@SilentEyes0106 Devendra did his wrong homework . Archana - Well articulated reply to BJP who always try to conclude irrelevant with vague logic.
रेशिम बाग स्नातक देवेंद्र-नापास!
वसतीगृह प्रवेशासाठीची वयाची अट रद्द करावी, सेंट्रलाईज किचन पद्धत बंद करावी, विदर्भात सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थीनींच्या कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपये मदत द्यावी, शहराच्या बाजूला असलेले वसतीगृह मध्यवर्ती ठिकाणी हलवावेत, नोकरभरती, पेसा कायद्याची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी मांजरी (पुणे) इथं गेल्या ११ दिवसांपासून आदीवासी विद्यार्थी उपोषणला बसले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर बनली असूनही शासनाचं या विद्यार्थ्यांकडं साफ दुर्लक्ष होत आहे. याबाबत आम्ही आवाज उठवल्यानंतर शासनाने काही मागण्या मान्य केल्या, परंतु अद्यापही संपूर्ण मागण्या मान्य झालेल्या नाहीत. यासंदर्भात मांजरीमध्ये उपोषणार्थी विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली आणि मंत्री डॉ. अशोक उईके साहेब यांच्याशीही संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या मागणीवर उद्या मार्ग निघाला नाही तर आम्हीही आंदोलनात उतरून ते अधिक तीव्र केलं जाईल, याची शासनाने नोंद घ्यावी.
@Dev_Fadnavis
#विद्यार्थी_आंदोलन #आदिवासी_विद्यार्थी
अभ्यासू म्हणवणाऱ्या ‘ढ’ नेत्याचा अभ्यास कमी पडला की काय इथे या ठिकाणी? 😄
फडणवीसजी, राहुल गांधींवर आरोप करण्याआधी 2008, 2010 आणि 2023 मधली पार्श्वभूमी समजून घ्या…
UPA सरकारने 2008 मध्ये 33% महिला आरक्षण विधेयक आणलं आणि 9 मार्च 2010 रोजी ते राज्यसभेत 186-1 मतांनी मंजूर झालं. लोकसभेत मंजूर होण्याआधीच कार्यकाळ संपल्याने ते लॅप्स झालं…
2023 मध्ये मोदी सरकारने महिला आरक्षणाचा कायदा आणला, मात्र त्याची अंमलबजावणी जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतरच होणार आहे, त्यामुळे आरक्षण तत्काळ लागू झालेलं नाही…
आणि राहुलजींची महत्त्वाची मागणी काय आहे? 33% महिला आरक्षणात OBC महिलांसाठी स्वतंत्र quota असावा, तसेच जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. 2023 च्या कायद्यात OBC महिलांसाठी अशी स्वतंत्र तरतूद नाही…
म्हणून राहुल गांधींवर आरोप करण्याआधी थोडा अभ्यास करा. तथ्य बदलता येत नाहीत, फडणवीसजी.
मनुस्मृतिमधे म्हटल्याप्रमाणे "असूर्यम पश्चात्" ज्या स्त्रीला सूर्याची किरणं स्पर्श सुद्धा करत नाहीत अशी उंबरठ्याच्या आत राहणारी शालीन स्त्री आदर्श मानले जाते . या पार्श्वभूमीवर आज खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकींचा उत्सव पुण्यात साजरा झाला. https://t.co/WBvmzYpb6O