MPSC च्या विद्यमान अध्यक्षांची उद्या पत्रकार परिषदेत पोलखोल.. (पार्ट – 1)
भेटू उद्या (गुरुवार, दि. १०) दुपारी २.४५ वा.
स्थळ – पत्रकार संघ, पहिला मजला,
गांजवे चौक, पुणे.
सदसद् "विवेकबुद्धी" व "नैतिकता" गहाण ठेवलेल्या #MPSC अध्यक्षांवर बोलू काही...
👉संवैधानिक आयोगाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदाचा कार्यभार स्वीकारताना पद व ग��पनीयतेची शपथ घेतली होती. विसरलात काय,
👉तीच “गोपनीयता”, जिचे ऋषिकेश गांगुर्डे यांनी निडरपणे वाभाडे काढले आणि संपूर्ण देशभर पेपरफुटीमुळे #MPSC ची नाचक्की झाली व इज्जतीचे धिंडवडे वेशीवर टांगले गेले.
यावर आपण “अविवेकी” विचार करून बालिश कारणे देण्याचा “भीम” परा��्रम करत आहात. त्यावर मी एकच बोलतो
👉“तू इधर-उधर की न बात कर, ये बता कि काफिला क्यों लुटा;
👉आपल्या म्हणण्यानुसार, औषध निरीक्षकाचा पेपर जानेवारीत फुटला होता; त्यावेळी मी अध्यक्ष नव्हतो.
मग या प्रश्नांची उत्तरे द्या.
१) पेपरफुटी जानेवारीपासून मार्चपर्यंत सुरू होती का?
२) नेमका पेपर किती वेळा फुटला?
३) किती जणांनी फोडला?
४) किती जणांसाठी फोडला?
जर खरंच पेपर जानेवारीत फुटला होता व आपणास त्���ाची कल्पना नव्हती, हे सत्य असेल तर तत्कालीन अध्यक्ष श्री. अभय वाघ ( प्रभारी )यांच्यावर अद्याप आपण कारवाई का केली नाही?
त्यांना या प्रकरणात सहआरोपी का केले नाही?
किंवा अगदीच काही नाही, तर किमान जबाबदारी स्वीकारून वाघ यांना राजीनामा देण्यास का सांगितले नाही?
👉सर्वात महत्त्वाचे...
आपण यापूर्वी शासन सेवेत भ्रष्टाचार केला किंवा नाही, यानंतर काय करणार,यापेक्षा पेपरफुटीनंतर पदाला चिकटून राहण्याची प्रवृत्ती व दुसऱ्यावर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्राला स्पष्टपणे दिसतोय.
👉आपण ना खुर्ची सोडत आहात, ना सोडायला लावत आहात.
आपण खरंच “निरपराध” असाल, तर लक्षपूर्वक वाचा,
“नैतिक जबाबदारी”
लोकशाहीमध्ये “नैतिकता” हा सुशासनाचा कणा असतो.एखादी दुर्घटना घडते किंवा मोठे प्रशासकीय अपयश येते, तेव्हा संबंधिताने स्वतःला जबाबदार धरणे व पदत्याग करणे हेच उच्च राजकीय/प्रशासकीय नैतिकतेचे लक्षण असते.
मग वैयक्तिक दोष असो वा नसो.
👉नैतिकतेचे सर्वोच्च प्रतीक असलेले स्व. श्री. लालबहादूर शास्त्री यांनी १९५६ मध्ये झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
“मी रेल्वे चालवत नव्हतो,” असे का��ण त्यांनी दिले नाही.
👉पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी व उत्तरदायित्व कुणाचे आहे?
👉आपण राजीनामा देणार / हकालपट्टी होणार?
की गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आम्हालाच कठोर पावले उचलावी लागणार?
हे येणारा काळ ठरवेल.
👉जाता जाता
नैतिक जबाबदारीने दिलेला राजीनामा हा केवळ राजकीय किंवा प्रशासकीय बदल नसून, व्यवस्था अजूनही संवेदनशील असल्याची जनतेला खात्री देणे होणे
राजीनामा देणे म��हणजे पळपुटेपणा नव्हे, तर लोकशाही प्रणालीवरील विश्वास दृढ ठेवण्याचे साधन आहे.
त्यामुळे निरपराध असाल / नसाल,“विश्वासार्हता गमावलेली असल्याने तात्काळ निर्णय घ्या.
तूर्तास इतकंच, बाकी उद्या.......
@bhimanwar
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@RahulGandhi @PawarSpeaks
@NANA_PATOLE @INCHarshsapkal
@supriya_sule @vishwajeetkadam
@mpsc_office @satejp
@atullondhe @Jayant_R_Patil @VijayWadettiwar
#MPSC च्या उत्पादन शुल्क (विभागीय) परीक्षेत मार्कि���ग पॅटर्न लीक करण्यात दुसरं-तिसरं कुणी नाही तर चक्क आयोगाचाच सह सचिव दर्जाचा अधिकारी दोषी असल्याची माहिती समोर आली आहे. हे शॉकिंग आहे. इकडं विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि तिकडं आयोगाने पेपर विकायचे, हे बिलकूल खपवून घेतलं जाणार नाही.
म्हणूनच आजचा हा आक्रोश मोर्चा आहे.
#MPSC च्या शुद्धीकारणाशिवाय हा लढा थांबणार नाही..!
#विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी
पेपरफुटीप्रकरणी MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा आणि या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी, यासह लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या इतरही काही मागण्या आहेत. याच मागण्यांच्या पार्श्वभूमीवर ‘विद्यार्थ्यांच्या हक्कास��ठी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर चौकापासून (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल) जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी १० वाजता विद्यार्थी आणि शिक्षकांचा विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या आक्रोश मोर्चात मीदेखील सहभागी होणार असल्याचा शब्द पुण्यात विद्यार्थ्यांशी बोलताना दिला आहे. त्यास��ठी पोलीस सहआयुक्त संजय दराडे साहेब, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे साहेब, उपायुक्त ऋषिकेश रावले साहेब आणि मिलिंद मोहिते साहेब यांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी देण्याची विनंती केली. या भेटीवेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सुनील माने, प्रमोद पाटील, विविध क्लासेसचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी त्यांच्यासोबत कालही ���ोतो, आजही आहे आणि यापुढेही कायम राहणार आहे. सरकारला २ दिवसांचा वेळ आहे. या काळात सरकारने अध्यक्षांना हटवून विद्यार्थ्यांच्या इतरही मागण्या मान्य केल्या नाहीत, तर संघर्ष अटळ आहे. येत्या काळात आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून या संघर्षाची व्याप्तीही वाढवू आणि विद्यार्थी व शिक्षकांची ताकद सरकारला दाखवून देऊ आणि निर्णय घेण्यास भाग पाडू..!
#विराट_आक्रोश_मोर्चा #Protest #MPSC
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तयारीला लागा…
सोमवारी तुमच्या हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा….
आज रस्त्यावर उतरला नाही तर कायम रस्त्यावर रहावं ��ागेल आणि घोटाळे करणारे महत्त्वाच्या पदांवर जाऊन तुमच्या डोक्यावर बसतील.
म्हणूनच जिंकण्यासाठी हक्काचा लढा लढू आणि न्याय मिळवू…!
#विद्यार्थी_हक्काचा_लढा
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही आहे प्रामाणिक भावना… त्यामुळं MPSC वरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी सध्याच्या अध्यक्षांपासून सर्वांनाच बद���ून पारदर्शक आणि स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांच्या हाती एमपीएससीचा कारभार देणं आवश्यक आहे. सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
MPSC पेपर फुटी मध्ये जे आरोपी पकडले ते फक्त मोहरे आहेत, या पेपर फुटीमध्ये अध्यक्ष, सचिव, सदस्य व मंत्रालयातून डेप्युटेशन वर आलेले अधिकारी यांनाही सहआरोपी करून यांची हकालपट्टी करावी. तरच 7 सप्टेंबर रोजीच्या मुलाखती पारदर्शक होतील व मागील परीक्षांच�� पारदर्शक चौकशी होईल. या चौकशीसाठी SIT नेमणे गरजेचे असतानाही अजूनही सरकार कशाची वाट पाहत आहे. अध्यक्ष, सचिव व काही अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय का? मुख्यमंत्री यावर काहीच का बोलत नाहीत? एक आमदार सोडता विरोधक व सत्ताधारी आमदार, खासदार या पेपर फुटीवर का काहीच बोलत नाहीत?
विद्यार्थ्यांचे भविष्य चोरणाऱ्यांविरोधात विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरणा�� मग पोलिसांनी दबाव आणला तरीही आणि लाठीचार्ज झाला तरीही.
मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे ही विनंती.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @mieknathshinde @SunetraA_Pawar
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे येत असून कुंपणच शेती खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जसजशी नवीन माहिती समोर येत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे आपण आता मैत्री बाजूला ठेवून बघ्याची भूमिका न घेता तत्काळ अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून चांगल्या व्यक्ती त्या जागी नेमण्यात याव्यात. प��लीस करत असलेला तपास समाधानकारक असला तरी केवळ एक दोन नावापुरता तपास मर्यादित न ठेवता आम्ही जी शेकडो नावे दिली आहेत त्यांचा देखील सखोल तपास होणे गरजेचे आहे, तरच खरे सूत्रधार असलेले मोठे मासे जाळ्यात अडकतील.
(अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही.)
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न व औषध निरीक्षक पदभरतीचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. MPSC तील 3 अधिकाऱ्यांना अटक देखील झालेली आहे. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. अन्यथा यांच्या राजीनामा साठी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी तर करणारच आहे. शिवाय MPSC चे अध्यक्ष व सदस्य हे राजकीय संपर्क विर���ित असणारेच असावे व सचिव हा मंत्रालय कॅडर चा नियुक्त न करता वरिष्ठ IAS दर्जाचाच असला पाहिजे, यासाठी देखील प्रभावी मागणी करणार आहे. आयोगाच्या सध्याच्या सहसचिव व परीक्षा नियंत्रक यांच्या प्रतिनियुक्ती करिता आयोगाची मान्यता नसताना आयोगाच्या परस्पर मनमानीपणे मंत्रालयातील अधिकारी एकतर्फी पाठविण्याच्या निर्णयाची व यासंदर्भात आयोगाच्या अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी कराव�� तसेच सदर पदावरील व्यक्तीची नियुक्ती नियम बाह्य असल्याने ती तत्काळ रद्द करावी प्रश्न फुटी संदर्भात प्राथमिक जबाबदारी परीक्षा नियंत्रक यांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा गरज पडली तर विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई देखील लढू. पण विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम नक्की करू.
Sunday Wisdom!दिवंंगत डाॅ.कर्णिक मलोआ चे अध्यक्ष असतांनाच्या कार्यकाळात घडलेल्या खान्देशातील उमेदवारांच्या एका प्रकरणानंतर आता पुन्हा खान्देशातील दुसर्या प्रकरणी आयोगाची अब्रु ध��ळीत.मधल्या काळात महत्प्रयासाने #MPSC ची विश्वासार्हता उंचावून ती जपण्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांवर या पेपरफूटी प्रकरणाने पाणी.
औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेसाठी पेपर सेटर्सच्या निवडीमधे अवलंबली गेलेली कार्यपद्धत,पेपर सेटींग सारख्या संवेदनशील व गोपनीय कामकाजासाठी विषयतज्ञ व संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांकरीता घालूून दिलेली आचार संहिता व अंगभूत सुरक्षा प्रणाली यांचे या प्रकरणी काटेकोर अनुपालन,याबाबतची वस्तुस्थिती व प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामकाज प्रत्यक्ष सुरु झाल्याच्या दिवसापासून ते पेपर्स परीक्षा केन्द्रांकडे (दूरवरच्या व स्थानीय सुद्धा) रवाना होईपर्यंतच्या संपूूर्ण कालावधीतील,आयोगाचा कार्यालयीन परीसर व गोपनीय परीक्षा कक्षाचे सीसीटीव्ही चित्रिकरण,यांच्या सखोल अंतर्गत पडताळणी अंत��� आयोगाला निश्चीत निष्कर्षांप्रत पोहोचणे शक्य.
पूर्वपरीक्षा+लेखी परीक्षा वा केवळ लेखी/चाळणी परीक्षा या दोहोंसाठी विषयतज्ञांच्या निवडीचे निकष व कार्यपद्धती,पेपर सेटींगचे संवेदनशील कामकाज,छपाई,साठवणूक, वाहतूक व आनुषंगिक सुरक्षा प्रणाली आणि संवेदनशील परीक्षा विभागात अधिकारी/कर्मचारी नियुक्तीस्तव योग्यता या बाबींचा आयोगाने "सर्वांप्रती अविश्वास" या तत्वावर संर्वकष फेेरआढावा घे��� कार्यनियम व मानक कार्यपद्धतीतील उणीवा तातडीने दूर करून ती अधिक सक्षम करणे गरजेचे!
मा.देवेंद्र फडणवीस साहेब,
पेपर फोडणारा कोणाचा कार्यकर्ता आहे यासंदर्भात आपली प्रतिक्रिया ऐकली. आयोगाचा पे��र फुटला आहे, एवढी गंभीर आणि संवेदनशील बाब असताना आपण ४o पैसे वाले ट्रोलर्स लिहीत असलेल्या पोस्टचा रेफरन्स देऊन प्रतिक्रिया देत आहात, हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजिबात शोभणारे नाही.
कोणासोबत फोटो हे दाखवायचे झाले तर भाजपा नेत्यांसोबत हजारो फोटो दाखवू शकतो. असो आपण ट्रोलर्सचा रेफरन्स देणार असाल तर माझ्या कार्यकर्त्याला आपण आपली भाजपचीच सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत थेट पुणे मह��पौर यांचे OSD म्हणून नेमले, याचे मात्र मला आश्चर्य वाटले.
अजूनही वेळ गेलेली नाही, थोडे गांभीर्य दाखवा आणि आयोगाच्या अध्यक्षपदी आपण जे आपले जवळचे मित्र बसवले आहेत ना त���यांना आधी पदमुक्त करा आणि स्वच्छ व्यक्ती त्या जागी बसवा.
(टिप - मी पुराव्याशिवाय बोलत नाही)
@Dev_Fadnavis
१९९७ मध्ये पेपर घोटाळा झाला तेंव्हा तत्कालीन MPSC च्या अध्यक्षांना जबाबदार धरुन त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आता ३० वर्षांनी पुन्हा MPSC ला पेपरफुटीचा डाग लागला असून आताही १९९७ चाच न्याय विद्यमान अध्यक्षांना का लावला जाऊ नये? याबाबत काय करायचं ते सरकारने ठरवावं, पण आम्ही १ तारखेला आयोगाच्या भेटीसाठी जाऊ तेंव्हा निष्कलंक आणि स्वच्छ चारित्र्याच्या नवीन अध्यक्षांसोबत आमची भेट होईल, अशी अपेक्षा आहे.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी