♦️तलाठी भरतीच्या सर्व उमेदवारांना आवाहन
तलाठी भरती घोटाळ्याच्या तपासासाठी उमेदवारांनी आप-आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना द्यावयाचे निवेदन.
आपल्या सर्वांना माहिती आहे तलाठी भरतीत घोटाळा झाला आहे, दिलेला Normalised स्कोअर चुकीचा आहे. महसूल विभाग यात काही कार्यवाही करायला तयार नाही पण जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यातील पदभरतीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार असतात.
२०१९ तलाठी भारतीत घोटाळा झाल्याचे लक्षात आल्याने अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तपास करून भरती रद्द करण्याचा अहवाल शासनाला पाठविला होता, जर आता आप-आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी असा तपास केलाच तर घोटाळा उघड होईल आणि तलाठी भरतीबाबत जिल्हा स्तरावरच निर्णय होईल. अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रातील एकतरी असे जिल्हाधिकारी साहेब असतील जे गरीब आणि प्रामाणिक उमेदवारांचा विचार करून, नगर जिल्ह्याच्या धर्तीवर संपूर्ण तपास करतील. म्हणून आम्ही आपल्या सर्वांसाठी एक निवेदन बनविले आहे सोबत २०१९ मधील अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सुद्धा देतो आहोत. आपण दोन्ही pdf ची प्रिंट काढावी, खाली आपले नाव, सही, तलाठी रोल नं. आणि मोबाईल क्रमांक टाकून आपण ज्या कोणत्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्यातील, जिल्हाधिकारी कार्यालयात सदर निवेदन द्यावे.
ज्या उमेदवारांना वाटत असेल आपल्यावर अन्याय झाला आहे त्यांनी मोठया संखेने जिल्हाधिकारी कार्यालये गाठून, सदर निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावी ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@maharevenue@RVikhePatil@RRPSpeaks@AUThackeray@CMOMaharashtra
चौकशी करण्याचे कारणच काय? तलाठीचे अनेक पेपर फुटले आहेत, तसा आमचा नाही पोलिसांचाच रिपोर्ट आहे. पेपर फुटलेले असताना नियुक्त्या देता येतात का? इतक्या सोप्या प्रश्नाचे उत्तर विखेंनी द्यावे. @RVikhePatil .
महसूल विभागात भ्रष्टाचार चव्हाट्यावर..
५० खोके एकदम ओक्के !! अशा बातम्या आपण ऐकतच आहोत पण आता तलाठी भरतीत २५-२५ पेट्यांचा रेट निघाल्याच्या बातम्या येत आहेत
२०१९ तलाठी भरतीच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचे पुरावे आता उपलब्ध आहेत,यात एकही आमदार/महसूल मधील अधिकारी बोलायला तयार नाही.
https://t.co/S55gy8LxXI
जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी हा मसुदा अर्ज आहे. अर्ज फक्त लवकरच प्रदान केल्या जाणाऱ्या लिंकवर ऑनलाइन भरायचा आहे. तुम्हाला काही शंका आणि अभिप्राय असल्यास, कृपया 27 एप्रिल 2023 पूर्वी टिप्पणी म्हणून पोस्ट करा.