गंजीबाई @gajabhauX, तू कोणाच्या कृपेवर जगत आहेस? तुला पोसणारे अनेक आहे का एक? लोकं म्हणतात की तुझे धनी दररोज बदलत असतात. खरं आहे का? सांग सांग, लाजू नको गं गंजे. चल लाज सोड आणि नाच आता म्हणजे तुझा धनी पैसे फेकेल. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
पिंक ई-रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हरित वाहतूक आणि महिलांचे स्वावलंबन हे दोन्हीही हेतू यातून साध्य होत आहेत.
@mieknathshinde
जागतिक बॅडमिंटन दिनानिमित्त आज सावंतवाडी जिमखाना मैदानावर सावंतवाडी नगरपरिषद आयोजित स्व.पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज स्मृती जिल्हास्तरीय 'नगराध्यक्षा चषक' स्पर्धेचे उद्घाटन करून सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असून अशा स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना मोबाईल बाजूला ठेवून मैदानात उतरण्याची आणि आपला व्यक्तिमत्त्व विकास करण्याची उत्तम संधी मिळेल. यासाठी आवश्यक सावंतवाडीचा स्पोर्ट जिमखाना अधिक सुसज्ज आणि दर्जेदार करण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करावा, राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.श्रद्धा लखमराजे सावंत-भोंसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले, माजी जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सभापती प्रमोद सावंत यांच्यासह प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, नगर अभियंता तुषार सरडे तसेच पालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#जागतिक_बॅडमिंटन_दिन #नगराध्यक्ष_चषक #सावंतवाडी #सिंधुदुर्ग
एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार डॉ.विनयजी सहस्त्रबुद्धे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांनाही हार्दिक शुभेच्छा
सुमारे दोनशे वर्षांचा ज्ञान, संशोधन आणि संस्कृतीचा वारसा जपणारी ही संस्था नव्या नेतृत्वाखाली अधिक प्रगतीपथावर वाटचाल करेल, असा विश्वास आहे.
@Vinay1011@AsiaticSocMum
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांनी कणकवली येथील प्रहार भवन येथे भेट घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी व समस्या मांडल्या.
यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करताना, दशावतार ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि ओळख आहे. या लोककलेचे संवर्धन व जतन करण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाच्या स्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य आणि मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास कलाकारांना दिला.
@CMOMaharashtra
देवगड शहरात शासकीय जागेवर पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्राचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. हे आधुनिक पर्यटन केंद्र एका वर्षाच्या कालावधीत विकसित करण्याचा मानस असून, पर्यटकांसाठी दर्जेदार आणि सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
या पर्यटन केंद्राच्या तळमजल्यावर चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर सुमारे ४५० ते ५०० प्रेक्षक क्षमता असलेले आधुनिक सभागृह तसेच सुसज्ज कला दालन उभारण्यात येणार असून विविध सांस्कृतिक, शासकीय व सामाजिक कार्यक्रमांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. भविष्यातील विस्तार योजनेअंतर्गत दुसऱ्या मजल्यावर वॅक्स म्युझियम, तर तिसऱ्या मजल्यावर म्युझिक लायब्ररी आणि पत्रकार भवन विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे पर्यटनाबरोबरच सांस्कृतिक, शैक्षणिक आणि माहिती क्षेत्रालाही चालना मिळणार आहे.
प्रकल्पामध्ये स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, आधुनिक फर्निचर, ध्वनी व्यवस्था, पाणीपुरवठा, अंतर्गत व बाह्य विद्युत व्यवस्था, संरक्षक भिंत, भूखंड सुधारणा आणि आकर्षक परिसर सुशोभीकरणाची कामेही करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे देवगडच्या पर्यटन क्षेत्राला नवी उंची मिळून स्थानिकांना रोजगाराच्या दालने खुली होणार आहे.
देवगड शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून, विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. देवगड-जामसंडे शहराला आदर्श शहर म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने भव्य नाट्यगृह, आधुनिक पर्यटन केंद्र, पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प तसेच पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, देवगड जामसंडेच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा श्रीमती सावंत, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता दिनेशकुमार बागुल, प्र. उपविभागीय अभियंता शैलेश मोरस्कर व सहायक अभियंता प्रणव देसाई उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Maharashtra: Gateway to India’s Gaming and Esports Future
Glad to inaugurate 'India Rising: Road to Esports World Cup 2026' in Mumbai, today.
Today, the gaming industry has surpassed both the music and film industries globally, clearly establishing itself as the future of entertainment sector. India is home to millions of gamers, with a multi-crore gaming industry driving the future of digital entertainment.
Backed by a strong IT sector, exceptional digital talent and world-class institutions, Maharashtra offers the ideal ecosystem for gaming and digital content to thrive. Anchored by Mumbai’s cinematic legacy, the state hosts a robust AVGC-XR network powering global VFX, animation and post-production. As India’s first state with a dedicated AVGC-XR policy, Maharashtra aims to attract ₹50,000 crore in investments and create over 2 lakh jobs. With state-of-the-art virtual production, AI-based rendering and a 50 acre Content Creators Complex under development, the creator and economy is set for rapid growth.
Under the visionary leadership of our Hon PM Narendra Modi Ji, the establishment of the Indian Institute of Creative Technology in Mumbai will be a game-changing milestone for the creative and orange economy. Through India Rising and JioBlast, India’s pathway to the Esports World Cup 2026 in Paris, the Olympics of the gaming world, has been unlocked. This marks a landmark moment for India’s digital creative economy, giving young gamers a global platform to showcase their talent.
Our government remains firmly committed to supporting India’s biggest esports movement and shaping the future of digital entertainment.
JioBLAST CEO Charlie Cowdrey, Senior Strategy Manager of Esports World Cup Foundation James Cunningham and other dignitaries were present.
@narendramodi@EWC_EN@JioBLASTesports
#Maharashtra #EsportsWorldCup
Heartiest congratulations to Ex MP Dr. Vinay Sahasrabuddhe ji on being elected as the President of the Asiatic Society of Mumbai !
Many congratulations to all office bearers who got elected along with him and created this history!
Wishing everyone a successful tenure.
I am confident that this esteemed institution, which has been serving the field of research for nearly 200 years, will reach even greater heights under the leadership of this new team.
एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीत अध्यक्षपदी विजयी झाल्याबद्दल माजी खासदार डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
त्यांच्यासोबत निवडून आलेल्या इतरही पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना भावी वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!
सुमारे 200 वर्ष संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत या संस्थेला ही नवीन चमू आणखी नव्या उंचीवर नेईल, हा विश्वास आहे.
@Vinay1011@AsiaticSocMum
Glimpses from a day that highlighted the strengthening of the cooperative sector, reaffirmed Maharashtra’s position as a growth engine and unlocked global opportunities for India’s young gaming talent.
सहकार क्षेत्राची सक्षम वाटचाल आणि विकासाचे 'ग्रोथ इंजिन' म्हणून महाराष्ट्राचा चढता आलेख अधोरेखित करणाऱ्या, तसेच भारतीय युवा गेमर्ससाठी जागतिक व्यासपीठ खुले करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...
( मुंबई | 4-7-2026)
#Maharashtra #Mumbai #Glimpses
https://t.co/SNza2xUB75
विदर्भातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूरावजी तिडके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
नागपूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देण्याबरोबरच शिक्षण, सहकार आणि समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. अनेक कार्यकर्त्यांची राजकीय जडणघडण त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वाने आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाने अनेकांना प्रेरणा मिळाली. अलीकडेच त्यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटण्याचा योग आला होता.
त्यांच्या निधनाने आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातील एक उमदे, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांती 🙏