Entrepreneur @aayushwindows.in @dimotech_in & @sproenterprises. Typical Indian.! Cricket, Bollywood & Politics addict. Only few people's in world whom i love.
दारावरची टकटक !
केंद्र सरकारने युपीआय व्यवहारांवर 'मर्चंट डिस्काउंट रेट' अर्थात सोप्या भाषेत युपीआय व्यवहारांवर अगदी सरसकट नाही पण शुल्क लावून भारतीयांवर मग ते व्यापारी असोत की ग्राहक यांच्यावर, 'डिजिटल सापळा' लावला आहे. आधी नोटबंदी करून मग आता आम्ही कसं डिजिटल व्यवहाराला चालना देतोय हे दाखवत युपीआय व्यवस्था आणली. मग त्याचा गाजवजा केला, स्वतःची स्तुती करून घेतली, लोकांना सवय लावली आणि अचानक एकेदिवशी घोषित करून टाकलं की आता या व्यवहारांवर शुल्क लागेल. थोडक्यात नागरिकांना गुंगवत ठेवलं आणि हळूच 'डिजिटल सापळ्यात' पकडलं. मी गेली अनेक वर्ष सांगतोय की गाफील राहू नका किंवा सगळं किती आलबेल आहे आणि किती छान सुरु आहे असं अजिबात मानू नका. तुमच्या दारांवर हे सरकार कधीतरी टकटक करणार. आणि त्याची सुरुवात झाली आहे.
सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी युपीआय व्यवस्था आणली. तिला प्रतिसाद मिळेल असं बघितलं आणि तिला प्रतिसाद मिळाला हे सगळं ठीक आहे. पण जर हेतू डिजिटल पेमेंट व्यवस्था आणून आर्थिक देवाणघेवाण सोपी करणं इतका स्वच्छ होता, तर ज्या दिवशी या पेमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केली तेंव्हाच ती चालत राहावी आणि सामान्य माणसांच्या खिशाला झटका बसू नये म्हणून तरतूद का नाही केली ? अशा पेमेंट व्यवस्थांसाठी दीर्घकालीन देखभाल असो की सायबर सुरक्षा असो यासाठी पैसा लागणार मग त्याची तरतूद अर्थसंकल्पात कायम स्वरूपी का नाही केली ?
ग्राहकांनी २००० रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी केली ०.४% एमडीआर लागू होणार ? आणि सरकारचं म्हणणं आहे की हा भार व्यापाऱ्यांनी सोसायचा, काय खात्री आहे की व्यापारी हा भार सोसतील आणि ग्राहकांच्या माथी तो मारणार नाहीत ? यासाठी काही यंत्रणा सरकारकडे आहे का ? उत्तर आहे अजिबात 'नाही'.
पुन्हा सध्याच्या अर्थमंत्री बाईंना श्वासोच्छवासावर शक्य नाही म्हणून अन्यथा त्यावर पण त्यांना १८% जीएसटी लावायचा आहे. त्यामुळे त्यांनी या एमडीआरवर पण जीएसटी लावला आहे. थोडक्यात जमेल तिथून नागरिकांच्या खिशात हात घालत आहेत. पंतप्रधान मोदी परदेशांत जाऊन युपीआयची जाहिरातबाजी करायचे आणि स्वतःची पाठ थोपटवून घ्यायचे, ते आता परत जेंव्हा परदेशांत जातील तेंव्हा मी कसा एमडीआर आणि जीएसटी लावला हे पण हसून हसून सांगणार का ?
काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे की हे सगळं अमेरिकन सरकारच्या दबावाखाली केलं आहे म्हणून. मला त्याबद्दल माहित नाही. पण हा निर्णय घेताना केंद्र सरकारने कोणाशी सल्लामसलत केली, किंवा परदेशी कार्ड कंपन्या आणि जागतिक पेमेंट व्यवस्था यांची अस्वस्थता नव्हती असं सरकार ठाम सांगू शकेल ? उत्तर नाही असं आहे. सरकारवर कुठून तरी दबाव असेल, त्यांनी त्याचा फायदा स्वतःची तिजोरी भरून काढायला वापरला.
प्रश्न चार पैसे किंवा चाळीस रुपयांचा नाही. प्रश्न सरकारच्या हेतूचा आहे. नोटबंदी असेल किंवा डिजिटल पेमेंट व्यवहार असतील यात सरकारचे हेतू कधीच स्वच्छ दिसले नाहीत. UPI चालवण्याचा खर्च कोण करणार, याचा विचार व्यवस्था उभी करतानाच व्हायला हवा होता. जो केला नाही किंवा करायचा नाही असं आधीच ठरलं होतं. २०२२ ला अर्थ खात्याने असं स्वच्छ सांगितलं होतं. पण हे सांगताना मी म्हणलं तसं कधी तुमच्या खिशात हात घालायचा हे पण ठरलं होतं. आणि दोन माणसांच्या व्यवहारांवर शुल्क लावत नाही आहोत असले भंपक युक्तिवाद सरकारने करू नये. तुम्ही डिजिटल सापळा लावला आहे आणि त्यात प्रत्येक भारतीय आता अडकला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एमडीआरचा निषेध नोंदवते. हे शुल्क भरण्यास व्यापाऱ्यांनी सपशेल विरोध करावा.
( २१ ऑगस्ट २०२२ ला सरकारने युपीआय व्यवहारांवर कुठलंही शुल्क असणार नाही असं घोषित केलं होतं, त्या ट्विटचा स्क्रिनशॉट मुद्दामून इथे जोडत आहे )
राज ठाकरे ।
HSRP नंबर प्लेट म्हणजे निव्वळ गंडलेली आयडिया आहे..
काही सिक्युरिटी वगैरे नसते त्यात..
ॲक्सिडेंट झाल्यावर ज्या तीव्रतेने जादाचे पैसे खर्चून केलेली नंबर प्लेट तुटते त्यापेक्षा जास्त तीव्रतेने HSRP नंबर प्लेट तुटते.. कधी कधी ती नुसत्या खड्ड्यांनीदेखील खुळखिळी होऊन पडते..!!
@PratapSarnaik
महाभारतात जेव्हा दुःशासन द्रौपदीचं वस्त्रहरण करत होता; तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिची अब्रू वाचवली होती.
आणि आजच्या आधुनिक जगात त्याच भगवान श्रीकृष्णाच्या दहीहंडीत तोकड्या कपड्यांमध्ये बाया नाचवत आहात तुम्ही लोकं.
छत्रपती शिवराय आणि थोर संतांच्या भूमीत अशा पद्धतीने सण साजरे करणाऱ्यांना अजून हिंदू धर्म कळलाच नाही.
MH 12 YJ 3333…
Maharashtra’s CM @Dev_Fadnavis doesn’t demand that traffic be stopped for him,so who exactly is this VIP?
There is no one even visible inside this vehicle,yet police personnel were seen stopping traffic for it.
Whoever this vehicle belongs to,one can only feel sorry for such VIP culture.
Is this really the Maharashtra we want where an empty car gets more importance than an ordinary citizen?
Does a poor common man have no value in this state?
युरोपमध्ये देखील पाच वर्ष राहिल्यावर त्यांना त्या देशातील नागरिकत्व दिले जाते.
पण आमच्या सारख्या बिचारे लोक 25 वर्षे पुण्यात राहून देखील आम्हाला "उपरे"अशीच ओळख मिळते🤪🤣🤣
जसे पाकिस्तान मध्ये जे भारतातल्या हद्दीतील मुस्लिम आपले सर्व काही सोडून स्थलांतर करून गेले त्यांना तेथील स्थानिक लोक उपेक्षितच म्हणून वागवत राहिले.
तसेच आहे हे एकप्रकारे 🤣🤣🤣
आणि हो ज्यांनी गणेशोत्सव सुरू केला ते लोकमान्य टिळक हे मात्र रत्नागिरी जिल्ह्यामधील चिखली या गावातीलच होते व ते नंतर पुण्यात आले आणि मग त्यांनी गणेश उत्सव चालू केले. म्हणजे एका "उपऱ्या" माणसानेच येथे गणेशोत्सव चालू केलेले आहेत.
मी देखील पुण्यामध्ये राहत असल्यामुळे, येथे गणेशोत्सव कसा साजरा झाला पाहिजे याबद्दल माझेही एक मत आहे. अर्थात, माझी बुद्धी अत्यंत अल्प असल्यामुळे मी येथे कोणालाही 'असेच करा' असे सांगत नाहीये, तर फक्त मला जे काही मनापासून वाटत आहे ते इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या गणेशोत्सवात डीजे किंवा ढोल-ताशा असले पाहिजेत की नाहीत, हा मुद्दा बराच गाजत आहे.
परंतु, माझे वैयक्तिक मत असेच आहे की डीजे पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत आणि ढोल-ताशा देखील अत्यंत मर्यादित स्वरूपातच असायला हवेत.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला, तो यासाठी की लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील समन्वय वाढावा आणि देशभक्तीचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता यावेत. परंतु, ज्या वेळी दर पन्नास मीटरवर एक मंडळ आपला गणपती बसवते, तेव्हा 'एकी'पेक्षा 'चढाओढ' जास्त महत्त्वाची झाली आहे, असेच खेदाने वाटते.
पूर्ण पुण्यामध्ये अत्यंत योग्य नियोजन करून सार्वजनिक गणपती असावेत. उदाहरणार्थ, प्रत्येक विभागासाठी एकच गणपती असावा. मानाचे पाच गणपती आणि दगडूशेठ हलवाई गणपती वगळता, उर्वरित पुण्यामध्ये प्रत्येक विभागाप्रमाणे एक किंवा जास्तीत जास्त दोन सार्वजनिक गणपती असावेत. जसे 'पुणे ४११००१' हा पिनकोड जिथे आहे तिथे एक गणपती, या पद्धतीने प्रत्येक पिनकोड एरियासाठी एक किंवा दोन गणपती.
यामुळे काय होईल?
1. लोकांची गर्दी आपोआप विभागली जाईल.
2. प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर मंडप उभारल्यामुळे जी वाहतुकीची अडचण होते, ती जवळपास संपुष्टात येईल.
3. गणपती विसर्जनाच्या वेळी लागणारा २४ ते ३० तासांचा वेळ कमी होईल आणि मिरवणूक लवकर पूर्ण होईल. त्यामुळे त्यात काही ढोल-ताशा पथके असली तरीही, त्यातून होणारा त्रास प्रचंड प्रमाणात कमी होईल.
4. सध्या जेवढी गणेश मंडळे आहेत आणि त्यातून वर्गणीच्या स्वरूपात जो पैसा गोळा होतो, तो केवळ त्या छोट्या-छोट्या मंडळांवरच खर्च होतो. जर प्रत्येक विभागाचा एक किंवा दोनच गणपती असतील, तर गणपतीची आरास आणि देखावे अत्यंत उत्तम व भव्य स्वरूपात करता येतील. गणपतींची संख्या कमी असल्यामुळे, मंडळांना त्यांच्या सजावटीसाठी आणि एकूणच देखाव्यासाठी अत्यंत भव्य पद्धतीने नियोजन करता येईल.
सध्या अनेक छोटी गणेश मंडळे आहेत, जिथे काहीच देखावा नसतो किंवा केवळ एक साधा मंडप टाकून गणपतीची मूर्ती बसवली जाते. त्यापेक्षा, एकाच गणपतीचा उत्सव अत्यंत भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरा करता येईल. शिवाय, उरलेला निधी त्या विभागातील स्वच्छता आणि इतर सार्वजनिक सोयी-सुविधांवर खर्च करता येईल. पूर्ण पुण्यामध्ये एका गणेश मंडळापासून दुसऱ्या गणेश मंडळापर्यंत अत्यंत सुंदर कॉरिडोर्स तयार करता येऊ शकतील.
डीजे वगैरे गोष्टींवर सध्या प्रत्येक छोटे मंडळ जो खर्च करते, त्याऐवजी या मोठ्या रकमेचा वापर आपल्याच बांधवांसाठी आणि त्या-त्या भागाच्या सुशोभीकरणासाठी करता येऊ शकतो.
माझ्या मते, खऱ्या अर्थाने आपल्यात 'एकी' उरलेली नसल्यामुळेच इतकी जास्त गणेश मंडळे तयार झाली आहेत.
डीजे किंवा ढोल-ताशाचे सतत २४ तास होणारे आवाज (रात्री बारानंतर ते बंद केले जातात याची मला कल्पना आहे) कोणत्याही वृद्ध व्यक्तीसाठी, लहान बालकांसाठी किंवा ज्या घरात आजारी व रुग्ण व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी नक्कीच त्रासदायक ठरतात. जो गणपती विघ्नहर्ता आहे, त्या गणेशाची पूजा करताना आपल्यामुळे बाकी कोणासाठीही विघ्न निर्माण होऊ नये, अशी स्वाभाविक इच्छा असणे हे प्रत्येक गणेश भक्ताचे ध्येय असले पाहिजे.
"तुम्ही कानात बोळे घालून बसा किंवा एक दिवसासाठी पुणे सोडून बाहेर जा," असे सल्ले केवळ सामाजिक भान नसलेले लोकच देऊ शकतात.
प्रत्येकाने फक्त असे इमॅजिन करून बघावे की, आपल्या घरात हृदयविकार असलेले ७०-७५ वर्षांचे आजोबा/आजी आहेत किंवा चार-पाच महिन्यांचे बाळ आहे, आणि आपल्या घराबाहेर कोणी सतत दहा-बारा तास असा दणदणाट केला, तर आपल्याला खरोखर कसे वाटेल?
अर्थात, हे फक्त माझे विचार आहेत. मी अत्यंत क्षुल्लक व्यक्ती असल्यामुळे माझ्या विचारांची किंमत देखील तशी क्षुल्लक आणि कवडीमोलच आहे. त्यामुळे अशा गोष्टी कधी प्रत्यक्षात कृतीत येतील, अशी मला अजिबात अपेक्षा नाही.
मी स्वतःला 'गणेशभक्त' म्हणवून घेणार नाही, कारण ती एक खूप महानतेची आणि गर्वाची गोष्ट ठरेल. मी एक अतिसामान्य मनुष्य आहे, जो केवळ आणि केवळ गणेशाच्या कृपेने आपले आयुष्य जगत आहे असेच मानतो. त्यामुळे मी नास्तिक तर नक्कीच नाही, किंवा डाव्या विचारांचा देखील अजिबात नाही.
फक्त जनतेमध्ये 'एकी' कशामुळे तयार होऊ शकते, असे माझ्या अविकसित आणि अल्प बुद्धीला वाटले, ते मी येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
बाकी सर्व जे काही आहे ते श्री गणेशाच्या इच्छेनेच होईल, यात शंकाच नाही! 🙏🙏
मयूर
See the level of destruction in this latest released before and after Nepal glacier break tragedy which killed nearly 500 and many still missing.
Entire man made structure is completely thrashed and disappeared as if it never existed at 1st place. #nepal
Building this much infra on a riverbed and then expecting nature will change its course !!
CCTV footage of the immigration office located on the Chinese side of the Rasuwagadhi border crossing during today’s disaster.
Prayer for safety of all 🙏🏽🙏🏽
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि मराठी व्याकरणाच्या अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांचं निधन झालं. यास्मिन बाई या जन्माने ज्यू आणि कर्माने अस्सल मराठी होत्या.
यास्मिनबाईंसारख्या व्यक्तींबद्दल मला कमालीचं कुतूहल आणि आदर आहे. ते फक्त त्या ज्यू आणि तरीही मराठी भाषेसाठी आयुष्य वाहिलं म्हणून नाही. पण एखादी भाषा आणि तिचा आत्मा टिकून रहावा या आग्रहासाठी संपूर्ण आयुष्य देणं हे विलक्षण आहे आणि आजच्या काळात अद्भूत आहे.
जन्माने ज्यू असलेल्या जेरुशा रुबेन यांनी अझीझ शेख यांच्याशी विवाह केला आणि त्या यास्मिन शेख झाल्या. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या आणि मुस्लिम व्यक्तीशी संसार केलेल्या या विदुषीने आपलं आयुष्य मात्र मराठी भाषेच्या अभ्यासासाठी आणि तिच्या शुद्धतेसाठी वाहून घेतलं.
खरंतर महाराष्ट्र म्हणजे काय आणि मराठीपण म्हणजे काय, याचं उत्तर त्यांच्या या आयुष्याच्या प्रवासातच दडलेलं आहे. मराठीपण ही जन्माने मिळणारी मक्तेदारी नाही; मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राशी असलेल्या निष्ठेतून ती कमवावी लागते. आणि आजच्या काळात आपण आपल्या भाषेला ज्या पद्धतीने गृहीत धरतोय त्यावरून तर मी अगदी ठामपणे म्हणेन की आपल्याला आपली भाषा टिकवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी सगळ्यांना कष्ट करावेच लागतील. असो
यास्मिनबाई ज्या काळात घडल्या, त्या काळात भाषा शुद्ध लिहिणं, योग्य उच्चारण करणं आणि व्याकरणाचे नियम पाळणं याला एक शिस्त होती आणि ती पाळणाऱ्यांबद्दल आदर होता. आज संवादाची साधनं अफाट वाढली, प्रत्येकाच्या हातात लिहिण्याचं माध्यम आलं; पण दुर्दैवाने भाषेबद्दलचा तो काटेकोरपणा मात्र कमी होत गेला. 'अर्थ समजला ना, मग झालं' इतक्यावर भाषा चालत नाही. भाषा ही एका संस्कृतीची स्मृती असते आणि म्हणूनच तिची काळजी घ्यावी लागते.
विशेष म्हणजे यास्मिनबाईंचा आग्रह भाषा आहे तशीच राहिली पाहिजे, तिच्यात नवे प्रवाह नवे शब्द येऊ नयेत असा कधीच नव्हता. भाषा बदलणार, नवी भाषा नवे शब्द स्वीकारणार हे त्यांना मान्य होतं; पण तो बदल विचारपूर्वक व्हावा, भाषेचा मूळ बाज आणि तिची रचना टिकावी , ती बिघडू नये हा त्यांचा आग्रह होता.
भाषा ही प्रवाही असते. ती इतर भाषांमधले शब्द स्वीकारणार, काळानुसार बदलणार आणि तिची नवी रूपंही तयार होणार. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. पण भाषा बदलणं आणि भाषेवरचं प्रभुत्व गमावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बोलीभाषा कितीही समृद्ध होत राहोत, पण त्या भाषेची एक प्रमाणभाषा टिकली पाहिजे आणि विशेषतः ज्यांची ती मातृभाषा आहे, त्यांना ती उत्तम बोलता, वाचता आणि लिहिता आली पाहिजे. प्रमाणभाषेचा आग्रह हा भाषेच्या शुद्धतेचा अट्टहास नसतो; तो त्या भाषेच्या अभिव्यक्तीची ताकद टिकवण्याचा आग्रह असतो. हा आग्रह धरणाऱ्या शेवटच्या दुव्यांपैकी यास्मिनबाई एक.
त्यांच्या जाण्याने केवळ एक व्याकरणतज्ज्ञ गेल्या असं नाही, तर भाषेवर प्रेम करणं म्हणजे तिच्याशी काटेकोर राहणं असं मानणाऱ्या एका पिढीचा आणखी एक दुवा निखळला.
यास्मिन शेख यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टांगती तलवार ठेवण्यात येनकेन प्रकारे यश मिळवलंय केंद्रातल्या भाजपाने. आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदेंचे हात आणि मान दोन्ही गिलोटीन खाली आलेत.
राज्यात भाजपाचे एकुण एक नेते फडणवीसांवर अवलंबून आहेत. उद्या जर फडणवीसांनाच केंद्रात जावं लागलं तर या परावलंबी नेत्यांचं काय होईल ते मी वेगळं सांगायला नको. कारण जोवर गृहखातं मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे तोवर सगळेच सेफ आहेत अगदी स्वतः मुख्यमंत्री देखील. नंतरचं काहीच माहीत नाही. आणि एकनाथ शिंदेंना जर कोर्टातून झटका बसला तर आजवर उभा केलेला डोलारा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून खाक होईल पुन्हा कधीही पुन्हा न उभा राहण्यासाठी.
विरोधी पक्षातला राष्ट्रवादी काँग्रेस शप गट कधी एकदा सत्तेच्या शेकोटीला जाता येतंय याची चाचपणी करण्यातच सगळी एनर्जी लावतोय. आणि काँग्रेसचं संघटन पुन्हा एकदा सगळं काही राहूल गांधीच्या नैतिक बळावरच डिपेंडंट आहे. राहीलं दोन्ही सेनांचा प्रश्न तर काय लायकीचे लोक सेनेने निवडले होते आणि लोकांच्या मतांशी विश्वासघात झाल्यानंतरही काहीच एक्शन न घेतलेल्या सेनेकडून कोणतीच अपेक्षा नाही.
एकुणात महाराष्ट्र राज्याची स्थिती फार वाईटात वाईट आहे.
@Ravisutanjani In Pune they don't give a sh*t about app shown amount they will charge you as per there KM rate.
Ac, non AC, big car, small car, different rates for all
Everybody should watch Samdish's coverage video. The man did exactly what a journalist is supposed to do, and more.
I have never seen such anger on his face.