२०२४ पर्यंत रोहित पवारांना सोशल मीडियावर पुरोगामी समर्थकांकडून जी प्रसिद्धी आणि समर्थन मिळायचे ते आता दिसत नाही. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नसूनही बरेच लोक त्यांची बाजू मांडायचे.. आज ते उपोषण करत आहेत पण अराजकीय व पुरोगामी समर्थक लोक दोन हात लांबच आहेत.
कारण अदाणी!
सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना करणारे, सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुली करणारे क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित व त्यांच्या विचारांना घराघरात पोहचवणारी 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' ही मालिका बंद करण्याचे षडयंत्र काही मनुवादी प्रवृत्ती करत आहेत. हा विषय मालिकेपुरता मर्यादित नाही तर क्रांतीज्योतींच्या विचाराला पुन्हा एकदा प्रतिसाद मिळत असल्याने मनुवाद्यांचे धाबे दणाणले आहे.
ही मालिका बंद पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर हे या पुरोगामी महाराष्ट्रात कधीही खपवून घेतले जाणार नाही. या मालिकेचे निर्माते खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत आम्ही सर्व जण खंबीरपणे उभे असून संपूर्ण महाराष्ट्र या लढ्यात त्यांच्यासोबत उभा राहील हा विश्वास आहे.
#जय_ज्योति_जय_क्रांती
झाले बहु, होतील बहु, परि या सम हाच!
कपाळी अष्टगंधाचा टिळा, हाती भवानी तलवार, पाठीशी जगदंबेचा आशीर्वाद आणि काळजात रयतेची माया... अशा अद्भूत रसायनातून घडलेल्या माझ्या राजाला 'छत्रपती' हे पद लाभले, तो हा सुवर्णक्षण!
इतिहासालाही ज्याचा अभिमान वाटावा, अशा शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
तुझ्याकडे माझा कोणता नवस नाही की कोणतं मागणं नाही..आहे फक्त तुझ्यावर निव्वळ प्रेम... तू दिलंस त्यात समाधानी आहे.. तू माज येईल इतकं दिलं नाहीस की कुणापुढे हात पसरावा लागेल असंही नाही... तुझ्यावर प्रेम करण्याचा माझा अधिकार अबाधित राहुदे इतकंच काय ते बा विठ्ठला...!
#बा_विठ्ठला ❣️
माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाचा गैरवापर करून ₹1.12 कोटींची फसवणूक, पाच जणांविरुद्ध गुन्हा..!
आश्चर्याची बाब म्हणजे कामिनी शेवाळे यांच्या वाढदिवसाला आरोपी हजर होते.
आरोपी १) युनूस शेख २) सचिन यादव ३) हनुमंत देवधरकर ४) अक्षय रूपवते ५) फैजल
यांनी MMRDA घरांचे वाटप करून देण्याचे आश्वासन दिले ही घरे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी राखीव असून ती माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या कोट्यातून उपलब्ध करून देता येतील, असे आरोपींनी सांगितले.
या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदार आणि इतर पीडितांनी आरोपींना विविध हप्त्यांमध्ये ऑनलाइन व्यवहार व रोख स्वरूपात एकूण सुमारे ₹1.12 कोटी दिले.
फसवणूक अधिक विश्वासार्ह वाटावी म्हणून आरोपींनी एमएमआरडीएचे बनावट शिक्के व स्वाक्षऱ्या असलेली वाटपपत्रे (Allotment Letters) आणि ताबा पावत्या (Possession Receipts) तयार करून दिल्या. काही पीडितांना संबंधित फ्लॅट्समध्ये राहण्याची परवानगी देखील देण्यात आली.
नंतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यावर ती बनावट असल्याचे उघड झाले. फ्लॅट्सचे हस्तांतरण कायदेशीररीत्या शक्य नसल्याचे समोर आल्यानंतर पीडितांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
डोंगरी पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि कट रचणे यासंदर्भातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांना अनेक बनावट एमएमआरडीए कागदपत्रे सापडली असून आणखी कोणी या फसवणुकीचा बळी ठरले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
#News #Maharashtra #Fraud #PoliticalNews
#MaharashtraPolice
कोल्हापूरकरांचे दरडोई उत्पन्न राज्यात सर्वात जास्त आहे त्याला कारण शाहू महाराज यांनी दूरदृष्टी ठेवून केलेले कार्य.. आणि कोल्हापूरकरांनी टिकवून ठेवलेल्या सहकारी संस्था..
यात गोकुळ दूध संघांचे नाव अग्रक्रमाणे घ्यावे लागेल..
भाजपा व उजव्या लोकांना कोल्हापूरकराच्या या संस्थेबद्दल आकस आहे त्यामुळे त्यांच्या आयटी सेल ने हलाल सर्टिफिकेट वरून गोकुळ ला बदनाम करने सुरु केले पण त्यांनी सांगितले नाही की भोगी हं रामदेव बाबा ची पतंजली, गुजराती अमूल दूध आणि मदर डेअरी यांनी पण हलाल सर्टिफिकेट घेतले आहेत.. महाराष्ट्र मधील लोकांना गोकुळ दूध घेऊ नका त्यांनी हलाल सर्टिफिकेट घेतले हा प्रचार करत आहात कोल्हापूर बद्दल त्यांच्या संस्थेबद्दल आकस का आहे??
हलाल सर्टिफिकेट कशासाठी तर ही संस्था प्राण्याच्या चरबी पासून तूप लोणी वैगरे बनवत नाही..गोकुळ ने हे सर्टिफिकेट घेऊन मुस्लीम राष्ट्रात त्यांचे प्रॉडक्ट विकले तर बदनामी का?? गुजराती ब्रँड वाढवण्यासाठी की हं रामदेव च्या पतंजली ने मुस्लीम राष्ट्रात आपले प्रॉडक्ट विकावे त्याला कोणता स्पर्धक नको??
खालील पुरावे जोडले आहेत आता भक्तांने पतंजली अमूल मदर डेअरी बद्दल बोलून ते कोल्हापूर च्या जनतेचा द्वेष करत नाहीत त्यांना गोकुळ संस्था बदनाम करून बंद पाडायची नाही हे दाखवून द्यावे..
पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..
माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे.
आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत.
#pune #police
स्वराज्याच्या रक्षणासाठी अदम्य धैर्य, अपराजित रणनिती आणि तेजस्वी बुद्धिमत्तेच्या बळावर संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्यनिष्ठा अबाधित ठेवली. औरंगजेबाच्या आक्रमणासमोर न झुकता त्यांनी स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि पराक्रमाची परंपरा जपली.तेजस्वी बुद्धिमत्ता, अपराजित रणनिती सह्याद्रीचा लढवय्या धुरंधर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा!
आता पंतप्रधानांनी नुकतेच दिलेले काटकसरीच्या सल्ले / Austerity Measures अर्थशास्त्राच्या कसोटीवर घासून त्यांचा कस तपासून बघू...
१. परवापासून मोदीजींची भक्त मंडळी सगळ्यांना असं सांगत सुटली आहे की आपल्या घरात जाणते लोक कठीण परिस्थितीत काटकसर करायला सांगतात तसंच मोदीजी सांगताहेत, त्यात तुम्ही वाईट कशाला शोधता! यात अडचण अशी आहे की देशाची अर्थव्यवस्था ही घरासारखी चालत नाही. उदाहरणार्थ: तुम्ही तुमच्या मित्राला असं म्हणालात की घरामध्ये दूध घ्यायचं बंद कर, पैसे वाचव तर एकवेळ ठीक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्देशून हा सल्ला अंमलात आणला गेला तर फायदा फारसा होणार नाहीच, उलट दूधउत्पादन, विक्री आणि संबंधित व्यवसायात रोजीरोटी कमावणारे लाखो लोक बेरोजगार होऊन एक नवं संकट देशावर ओढावेल!
२. दुसरा प्रश्न आहे या सल्ल्यांच्या टायमिंगचा! नेमका बंगाल निवडणूक आणि शपथविधी उरकून झाल्यावर हे सल्ले द्यायची उपरती मोदींना कशी झाली? कारण इराण युद्ध गेले दोन महिने सुरू आहे. त्यामुळे होणारे सप्लाय चेनवरील परिणाम सगळ्यांसमोर स्पष्ट दिसत होते! अशावेळी उपाययोजना करायला घेण्याची वेळ मार्चच्या पहिल्या आठवड्यात होती, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्ही नक्की काय करत होता? तुमच्या प्रचारसभांना, रोड शोला, मिरवणुकांना पेट्रोल डिझेल लागत नव्हतं काय? जर अशा आर्थिक उपाययोजना खरंच करायच्या होत्या तर त्या बंगालमध्ये सगळं काम उरकून झाल्यावर कशा केल्या? तुम्ही फुल टाईम प्रचारक आणि पार्ट टाईम पंतप्रधान आहात का? अर्थात याचं मोदींच्या भक्तांना काही वाटणार नाही! कारण सगळीकडे राष्ट्र प्रथम म्हणून बोंबलत फिरणारे हे बिनपगारी भक्त आणि पगारी आयटी सेलवाले मजूर इथे मात्र पक्ष प्रथम ठेवूनच वागत आहेत!!
३. तिसरा मुद्दा आहे धोरणांच्या विस्कळीत आणि विसंगत असण्याचा... तुम्ही लोकांना आता उशीरा वर्क फ्रॉम होमचे नुसते सल्ले नक्की काय म्हणून देता? इराण युद्ध सुरू झाल्यावर लगेच कंपन्यांना रीतसर आदेश काढून वर्क फ्रॉम होम धोरण राबवता आलंच असतं, खबरदारीचा उपाय म्हणून शक्य त्या कंपन्यांवर ही सक्ती करण्याची सोय सरकारकडे होतीच! त्याचबरोबर तुम्हाला रुपया घसरण्याची एवढी चिंता होती तर तो गेल्या वर्षभरात ८५ पासून ९५ इतका घसरेपर्यंत तुम्ही झोपून का होता? इराण युद्धाच्या आधीही रुपया घसरत होताच! कारण ट्रम्पसमोर कोणतीही ठाम भूमिका न घेता, त्यानुसार स्पष्ट धोरणे न बनवता तुम्ही परदेशात फिरून ख्याख्याख्याखिखिखी करण्यावर भर देत होता. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी सोन्यावर निर्बंध लावायचे होते तर ते याआधी का लावले नाहीत?
४. आता मुद्दा येतो यातील काही सल्ल्यांच्या निकृष्ट दर्जाचा! शेतकऱ्यांना एकाच वर्षात ५०% रासायनिक खते कमी वापरा असं सांगणं हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. यामुळे अन्नसुरक्षेला धोका आहेच पण त्याशिवाय शेतकऱ्यांचं उत्पन्न अचानक घसरून ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिती आहे त्याहून जास्त बिकट होऊ शकते. यामध्ये अजून खराब मान्सूनचा प्रभाव पडल्यास ग्रामीण भागात अत्यंत भीषण परिस्थिती उद्भवू शकते, कारण अजूनही भारतात प्रचंड प्रमाणात लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. या परिस्थितीची जराही जाणीव न बाळगता बिनधास्त असले सेंद्रिय शेतीचे सल्ले द्यायची पंतप्रधानांना नक्की काय घाई झाली होती?
५. शेवटी मुद्दा येतो तो म्हणजे आपल्या अपयशाचं खापर लोकांवर फोडण्याचा... म्हणजे तुम्ही क्रूड ऑईल स्वस्त होतं तेव्हा पेट्रोल १०० रुपयांच्या भावाने विकून लाखो कोटींचा कर लोकांकडून आकारला. आणि आता क्रूड महाग झाल्यावर तुम्हाला लोकांवरच निर्बंध बसवायचे आहेत? तसं असेल तर क्रूड स्वस्त असताना लोकांना त्याचा फायदा का दिला नाही? तुम्ही जो कर लोकांकडून उकळता तो लाडक्या बहीण स्वरूपाच्या खिरापत योजनांसाठी उधळून टाकल्यानंतर पुन्हा लोकांनाच काटकसरीचे सल्ले द्यायला तुम्हाला लाज वाटत नाही का? वर आयातीचं कारण देऊन म्हणता की इलेक्ट्रिक गाड्या घ्या! इलेक्ट्रिक गाड्यांचे बहुतांश पार्ट आणि बॅटरी आपण आयातच करतो त्याचं काय? गेल्या बारा वर्षांत सत्तेत बसून तुम्ही या प्रश्नाबाबत नक्की काय प्रगती केली आहे? तुम्ही लोकांना असले सल्ले द्यायला लागला की या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लोक विचारणारच आहेत, तुमचे भक्त तरी किती जणांची तोंडं बंद करणार?
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खऱ्याखुऱ्या कठोर उपाययोजना आणि ही असले बेदरकार सल्ले यात फरक असतो. एखाद्याला ताप आल्यावर त्याला डॉक्टरांनी नीट तपासून कडू औषध दिलं तर त्याला कठोर उपाययोजना म्हणतात! तुम्ही त्या ताप आलेल्या माणसाला सक्तीने माती खायला सांगताय आणि म्हणताय की मातीलाच औषध समजून गुमान सहन करा तर हे नक्की कसं आणि किती दिवस चालेल?
- मकरंद देसाई
#PMModi
ज्येष्ठ नेते आदरणीय पद्मविभूषण @PawarSpeaks साहेबांनी मला बोलून घेतले होते. पुण्यात मोदी बागेत आज मी सकाळी साहेबांची भेट घेतली माझ्यावर संग्राम भंडारे आणि त्या गुंडांनी केलेल्या हल्ल्या संदर्भातली जी काही घटनाक्रम आहे तो सर्व साहेबांना सांगितला साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून आरोपींवर कारवाई करण्याची आणि मला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली त्याचबरोबर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठक होणार असून त्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असल्याचे साहेबांनी मला सांगितले. तसेच हा वैचारिक तात्विक पातळीवरचा लढा असाच सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने चालू ठेवावा विचारांची लढाई विचारांनी आपण लढत राहू असे साहेबांनी मला आशीर्वाद देताना सांगितले. @NCPspeaks
राष्ट्रवादीचे @VikasLawande1 यांच्यावर हा भ्याड हल्ला या भंडारेने केला..राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही हे सिद्ध झाले! हे लोक तुम्हाला अध्यात्म शिकवणार? यांच्या घाणेरड्या तोंडांत देवाचे नाव शोभते तरी का? देवाच्या नावाने बाजार मांडायचा,समाजात विष पसरवायचे, असल्या भोंदू लोकांना सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याशिवाय ही हिंमत होणार नाही! हा हल्ला फक्त विकास सरांवर नाही, तर महाराष्ट्राच्या विवेकबुद्धीवर आहे! लाज ही वाटत नाही देवाचे नाव घेऊन हे धंदे करायला..
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे मनोहर भिडेबद्दल काही तरी बोलले म्हणून भाजपचा पाळीव असणाऱ्या संग्राम भंडारेला संताप अनावर झाला आणि त्याने विकास लवांडे यांच्यावर हल्ला केला.
हे भाजप आमदार मंत्री नितेश राणे यांचं जून भाषण आहे आणि मनोहर भिडेंबद्दल त्यांनी काढलेले हे उद्गार आहेत यावर संग्राम भंडारेच काय मत आहे काय भूमिका आहे ?
@VikasLawande1@RRPSpeaks
मागच्या आठवड्यात बागेश्वर बाबा नावाचा एक भोंदू महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवरायांवर बोलला तेव्हा भाजप पुरस्कृत स्वतःला वारकरी म्हणवणारा संग्राम भंडारे मूग गिळून गप्प बसला.
आणि विकास लवांडे मनोहर भिडेवर बोलले म्हणून लावाडेंवर हल्ला केला त्यांच्यावर शाईफेक केली यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे यांना शिवरायांपेक्षा भिडे महत्वाचा आहे.
बहुजन समाजातील लोकांनी लवकर शहाणं व्हावं!
सर्वांनी आत्ता #लोणीकाळभोर पोलिस स्टेशनला यावे.
वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही 10/15 गुंड गोरक्षक यांनी तीन फोर व्हीलर मध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता 10 वाजता मी परत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि मला धक्काबुक्की केली पिस्तूल दाखवला आहे. नंतर पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे . पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्व माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावाmतोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करत आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@DGPMaharashtra@CPPuneCity@NCPspeaks
संग्राम भंडारे याने त्याच्या कृतीतून सिद्ध केलं की,तो खरच वारकरी संप्रदायातील घुसखोर आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
“कथा करोनिया दावी प्रेमकळा ।
अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ॥”
बाहेर भक्तीचा आव आणून आतून द्वेष, अहंकार आणि हिंसा ठेवणाऱ्यांना समाजाने ओळखलं पाहिजे.
वारकरी संप्रदाय हा प्रेम, समता आणि नम्रतेचा मार्ग आहे, गुंडगिरीचा नाही. @VikasLawande1 नेमकी हीच बाब लोकांच्या लक्षात आणून देत होते.
आम्ही विकास लवांडे यांच्या सोबत उभे आहोत.