्या.
मग गरज असताना सह्याद्रीच का परत आणली जात नाही?
@RailMinIndia@IRCTCofficial@Central_Railway कृपया स्पष्टीकरण द्या.
महिन्यातुन एक शनिवार, मासिक पाळीत दोन दिवस सुट्या,कार्यालयीन वेळ सकाळी दहा ते पाच, काही अडचण असेलतर वेळ नाही पाळली तरी चालते, कधी लवकरच जायचं, कधी वाढदिवसच आहे..पगार हा न चुकता महिन्याच्या एक तारखेला सकाळी नऊ वाजता..एवढ्या सुख सुविधाची नोकरीं असताना.. माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोनवर बोलायला जास्त वेळ भेटत नाही म्हणून.. चार वर्षे काम करणाऱ्या मुलीने नोकरीं सोडली.. 😔 हे सत्य कथन आहे.. अश्या कितीतरी मुली मुलं करियर खराब करून घेत आहेत..घरी वेळ भेटत नाही बोलायला म्हणून कामाच्या ठीकाणी वेळ भेटेलं ही अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे.. तो व्यवसायिक तुम्हांला हवी ती सुख सुविधा देऊन महिन्याकाठी पगार देत असेल तर, त्याच्या ही काही अपेक्षा असतात.. त्या या नोकरीं करणाऱ्यांनी समजून घेतल्या पाहीजे..नोकरीं बरोबर घर आणी नाते सम्भाळून घेता येतं असेल तरच मुला मुलींनी नोकरीत पडायला हवं..अन्यथा व्यवसाय त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे..
#नोकरीं
#व्यवसाय
जेव्हा हे गडकिल्ले पाहिले; तेव्हा सोबत/आसपास/हाकेच्या अंतरावर ‘एखादा ग्रुप’ असेल तर #सोबत वाटयची.
गड-किल्ल्यांवर जाणार्यांना लोक हसायचे,
‘फॅशन’ नव्हती/ ‘कुल’ नव्हते जाण,
सोशल मिडीया नव्हता,तेव्हा गडकिल्ले पाहिले याचं समाधान वाटत!
उदाहरणार्थ तेंव्हा तो खाली कोसळत असावा..मरणापूर्वी केतनच्या वगैरे डोक्यात किती विचार वायूवेगाने आले असतील? गोष्टी घडल्यानंतर या विचारांना तसाही अर्थ नसतो खंडेराव.. तशा त्या घडायच्या अगोदर तरी कुठे असतो..आपण फक्त बेवारस.. आपला वारस एकच.. मृत्यू.
त्यानंतर संपतं सगळं..❤️
#नेमाडपंथी
UPA सरकार असताना सत्ताधारी पक्षात असलेले पद्मसिंह पाटील हे तुरुंगात होते त्यावेळी ओमराजे विरोधी पक्षात होते आणि तरीही ना त्यांना पक्ष बदलायची गरज पडली ना पद्मसिंह पाटील ह्यांना सत्ताधारी असल्याची सूट मिळाली.
उदाहरणार्थ , तहानलेली शहरं पाणलोटातल्या पावसानेही सुखावतील.. पण आपल्या कारभाऱ्यांना 'असं का?' म्हणून कधी पुसणार नाहीत.. यंदा पाऊस लांबला , पण गेल्यावर्षीच्या पाण्याचा हिशोब कोण मागणार? कोण सांगणार?
खंडेराव, हे बेहिशोबी जगणं.. शहरांचं.. त्याचं ऋण फेडायचं खेड्यांनी..❤️
#नेमाडपंथी
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने प्रतिष्ठित नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला.
- अंतिम फेरीत त्याने जर्मनीच्या व्हिन्सेंट किमर याचा पराभव केला.
- या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
- ही कामगिरी भारतीय बुद्धिबळासाठी अभिमानास्पद ठरली.
#Chess #Praggnanandhaa #NorwayChess
#शिवराज्याभिषेक
" चार पातशाह्या उरावर भाले रोवून उभ्या असतानाही मराठी राजा छत्रपती झाला !
सामान्य गोष्ट नव्हे !
साडे तीनशे वर्षांचे सुतक फुटले !
साऱ्या जखमा बुजल्या !
सारे अपमान धुवून निघाले !
सावलीसाठी विशाल छत्र उघडले गेले !
मुलाबाळांस,लेकीसूनांस,शेतकऱ्यास हक्काने रुसावयास जागा निर्माण झाली!
अवघ्याना आजोळ-माहेर लाभले !
सृष्टी डोलू लागली !
सह्याद्रीला हर्षवायू झाला !
समुद्रमंथनात देवांनाही मिळाले नाही,असे अपूर्व रत्न महाराष्ट्राला मिळाले - सिंहासन !
केवढा हा प्रचीतीचा आनंद !
माझा राजा छत्रपती झाला..!!! "