युवासेनाप्रमुख, पर्यावरण, पर्यटन, उपनगर पालक मंत्री, व राजशिष्टाचार मंत्री
मा.श्री.आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त भेटुन त्यांना शुभेच्छा दिल्या....
@AUThackeray#HappyBirthdayAUT
ब्राव्हो!!
#Paris2024 ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने दुसरे कांस्य पदक जिंकले.
मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्याबद्दल मनू भाकर आणि सरबज्योत सिंग ह्यांचे खूप खूप अभिनंदन.
त्याचबरोबर ऑलिम्पिक स्पर्धेत एकाचवेळी दोन पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय ठरली आहे. भारतीयांसाठी हा अभिमानस्पद क्षण आहे.
@realmanubhaker मनःपूर्वक अभिनंदन.
अभिमानास्पद!
महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या राधानगरीमधील स्वप्निल कुसळे ह्याने आज अप्रतिम कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले.
ऑलिम्पिक स्पर्धेतील पदार्पणातच ५० मीटर एयर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निलनं केलेली कामगिरी महाराष्ट्राची मान उंचावणारी ठरली आहे. ह्या नेमबाजी प्रकारात पदक पटकावणारा स्वप्निल पहिला भारतीय ठरला आहे.
स्वप्निल आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे.
@KusaleSwapnil
आज रंगशारदा येथे झालेल्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मार्गदर्शन करत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. ह्यावेळी युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्यजी ठाकरे उपस्थित होते.
गौरी गणपतीत जनतेला आनंदाचा शिधा देण्याच्या निमित्ताने मिंधे सरकारने पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मित्र कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट घातला आहे. मिंधे सरकारच्या ह्या मनमानी कारभाराला लगाम बसणार तरी कधी?
मिंधे-भाजप सरकारनं पुण्याचं वाटोळं केलंय.
‘पुणे रिव्हरफ्रंट प्रकल्पा’तील असंख्य चुकांमुळे पुण्याची दुरावस्था झाली. पुणे बुडालं, लाखो पुणेकरांच्या घरात पाणी घुसलं, करोडोंचं नुकसान झालं.
ह्याला जबाबदार असलेलं सरकार जनतेसमोर येतंय का? पुण्याच्या भविष्याबाबत खरंच कुणाला चिंता आहे का?
- आदित्य ठाकरे, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार
@AUThackeray
मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचा आधिकार संसदेलाच!
आरक्षणप्रश्नी संसदेत मोदींनी निर्णय घ्यावा, आम्हाला तो मान्य असेल.
- पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे