आमच्या गावात एकच मुक्कामी एसटी रात्री ७ वाजता येते आणि सकाळी ७ ला जाते. मागच्या १२ वर्षा पासून गावातील तरुण मंडळ दिवाळीच्या पाडव्याला एसटी बस स्वच्छ धुवून काढतात, सजवतात आणि एसटी बस चालक- वाहकांचा चा सत्कार करतात. हा अनोखा उपक्रम पाहून चालक - वाहक आनंदित होतात.
OPD मध्ये बदलत चाललेली तक्रारींची भाषा
ओपीडीमध्ये बसताना अलीकडे एक वेगळीच गोष्ट जाणवते.
पूर्वी पेशंट्स साध्या शब्दांत सांगायचे
“ताप आहे”, “खोकला आहे”, “छातीत दुखतंय.”
पण अलीकडच्या दिवसांत ऐकू येणाऱ्या अनेक तक्रारी
एखाद्या ठराविक आजारात बसत नाहीत.
तरीही त्या खूप कॉमन झाल्या आहेत.
जणू आपल्या बदललेल्या जीवनशैलीची आणि मनावरच्या ताणाची भाषा बोलत आहेत.
ओपीडीमध्ये वारंवार ऐकू येणारी काही वाक्यं 👇
• “डॉक्टर, मेट्रोच्या 2-3 मजली पायऱ्या चढताना इतकी धाप लागते की वाटतं तिथेच बसावं.”
• “दोन दिवस ट्रिपला गेलो… पण बाहेरचं खाल्लं की पाच दिवस पोट जडच राहतं.”
• “घरी चार पाहुणे येऊन गेले की दोन दिवस इतका थकवा येतो की कोणाशी बोलावंसं वाटत नाही.”
• “दिवसभर Zoom meetings… रात्री डोळे इतके त्रस्त की झोपच लागत नाही.”
• “व्हॉट्सॲपवर कुणी काही उलट बोललं की दिवसभर डोक्यात तेच चालू राहतं.”
• “मुलांशी बोलायला गेलं की ते चिडतात… वडिलांशी बोलायला गेलं की पटत नाही… मध्ये माझीच ओढाताण.”
• “मित्रांमध्ये बसलो की वाटतं आपण मागे पडतोय… तेवढ्यानेच धडधड वाढते.”
• “ऑनलाइन food apps मुळे जेवण पटकन येतं… पण वजन आणि सुस्ती हाताबाहेर जात आहेत.”
• “छोट्या गोष्टीवरून घरी भांडण होतं… आणि मग ऑफिसमध्ये कामावर लक्ष लागत नाही.”
• “सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी आधी मोबाईलच उघडतो… तिथूनच दिवसाचा थकवा सुरू होतो.”
हे सगळं ऐकताना एक प्रश्न मनात येतो
हे आजार आहेत का…
की शरीर आणि मन देत असलेले इशारे?
कदाचित आपण
जास्त वेगात, जास्त स्क्रीनमध्ये, जास्त अपेक्षांमध्ये जगायला लागलोय.
आणि शरीर शांतपणे सांगतंय
थोडं थांबा… थोडं संतुलन आणा.
तुम्हालाही यापैकी काही जाणवतं का?
का नवीन काही तक्रार जाणवत असेल तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहा.
कदाचित तुमचा अनुभव दुसऱ्या कोणाला स्वतःकडे बघायला मदत करेल.
कधी कधी बोलल्यानेच निम्मं ओझं हलकं होतं.
Dr Ravindra L. Kulkarni
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#OPDInsights #ChangingComplaints
#ModernLifestyleSignals #UrbanHealth
#MindAndBody #JustForHearts
#LifestyleMedicine #SeniorConsultantNotes
आपल्या उत्पन्नातील किमान १० % वाटा स्वतःसाठी गुंतवायला हवा.
▪️ज्याचं इंग्रजी कच्च असेल त्याने क्लासेस लावावेत.
▪️ इंटरनेट, एआय व सेल्स-मार्केटिंगचे काही बेसिक कोर्सेस करावेत.
▪️तरूणांनी आपल्या क्षेत्रातली किमान दोन नवी सॉफ्टवेअर्स शिकावीत.
▪️आपण ज्या क्षेत्रात काम करतो
१/५
रयत शिक्षण संस्थेच्या आवारातील काल झालेला कार्यक्रम पहायला कर्मवीर आण्णा, एन डी पाटील सर, संत गाडगेबाबांसारखे लोक असायला हवे होते….. 😞🙏🏻
सर्वांनीच याचा जाहीर निषेध करायला हवा!
जे कोणी लोकं शाळा परिसराचा असा वापर करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी!
आपल्या देशाची ओळख
भारत की इंडिया ?
हिंदुस्थान की
सिंधुदेश की
भरतक्षेत्र की
इंडिका की
भरतवर्ष की
आर्यवर्त की
जम्बूद्वीप की
गोंडवाना की
पण
सर्वात जुने मिळतंय ते "मेलुहा "
हिंदी ही ८०० वर्षापूर्वीची भाषा आहे तर मराठी २३०० वर्षापूर्वीची
हिंदी साठी महाराष्ट्रात अट्टहास करणाऱ्यांना ही माहिती अवगत करून दिली पाहिजेत
इंट्रेस्टिंग व्हिडिओ
चालताना, पळताना, ट्रेनमधून, बसमधून, रिक्षातून प्रवास करताना, जिममधे, गाडी चालवताना जिकडे बघू तिकडे -
“कानात हेडफोन्स लावून गाणी ऐकताना अनेक माणसं दिसतात.”
त्यांच जगच पुर्ण वेगळं वाटतं. माणसात असूनही ती अलिप्त असतात, त्यांच्याच दुनियेत.
कुणी काय करावं हा फार वैयक्तिक मुद्दा
१/५
गरीबी ही मल्टीडायमेन्शल आहेच.
▪️आर्थिक
▪️शैक्षणिक
▪️सामाजिक
▪️बौद्धीक
▪️मानसिक
▪️शारीरिक
आणि तशी श्रीमंतीही.
योग्य शिक्षण, वाचन, व चांगली संगत असली की “आर्थिक बाजू” सहज सावरते. बहुतांश मुद्दे मग निकाली निघतात.
कोणी काहीही म्हणो- स्वतःसह कुटूंबाची आर्थिक घडी नीट बसवता यायला हवी!
@RajThackeray UP , बिहार मध्ये मराठी सक्तीची भाषा करावी नोकरी साठी येणाऱ्यांना पण सोईस्कर होईल. इकड तर उलटा प्रकार चालू आहे ..आम्ही महाराष्ट्रात येतोय हिंदी भाषा शिकून घ्या.
गरिबी, बेरोजगारी, मागासलेपणा, धार्मिक-जातीय अस्थैर्य आणि गुलामी मानसिकतेच्या हतबलतेचा फायदा उठवून “स्थानिक संसाधनांवर ताबा” हा फार जुना डाव आहे.
“आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा…..” असं कोणीही, कितीही ठरवलं, अगदी जबरदस्ती केली तरी का सुर्यास्त अन सुर्योदय कंट्रोल करणारंय का कोणी?
जाती या राष्ट्रविरोधी असतात.
सर्वप्रथम त्या समाजामध्ये फुट पाडण्याचं काम करतात. एका समाजात दुसऱ्या समाजाबद्दल द्वेष आणि तिरस्कार पसरविण्याचे काम करतात.
परंतू जर आपल्याला खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवायची इच्छा असेल तर या सर्व अडचणींवर मात करता यायला हवी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏❣️