🌱 मा. देवेंद्रजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले निरोगी, दीर्घायुषी आणि समाजहितासाठी प्रेरणादायी जीवन लाभो, हीच सदिच्छा.
५६ वा वाढदिवस – ५६,००० वृक्षांचा हरित संकल्प!
(अनुलोम सामाजिक संस्था कोकण विभाग, ठाणे उपविभाग)
#Anulom#HBD_Devabhau#Dev_Vruksha#देववृक्ष_अभियान
"कान्होजी आंग्रे यांचे भारतीय इतिहासात एक विशेष व महत्त्वपूर्ण स्थान आहे. सुमारे चार दशकांपर्यंत ते पश्चिम किनारपट्टीवरील सागरी शक्तींसाठी भयाचे कारण ठरले. त्यांनी आपल्या नौसैनिकांचे नेतृत्व करत सातत्याने विजय मिळवले आणि महाराष्ट्राच्या नौदल गौरवाला असामान्य उंचीवर नेले."
-- इतिहासकार डॉ. सुरेंद्रनाथ सेन
भारतीय इतिहासातील महान दर्यावर्दी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा आरमाराची परंपरा समर्थपणे पुढे नेत इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि जंजिरेकर सिद्दी यांना पश्चिम किनारपट्टीवर प्रभावी आव्हान दिले. इ.स. १६६९ मध्ये काळोसे येथे जन्मलेल्या कान्होजींना वडील तुकोजी आंग्रे यांच्याकडून लहानपणापासूनच सागरी युद्धकलेचे प्रशिक्षण मिळाले. तुकोजी आंग्रे शिवछत्रपतींच्या आरमारात कार्यरत होते. औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेनंतर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मराठा आरमाराचे नेतृत्व स्वीकारून हिंदवी स्वराज्याच्या सागरी सार्वभौमत्वाचे यशस्वी रक्षण केले.
इ.स. १६९४ पासून सरखेल कान्होजी आंग्रेंनी कोकणातील अनेक सागरी किल्ले पुन्हा स्वराज्यात आणून सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा आणि खांदेरी यांचे संरक्षण मजबूत केले. इ.स. १६९६ मध्ये कुलाबा किल्ला जिंकल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना मराठा आरमाराचे प्रमुख म्हणून "सरखेल" हा किताब दिला. त्यांनी आरमाराची पुनर्रचना करून ते अधिक सक्षम केले. राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांनी महाराणी ताराबाईंचे समर्थन करत कोकण किनारपट्टीवरील मराठा सत्ता टिकवून ठेवली. सरखेल कान्होजी आंग्रेंनी "दस्तक" व्यवस्था लागू करून मराठा सागरी सार्वभौमत्व प्रभावीपणे प्रस्थापित केले. कुलाबा व विजयदुर्ग येथे जहाजबांधणी विकसित करून त्यांनी सक्षम आरमार उभे केले आणि कोकण किनारपट्टीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा फायदा घेत इंग्रज व पोर्तुगीजांना अनेकदा पराभूत केले. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्याविरुद्ध बहिरोपंत पिंगळे यांना पाठवले परंतु ते पराभूत होऊन कैद झाले. त्यानंतर बाळाजी विश्वनाथांनी मुत्सद्देगिरीने तह घडवून कान्होजी आंग्रेंना शाहू महाराजांच्या बाजूने आणण्यात यश मिळवले.
४ नोव्हेंबर १७१२ रोजी त्यांनी मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरचे खासगी जहाज पकडून खंडणी घेतली तर इ.स. १७१३ मध्ये इंग्रजांची अनेक ठाणी व किल्ले ताब्यात घेतले. त्यांच्या पराक्रमामुळे कच्छपासून त्रावणकोरपर्यंत मराठा आरमाराचे प्रभावी सागरी वर्चस्व प्रस्थापित झाले. पोर्तुगीजांच्या अधिकृत पत्रव्यवहारात त्यांचा उल्लेख सर्वांत सामर्थ्यवान शत्रू म्हणून करण्यात आला असून त्यांच्या प्रभावामुळे सुरतचा व्यापारही बाधित झाल्याची नोंद आहे. इ.स. १७१५ नंतर सरखेल कान्होजी आंग्रेंनी कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या सागरी किल्ल्यांच्या बळावर पश्चिम किनारपट्टीवर मराठा आरमाराचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. इ.स. १७१७ मध्ये सरखेल कान्होजी आंग्रेंनी खांदेरीवरील इंग्रजांचा मोठा हल्ला परतवून लावत त्यांना मोठे नुकसान सोसण्यास भाग पाडले. त्यानंतर इ.स. १७१८ मध्ये त्यांनी मुंबई बंदराची प्रभावी नाकेबंदी करून इंग्रजांचा सागरी व्यापार ठप्प केला.
सरखेल कान्होजी यांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे इंग्रज, पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्दी यांनी २१ डिसेंबर १७२१ रोजी संयुक्त आरमारी मोहीम उभारली. परंतु कान्होजी आंग्रेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरमाराने हा हल्ला परतवून लावत शत्रूचा दारुण पराभव केला. सरखेल कान्होजी आंग्रेंनी पिलाजीराव जाधव यांच्या सहकार्याने इंग्रज–पोर्तुगीज संयुक्त मोहिमेचा पराभव करून कोकण किनारपट्टीवरील मराठा आरमाराचे वर्चस्व अधिक बळकट केले. त्यांच्या प्रभावी युद्धनीती, कुशल नाविक आणि अभेद्य सागरी किल्ल्यांमुळे चार्ल्स बून यांची मोहीम पूर्णपणे अपयशी ठरली आणि पश्चिम किनारपट्टीवर मराठा आरमार जवळजवळ अजिंक्य असल्याचे सिद्ध झाले. इ.स. १७२३ मध्ये सरखेल कान्होजी आंग्रेंनी ईगल आणि हंटर या ब्रिटिश जहाजांवर यशस्वी कारवाई करून इंग्रज व्यापाऱ्यांमध्ये मराठा आरमाराची दहशत निर्माण केली. सरखेल कान्होजी आंग्रे हे कुशल प्रशासक आणि दूरदर्शी संघटकही होते.
छत्रपती शाहू महाराजांनी सरखेल कान्होजी आंग्रेंच्या पराक्रम व निष्ठेचा गौरव करून मराठा आरमाराला मराठा साम्राज्याचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनवले. ४ जुलै १७२९ रोजी अलिबाग येथे सरखेल कान्होजी आंग्रेंचे निधन झाले. पुढे भारतीय नौदलाने मुंबईतील आयएनएस आंग्रे या नौदल तळाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे. स्वराज्यनिष्ठ दर्यावर्दी, सरखेल कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩
#दर्याभवानी #कान्होजी_आंग्रे #मराठा_आरमार
असंख्य स्वप्नांना नवी दिशा देत, समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या अनुलोम संस्थेच्या दशकपूर्ती निमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐
#Anulom#अनुलोम_दशकपूर्ती#दशकपूर्ती_जनसेवेची
गणेश खिंडीतला गणपती पावला !
१८९६-९७ मध्ये पुणे शहरावर प्लेगच्या भीषण साथीचे संकट कोसळले. हजारो नागरिक या रोगाने बाधित झाले होते आणि मृत्यूचे प्रमाणही वाढत होते. या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने वॉल्टर चार्ल्स रँड याची पुण्याच्या प्लेग आयुक्तपदी नियुक्ती केली. सुरुवातीला रोगनियंत्रणाच्या उद्देशाने सुरू झालेल्या उपाययोजना हळूहळू दडपशाहीचे स्वरूप धारण करू लागल्या. ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱ्यांची पथके घराघरांत घुसून तपासण्या करू लागली. महिलांच्या गोपनीयतेचा भंग करणे, धार्मिक स्थळांची विटंबना करणे, देवघरांची नासधूस करणे, संशयितांना जबरदस्तीने विलगीकरण छावण्यांमध्ये नेणे अशा प्रकारच्या कारवायांमुळे पुणेकरांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. लोकमान्य टिळकांनी केसरीमधून या अत्याचारांवर कठोर टीका केली.
पुण्यातील चिंचवड येथील कीर्तनकार हरिपंत चापेकर यांचे तीन पुत्र दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे त्यांच काळात राष्ट्रभक्तीच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करत होते. व्यायामशाळा, युवक संघटन आणि राष्ट्रजागृतीच्या माध्यमातून ते तरुणांना संघटित करत होते. टिळकांच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव होता. प्लेगच्या नावाखाली होत असलेले अत्याचार पाहून त्यांच्या मनात रँडविषयी तीव्र संताप निर्माण झाला. त्यांनी रँडला शिक्षा करून जनतेच्या अपमानाचा सूड उगवण्याचा निर्धार केला. २२ जून १८९७ रोजी इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाच्या हीरक महोत्सवानिमित्त पुण्यातील गणेशखिंड येथील गव्हर्नमेंट हाऊसमध्ये भव्य मेजवानी आयोजित करण्यात आली होती. रँड या समारंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती चापेकर बंधूंना होती. त्यांनी याच दिवशी आपली योजना प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले. दामोदर, बाळकृष्ण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेशखिंड परिसरात सापळा रचला.
मेजवानी संपल्यानंतर रात्री उशिरा रँडची बग्गी गणेशखिंडीच्या रस्त्याने निघाली. ठरल्याप्रमाणे "गोंद्या आला रे आला" हा संकेत देण्यात आला. बाळकृष्ण चापेकर यांनी प्रथम गोळी झाडली. मात्र ती रँडऐवजी लेफ्टनंट चार्ल्स एगर्टन आयर्स्टला लागली. त्यानंतर दामोदर चापेकर यांनी रँडच्या बग्गीवर झेप घेत त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. आयर्स्टचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेला रँड ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. त्याच रात्री पुण्यातील केसरी वाड्यात एक कार्यक्रम सुरू होता. लोकमान्य टिळक सभास्थानी उपस्थित होते. हल्ला यशस्वी झाल्यानंतर एक तरुण घाईघाईने तेथे पोहोचला आणि टिळकांच्या कानात त्याने हळूच निरोप सांगितला, "खिंडीतला गणपती नवसाला पावला." हा सांकेतिक संदेश रँडवधाची मोहीम यशस्वी झाल्याचे सूचित करणारा होता.
सदर घटनेमुळे संपूर्ण ब्रिटिश प्रशासन हादरले आणि भारतातील इंग्रज सत्तेला प्रथमच संघटित सशस्त्र प्रतिकाराचा सामना करावा लागला. आरोपींचा शोध घेण्यासाठी सरकारने २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेरीस गणेश आणि रामचंद्र द्रविड यांच्या फितुरीमुळे चापेकर बंधूंचा ठावठिकाणा समजला आणि दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव चापेकर यांना अटक करण्यात आली. दामोदर चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आली. त्यानंतर द्रविड बंधूंनी केलेल्या फितुरीचा सूड घेण्यासाठी वासुदेव चापेकर आणि महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंचा वध केला. पुढे वासुदेव चापेकर, महादेव रानडे आणि बाळकृष्ण चापेकर यांनाही १८९९ मध्ये फाशी देण्यात आली. अशा प्रकारे चापेकर बंधूंनी राष्ट्रकार्यासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले.
चापेकर बंधूंचे बलिदान भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरले. १८५७ नंतर सशस्त्र क्रांतीची ज्योत पुन्हा प्रज्वलित करणाऱ्या या घटनेने अनेक तरुणांना सशस्त्र क्रांतिकार्याची प्रेरणा दिली. विनायक दामोदर सावरकर यांच्यावर या घटनेचा खोल प्रभाव पडला आणि त्यांनी पुढे सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. रँड वध हे ब्रिटिश दडपशाहीविरुद्ध भारतीय स्वाभिमानाने दिलेले धाडसी आणि संघटित प्रत्युत्तर होते. चापेकर बंधूंच्या शौर्य व बलिदानाने भारतीय क्रांतिकारक चळवळीला नवी प्रेरणा मिळाली.
#रँड_वध #चापेकर_बंधू #सशस्त्र_क्रांती #पुणे
@KDMCOfficial आपण ज्या PR एजन्सीला सोशल मीडियावर प्रसिद्धीचे काम दिले असेल तर ते काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे समजून येते जर या एजन्सीला कार्यक्रम हा शब्द कसा लिहावा हेच माहित नाही यावरून महानगरपालिकेने हे काम कुठल्या निकषाने दिले हा एक प्रश्न उभा राहतो
कारेक्रम नसून कार्यक्रम
@RajThackeray राज ठाकरे यांना एक सांगू इच्छितो, आपल्या सभेला जी काही गर्दी जमते ती काही आपल्या प्रेमापोटी न येता फक्त time pass नकला बघायला येते... नाहीतर असल्या नकल्यांच्या भाषणाला गर्दी करून लोकांनी मत नसती का दिली.
त्यामुळे ती लोक आपल्यासाठी येतात हा गैरसमज मनातून काढून टाका.
तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु 🙏🚩
रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जातिभेदांविरोधात ठाम आणि कृतीशील भूमिका घेतली. त्याच संघर्षाचे मूर्त स्वरूप म्हणजे श्री पतितपावन मंदिर होय. भागोजीशेठ कीर यांच्या सहकार्याने सुमारे ३ लाख रुपये खर्च करून सर्व जातींतील लोकांसाठी खुले असे हे मंदिर उभारण्यात आले. मंदिरात लक्ष्मी नारायणाची अत्यंत सुंदर मूर्ती असून कोणत्याही जातीचा भक्त गर्भगृहापर्यंत जाऊन पूजा करू शकतो.
मंदिर परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर, शंकराचार्य कुर्तकोटी, समर्थ रामदास आणि गाडगेबाबा यांची चित्रे आहेत. सणासुदीला भक्तांकडून रांगोळ्यांनी सुंदर सजावट केली जाते. सुमारे २० हजार चौरस फूट जागेत बांधलेले हे मंदिर २२ फेब्रुवारी १९३१ रोजी भागोजीशेठ कीर आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणाच्या वेळी सर्व जातीतील लोकांचे क्रांतिकारी सहभोजन झाले, ज्यात सुमारे दीड हजार लोक सहभागी झाले. काळाराम मंदिर सत्याग्रहानंतर अवघ्या एका वर्षात ही घटना घडली. याच प्रसंगी सर्वजातीय महिलांचेही सहभोजन झाले असून त्याचे नेतृत्व कोल्हापूरच्या सत्यशोधक समाजातील श्री माधवराव बागल यांच्या पत्नीने केले.
जातीभेद नष्ट करणे हा केवळ तात्त्विक मुद्दा नसून तो आचरणात आणण्याचा विषय आहे असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ठाम मत होते. भागोजीशेठ कीर हे भंडारी समाजातील सधन गृहस्थ होते. शिवभक्त असूनही सामान्य मंदिरात प्रवेश न मिळाल्याने त्यांनी स्वतःसाठी खासगी शिवमंदिर बांधले होते. ही बाब कळल्यानंतर सावरकरांनी त्यांना सर्व हिंदूंकरिता खुले असे मंदिर उभारण्याचा सल्ला दिला. या मंदिरात शूद्राच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरले. प्रत्येक हिंदूस वेदोक्ताचा अधिकार आहे, असा सावरकरांनी आग्रह धरला. तत्वाशी तडजोड न करता त्यांनी स्पष्ट सांगितले की, गरज पडल्यास अखिल हिंदू समाजाच्या सहभागाने मूर्तीस्थापना केली जाईल. मसूरकर महाराजांच्या आश्रमातील वेदशास्त्रसंपन्न गणेशशास्त्री मोडक यांनी वेदोक्त विधीने भागोजीशेठ कीरांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
पतितपावन म्हणजे पतितांना पावन करणारे. जन्माधिष्ठित जातीच्या कारणावरून कोणत्याही हिंदूस मंदिरप्रवेश नाकारला जाऊ नये हा सावरकरांचा मूलभूत विचार होता. समाज पूर्णपणे हा विचार स्वीकारेपर्यंत निदान एक तरी असे मंदिर असावे जिथे सर्व हिंदूंना मुक्त प्रवेश असेल या संकल्पनेतून हे मंदिर उभे राहिले. १० मार्च १९२९ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी रत्नागिरीच्या वरच्या आळीत सावरकरांनी या मंदिराच्या स्थळी भाषण केले. त्या दिवशी संपूर्ण रत्नागिरीत उत्सवाचे वातावरण होते. विविध जातींची सरमिसळ झालेला हजारोंचा जमाव हे त्या काळात अपूर्व दृश्य होते.
अंदमानातील ११ वर्षांच्या बंदिवासानंतर १९२४ पासून सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते. राजकीय आणि सामाजिक क्रांती ही राष्ट्राची दोन चाके आहेत या भूमिकेतून त्यांनी जातिभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक बंधने दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले. भजन-कीर्तन, सार्वजनिक कार्यक्रम, सहभोजन आणि मंदिरप्रवेश अशा माध्यमांतून त्यांनी स्पृश्य-अस्पृश्य सरमिसळीची सवय समाजाला लावली. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळणे हे त्याचे फलित होते.
संपूर्ण हिंदू समाज परकीय जोखडामुळे पतित झाला असून त्याला पावन करणारे हे मंदिर आहे असे सावरकरांनी स्पष्ट केले. दोन वर्षांत मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि "हिंदू धर्म की जय"च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आजही रत्नागिरीतील हे पतितपावन लक्ष्मीनारायण मंदिर हिंदू समाजातील समता, निर्भय सुधारणा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून उभे आहे. श्रीमंत-गरीब, सवर्ण-दलित, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता सर्वांना मोक्षाचा संदेश देणारे हे मंदिर हिंदू समाजाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे.
#समाजसुधारक #स्वातंत्र्यवीर_सावरकर #रत्नागिरी