राज्यात ‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून शेतकरी, युवक व नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणीही याला बळी पडू नये, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना #कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "कृषी मित्र भरतीच्या नावाखाली शेतकरी, युवक आणि नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणतीही गय केली जाणार नाही. खोट्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित करून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती अथवा संबंधितांवर कृषी विभागामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी अशा बोगस जाहिरातींपासून सावध राहून भरतीसंदर्भातील माहितीची खातरजमा अधिकृत माध्यमांतूनच करावी."
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर, अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित जाहिराती, अर्जासाठी शुल्क भरण्याच्या सूचना, वैयक्तिक बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे आवाहन किंवा संशयास्पद लिंक यांना बळी पडू नये.
नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद जाहिराती किंवा संदेश आढळल्यास तात्काळ संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयास अथवा स्थानिक पोलीस प्रशासनास माहिती द्यावी, असेही आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
@bharanemamaNCP
राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली असून याबाबतचा #शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस देण्यात येईल आणि १५ दिवसांत खुलासा सादर करणे बंधनकारक असेल. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच, पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय अनिवार्यपणे सुरू करण्याचे आदेश दिले जातील.
याव्यतिरिक्त, संबंधित शाळेला निर्णयाविरोधात ३० दिवसांच्या आत अपील करण्याची संधी देण्यात येणार आहे. अपिलानंतरही आदेशाचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबतचा अंतिम निर्णय शालेय शिक्षण आयुक्त स्तरावर सुनावणी घेऊन तीन महिन्यांत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे प्रभावी अध्यापन सुनिश्चित होण्यास मदत होणार असल्याचे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
#मराठीभाषा
आज मुंबईत माझ्या बहिणी पंकजाताई व डॉ. प्रीतमताई समवेत रक्षाबंधन साजरे केले.
भाऊ - बहिणींच्या नात्यातील गोडवा आणि स्नेह वृद्धिंगत राहो, याच यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा!
@Pankajamunde@DrPritamMunde#RakshaBandhan
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
एकीकडे ग्रामपंचायत स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय येण्यासाठी 5 कोटी रु वर्षाला विभागीय स्तरावर व ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या संगणकपरीचालकांना 14 वर्षा पासून विना मानधन वाऱ्यावर.
वारे वा अच्छे दिन ...! की आच्छि सरकार !!
#संगणकपरिचाक
अभिनंदन मित्रा!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री. भागवत तावरे यांचे मन:पूर्वक अभिनंदन. आगामी काळात पक्षाची ध्येय, धोरणे व भूमिका मांडताना उत्तरोत्तर यश मिळावे, ही सदिच्छा.
ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दिलेली ही संधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे. भागवतला दिलेल्या या संधीबद्दल सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार...
@mahancpspeaks
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@maha_governor
@DrSEShinde डॉ.शिंदे साहेब आपले खूप खूप धन्यवाद.
आम्हा ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांचा आपण निर्णय घ्यावा व आम्हाला आपल्या सोबत काम करण्याची संधी द्यावी...!
#संगणकपरिचालक
@DrSEShinde डॉ.शिंदे साहेब आपले खूप खूप धन्यवाद.
आम्हा ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांचा आपण निर्णय घ्यावा व आम्हाला आपल्या सोबत काम करण्याची संधी द्यावी...!
#संगणकपरिचालक
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.
@Dev_Fadnavis साहेब तुम्ही आम्हाला आश्वासन दिले आहे की आम्ही तुम्हाला न्याय देऊ पण साहेब आमची कळकळीची विनंती आमच्या संगणक परिचालकांना न्याय द्या हीच विनंती
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@AmitShah@mieknathshinde साहेब आमच्या संगणक परिचालकांचा निर्णय द्या आम्ही ग्रामपंचायतचे 2011 पासून प्रमाणिकपणे काम करतो पण आज पर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आपणच आमचे न्यायदात आहात आपण आम्हाला न्याय द्यावा
#संगणकपरिचालक
नवी दिल्ली | विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांच्या अध्यक्षतेखाली 'डावी कडवी विचारसरणी क्षेत्रातील सुरक्षा व विकास' या विषयावर आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री @mieknathshinde सहभागी झाले.
महाराष्ट्राने गेल्या १० वर्षांत नक्षलवादाविरोधात सातत्याने कठोर कारवाई केली आहे. राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे, त्यामुळे या भागात भीती आणि दहशतीवर मात केली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत सांगितले.
केंद्र - राज्य समन्वयाने देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन केले जात आहे, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या बैठकीत सुचविलेल्या उपाययोजनांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SiddheshwarMun7@SuryawanshiDU22
माननीय मुख्यमंत्री साहेब आपण स्वर्गवासी दिघे साहेबांचे कट्टर शिष्य आहात दिघे साहेबांच्या येथून कोणताही व्यक्ती खाली हाताने गेला नाही आपण आमच्या संगणक परिचालकांना योग्य न्याय द्याल ही आपल्याकडून अपेक्षा आहे
@CMOMaharashtra@mieknathshinde@SiddheshwarMun7@SuryawanshiDU22 माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपण सर्ववासी दिघे साहेबांचे कट्टर शिष्य आहात दिघे साहेबापासून कोणताही माणूस खाली हाताने गेला नाही आमच्या संगणक परिचालकांना न्याय द्यावा हीच आपल्याकडून अपेक्षा आहे साहेब