आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागात #YOUVAN अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🇮🇳
“काही काळ देशासाठी” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना स्वयंसेवा, सामाजिक उत्तरदायित्व व राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
#YOUVAN#GarwareCollege#YouthLeadership
Spicer Adventist University, पुणे येथे ‘YOUVAN’ अभियानाचे उद्घाटन! 🇮🇳
कुलगुरू डॉ. मिलिंद राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत YOUVAN अभियानाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. युवकांमध्ये नेतृत्व, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रनिर्मितीची भावना रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
🧘♀️ फर्ग्युसन कॉलेजमध्ये ‘YOUVAN’ अंतर्गत ‘Breath & Balance’ योग सत्र!
दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी YOUVAN व NSS यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्रात २४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. योग व श्वसनाच्या माध्यमातून मानसिक संतुलन, शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी
🌱 SM Joshi महाविद्यालयात ‘YOUVAN’ अंतर्गत प्लास्टिक संकलन व जनजागृती!
१० ऑगस्ट २०२६ रोजी सुमारे १५० विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लास्टिक कचरा संकलित करून वर्गीकरण केले. त्यानंतर प्लास्टिक प्रदूषण, पर्याय व पर्यावरणपूरक जीवनशैलीवर जनजागृती सत्र घेण्यात आले.
इथापे इन्स्टिट्यूट, संगमनेर येथे ‘YOUVAN’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🇮🇳
६ ऑगस्ट २०२६ रोजी पोस्टर अनावरण व विद्यार्थी नोंदणीसह अभियानाची सुरुवात झाली. सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विवेकजी कोथमीरे यांनी ‘काही काळ देशासाठी’ उपक्रम
Sandip Foundation, नाशिक येथे YOUVAN अभियानाची संकल्पना, उद्दिष्टे आणि “काही काळ देशासाठी” उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. युवकांनी पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, स्वयंसेवा व राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
हडपसर येथील गोंधळेनगर सिग्नलवर #YOUVAN अंतर्गत जनजागृती अभियान राबविण्यात आले. ८ महाविद्यालयीन युवकांनी स्वदेशी भारत, पर्यावरण, आत्मनिर्भर भारत, आरोग्य, शिक्षण व सामाजिक जागरूकतेचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवले. नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सकारात्मक प्रतिसाद दिला.
इचलकरंजी येथे #YOUVAN अंतर्गत डेंग्यू जनजागृती अभियान राबविण्यात आले.
स्वयंसेवकांनी १८० हून अधिक घरांना भेट देत डेंग्यू प्रतिबंध, स्वच्छता आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपायांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली.
युवा संघटित • युवा सजग • राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित
सरस्वती नाईट कॉलेज, शुक्रवार पेठ येथे #YOUVAN अंतर्गत नशामुक्ती जनजागृती अभियान!
विद्यार्थ्यांमध्ये नशेचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनशैली आणि सामाजिक जबाबदारी याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.
"नशामुक्त युवा • सक्षम समाज • समर्थ भारत"
#YOUVAN#Nashamukti#DrugFreeYouth
YOUVAN अंतर्गत MIT येथील विद्यार्थ्यांनी कोरीगड किल्ल्यावर ट्रेकिंग व अभ्यास मोहीम राबवली. 🏞️
इतिहास, निसर्ग, साहस आणि नेतृत्वाचा संगम अनुभवत युवकांनी शारीरिक तंदुरुस्ती, टीमवर्क आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा घेतली.
#YOUVAN#MIT#Korigad#YouthLeadership#Heritage
सह्याद्री ज्युनियर कॉलेज, चाकण येथे #YOUVAN अंतर्गत Seed Ball व कंपोस्ट खत निर्मिती कार्यशाळा उत्साहात पार पडली. 🌱
२०० विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत Seed Ball तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. यावेळी YOUVAN अभियानाच्या पोस्टरचेही अनावरण करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'YOUVAN' नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये YOUVAN अभियानांतर्गत नोंदणी अभियान राबविण्यात आले.
युवकांना "काही काळ देशासाठी" या संकल्पनेशी जोडत सामाजिक उत्तरदायित्व, स्वयंसेवा, नेतृत्व
आणि राष्ट्रनिर्मितीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.
या अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध विभागांमधून आतापर्यंत १५४ विद्यार्थ्यांनी YOUVAN अभियानासाठी नोंदणी केली आहे.