२०२२ मध्ये #PSI झालेल्या उमेदवारांचं ४० दिवसांच्या आत प्रशिक्षण सुरु होईल, असा शब्द संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन दिला होता. त्यानुसार अखेर नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीने राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र देऊन ९ जूनपासून या उमेदवारांचं प्रशिक्षण सुरु करण्याबाबतचं पत्र दिलं. हा विषय विधानसभेच्या अधिवेशनातही मी मांडला होता आणि अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेटही घेतली होती. तसंच इतर मंडळींनीही या विषयासाठी प्रयत्न केले असतील. अखेर आमच्या सर्वांच्याच प्रयत्नांना यश आलं असून याबाबत सहकार्य केलेल्या सर्वच पोलिस अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार आणि तीन वर्षांपासून प्रशिक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या भावी पोलिस अधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा!
राज्यातील २०२२ ची PSI भरती पूर्ण होऊनही निवड झालेल्यांचं अद्याप प्रशिक्षण सुरु झालेलं नाही. राज्यात एकीकडं पोलिसांवर कामाचा ताण वाढत असताना दुसऱ्या बाजूला निवड झालेल्या पोलिसांना प्रशिक्षणाकडं डोळे लावून बसण्याची वेळ आलीय. विधीमंडळाच्या अधिवेशनातही हा विषयाकडं सरकारचं लक्ष वेधलं होतं तसंच अधिकाऱ्यांनाही पत्र दिलं आहे. आजही याबाबत अधिकाऱ्यांसोबत या विषयाबाबत चर्चा झाली… निवड झालेल्या या सर्व उमेदवारांचं पुढील ४० दिवसांत प्रशिक्षण सुरु होईल, असा विश्वास त्यांना दिला. आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#PSIभरती2022 | #न्याय_मिळाला_पाहिजे | #पोलीस_प्रशिक्षण |
@DGPMaharashtra आपणास विनंती की गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 ची नियुक्ती प्रक्रिया रखडलेली आहे, आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी ही विनंती, कारण आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही प्रक्रिया उशिरा चालू आहे. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
संयुक्त गट ब परिक्षा २०२२ मधील पोलीस उप-निरीक्षक पदाचा अंतिम निकाल लागूनही अद्यापही उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही. मात्र याच परिक्षेतील राज्य कर-निरिक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. म्हणजेच एकाच परिक्षेतील इतर दोन पदांची नियुक्ती दिली गेली पण पोलीस उप-निरीक्षक पदासाठी निवडलेल्यांबाबत मात्र सरकारची उदासिनता दिसून येते. पोलीस उप-निरीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळत नसल्याने त्यांना मानसिक ताण सहन करावा लागतोय. तरी सरकारने या प्रकरणी लक्ष घालून नियुक्तीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
PSI भरती 2022
603 पदांसाठीची शिफारस पत्रे लोकसेवा आयोगाने सरकारकडे पाठवली आहेत.
गृह विभागाने संबंधित उमेदवारांचे अटेस्टेशन केले असून संबंधित फाईल डीजीपी कार्यालयात गेलेली आहे पण अद्याप महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक यांच्याकडून प्रशिक्षणासाठीची परवानगी देण्यात आलेली नाही.
MPA नाशिकने परवानगी दिल्यास DGP कार्यालय तातडीने उमेदवारांची वैद्यकीय चाचणीसाठी शिफारस करेल आणि MPA मध्ये प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचा मार्ग मोकळा होईल.
@Dev_Fadnavis साहेब पोलीस उपनिरीक्षक पदाची प्रक्रिया गेली 3 वर्ष झालं चालू आहे, निकाल लागून पणं आमच्यावर घरी बसायची वेळ आली आहे, नियुक्ती रखडल्यामुळे आम्हाला आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावा लागत आहे, कृपया तात्काळ लक्ष घालून PSI नां जॉइनिंग द्यावी ही विनंती. @CMOMaharashtra
एकीकडे म्हणायचं महाराष्ट्र थांबणार नाही आणि दुसरीकडं शासकीय नोकरीची आशेवर असलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती फाईल मंत्रालयात थांबवून ठेवायच्या..
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर 2022, पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 1, 29 ऑक्टोबर 2023, शारीरिक चाचणी 24 मे, 6 जून 2024, मुलाखत 2 जुलै, 1 ऑगस्ट, सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्टला 2024 प्रसिद्ध, अंतिम निकाल 10 जानेवारी 2025 ला प्रसिद्ध. पोलीस उपनिरीक्षक पदासोबत झालेल्या राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी यांना नियुक्ती मिळून 5-6 महिने झालेत तरी उपनिरीक्षक पदांना आणखी नियुक्ती नाही. या पदांची प्रक्रिया गेली 3 वर्ष झालं चालू आहे, उमेदवारांनी विचारना केली असता, फक्त प्रक्रिया चालू आहे एवढच उत्तर मंत्रालयातून मिळत आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस जी आपण यामध्ये लक्ष घालून मागील 3 वर्षांपासून शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या 603 पोलीस उपनिरीक्षक उमेदवारांना न्याय द्यावा, ही विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 ची प्रक्रिया मंत्रालय स्तरावर रखडलेली आहे.
@CMOMaharashtra आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी ही विनंती, कारण आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही प्रक्रिया उशिरा चालू आहे.@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 प्रक्रिया मंत्रालय स्तरावर रखडलेली आहे. @CMOMaharashtra आपणास विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी. यासोबत परीक्षा झालेल्या इतर पदांना नियुक्ती मिळवून 1 वर्ष झालं आहे. @Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
@mpsc_office पोलीस उपनिरीक्षक 2022 पदांचे शिफारस पत्र लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत म्हणजे पुढील नियुक्ती प्रक्रिया सुरू होईल. कारण PSI 2022 प्रक्रिया गेली अडीच वर्ष झालं सुरु आहे तरी अद्याप नियुक्ती झाली नाही. @Drsuvarnas आपणास कळकळीची विनंती आहे. धन्यवाद 🙏
PSI 2021 प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे, तरी @mpsc_office आपणास विनंती आहे कीं तात्काळ निकाल जाहीर करून जॉइनिंग प्रक्रिया चालू करावी, कारण गेली अडीच वर्षापासून PSI 2022 ची प्रक्रिया रखडली आहे. @Drsuvarnas
♦#लक्षवेधी...
👉कंबाईन 2022 #PSI पदाचा निकाल न्यायालयीन प्रकरणामुळे रखडला आहे. STI व ASO पदांना जॉइनिंग सुद्धा मिळून बरेच महिने झालेत तरी PSI पदाचा अंतिम निकाल तात्काळ घोषित करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas@Dev_Fadnavis@NANA_PATOLE
PSI 2022 सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्ट रोजी जाहीर झाली, तरी अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नाही. आपणास विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा. नवीन सरकार कडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@AbhiPawarBJP@RRPSpeaks
@Viraj_Official1@mpsc_office@Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks 2022 च्या जाहिरातील 603 पैकी 599 जागांची प्रोव्हीजनल यादी लावण्यात आलेली आहे. तर चार जागांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. याच पद्धतीने पूजा जाधव प्रकरणातील एका जागेचा निकाल राखीव ठेऊन उर्वरित 598 जागांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात यावा अशी मा. आयोगास कळकळीची विनंती आहे.🙏
@mpsc_office आपणास विनंती आहे की न्यायालयीन प्रकरणात तात्काळ मार्ग काढून, जॉइनिंग प्रोसेस सुरु करावी. जॉइनिंग उशीरा झाल्यामुळे मुलं नैराश्यात आहेत. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे PSI होऊन पणं मिळेल ते काम करायची वेळ आलीय.. @Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks
Combine 2022 मधील STI, ASO यां पदांना जॉइनिंग मिळून बरेच दिवस झालेत तरी PSI चा अंतिम निकाल जाहीर नाही. तरी @mpsc_office आपणास कळकळीची विनंती आहे की तात्काळ PSI निकाल जाहीर करावा, म्हणजे 2 वर्षांपासून रखडलेली PSI जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @DGPMaharashtra@Drsuvarnas
Combine पूर्व परीक्षा होऊन 2 वर्ष झालेत. PSI 2022 सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होऊन 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तरी अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नाही. @mpsc_office विनंती आहे की निकाल लवकरात लवकर जाहीर करावा म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @Drsuvarnas
आज पुण्यात कोयता गँगच्या हल्लेखोरांनी API रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला.
ज्या पोलीस बांधवांवर आपल्या सर्वांच्या सुरक्षेचे जबाबदारी असते त्यांच्यावर हात उचलण्याची हिंमत या राज्यात,आपल्या पुणे शहरात होत आहे, ही राज्याच्या गृह विभागासाठी अतिशय शरमेची बाब आहे.