केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे .
मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं.
काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, 'लेम डक' प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला !
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती 'परीक्षा पे चर्चा' इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे.
आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा.
लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित ! २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे !
या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरतर निट सारख्या परिक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !
देवेंद्र फडणवीस,
तुमच्या लबाड्या, भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि अपयशावर टीका म्हणजे महाराष्ट्रावर टीका नव्हे.
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही आणि मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र तर अजिबात नाही.
महाराष्ट्राचा आडोसा घेऊन स्वतःवरील टीका दडपण्याचा हा बुद्धीभेद बंद करा.
आणि सोडणार नाही म्हणजे नेमकं काय करणार?
प्रश्न विचारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार, की टीका करणाऱ्यांना धमक्या देणार?
आत्ता कुठे पहिल्या थराचे टेस्टिंग चालू आहे.
पूर्ण थरथराट होईपर्यंत काही बोलू नका.
किती मिमी पाऊस आहे, किती कमी वेळात पडला आहे याची आकडेवारी फेकली जाईल तोंडावर.
मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का?
मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार!
#MissingLink #MissingSuraksha
#जनतेच्याजीवाशीखेळ #SafetyFirst #InfrastructureFailure
So missing link is now flooded and apparently closed.
Probably part of the first rain testing plan mentioned by CM Devendra Fadnavis the other day when speaking about 2 potholes.
Literally the first major rain and we are exposed!
You would think they plan for Landslides, heavy rains as the first thing when building a project in Sahyadris but no!
Corruption of the highest order?!?!?!
Video Source : instagram
मातीच्या आखाड्यापासून तर ऑलिम्पिकच्या मंचापर्यंतचा थक्क करणारा प्रवास असलेले आणि देशाला कुस्तीतील पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे मराठमोळे ऑलिम्पिकवीर #खाशाबा_जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारीत अंगावर शहारे आणणारा #खाशाबा हा चित्रपट लवकरच येतोय. मराठी मातीचा अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या पहिल्या ऑलिम्पिकवीराच्या गाथेचा हा टीझर मनापासून आवडला. नागराज मंजुळे यांनी नेहमीप्रमाणे प्राण ओतूनच हा चित्रपट बनवला असणार, यात शंका नाही. त्यांच्या या चित्रपटाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे.
असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे..
प्रौढप्रतापपुरंदर...क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.
#WATCH | Delhi | DGMO Lieutenant General Rajiv Ghai says, "Targetting our airfields and logistics is way too tough... I saw that Virat Kohli has just retired from test cricket; he is one of my favourites. In the 1970s, during the Ashes between Australia and England, two Australian bowlers destroyed the batting lineup of England, and then Australia gave a proverb - "Ashes to ashes, dust to dust, if Thommo don't get ya, Lillee must". If you see the layers, you'll understand what I am trying to say. Even if you crossed all the layers, one of the layers of this grid system will hit you ."
📍#BMC आंदोलन पाठिंबा निवेदन मोहीम 🔥
जिल्हा पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालघर team तर्फे निवेदन देण्यात आले...!
Good work team...👌👏👏🔥
#BMC_At_TCS_Ion_Centre
विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये आंदोलन केल्याशिवाय न्यायच मिळणार नसेल तर हे कुचकामी सरकार लोकांसाठी काम करत नाही, हा सरळसरळ अर्थ आहे..
मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षा मार्च महिन्यातील २,३,८ व ९ तारखेला घेण्यात येणार आहेत.. सदर परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावर न घेता खासगी संगणक केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार आहेत..
खासगी परीक्षा केंद्राऐवजी TCS ION च्या अधिकृत केंद्रावर परीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागील काही दिवसांपासून मागणी आहे.. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत..
महानगरपालिका प्रशासन आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात.. परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं असेल तर ही अत्यंत खेदाची बाब आहे..
विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, ही विनंती!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mybmc
#BMC_At_TCS_Ion_Centre