प्रति,
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी,
सस्नेह जय महाराष्ट्र,
ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे , तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही !
काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहीली , मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले ! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या 'भारतरत्न'च नाहीत तर काय मग अजून ?
त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे.
तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला.
आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे.
राज ठाकरे ।
@narendramodi@AmitShah@PMOIndia
@Dev_Fadnavis@girishdmahajan@AjitPawarSpeaks ... वरील सर्व मंडळी आपणास कडकडीची विनंती उमेदवाराच्या मागण्या मंजूर करा रस्त्यावर महिलांचे खूप हाल होत आहेत.उमेद मोर्चा 2024Azad मैदान
@RahulGandhi आपकी समझदारी और देश के लिए साजे दारी बहुत ही काबिले तारीफ है ।कल तक मेरे काँग्रेस के लिए नफरत भरी हुई थी.. लेकिन आपके मोहब्बत की दुकान से अपने दीलो को...जित लिया..आपकी वाणी आपका नेतृत्व और आपका सारे भारत
Maharashtra
Yavatmal
Kapil dewalkar
शिक्षकभरतीत मराठी माध्यमावर होणारा अन्याय सहन करण्यात येणार नाही आज शिक्षण आयुक्त कार्यालयात @ChDadaPatil चंद्रकांत पाटील यांची गाडी अडविण्यात आली, तात्काळ निर्णय घ्या अथवा न्याय मिळेपर्यंत आंदोलन आता तीव्र होणार..!
@dvkesarkar@AbhijitKaran25@RRPSpeaks@Prksh_Ambedkar