महाराष्ट्राचे सक्षम विरोधीपक्ष नेते, माजी मुख्यमंत्री, आदरणीय @Dev_Fadnavis साहेब यांची मुंबई येथे शासकीय निवासस्थानी भेट घेतली. @plannogram या संस्थेने तयार केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा विस्तृत अभ्यास अहवाल साहेबांना सादर केला
@RamVSatpute@PradipGavade @dpandeyjee @Piyush_SG
ज्या मातीमध्ये आपल्या रक्षकांनी आपलं रक्त सांडलं, तिथं उभे राहून सैनिकांचा अपमान करणाऱ्या महिलेचा जाहीर निषेध!
कारगिलच्या अतिसंवेदनशील सीमावर्ती भागात सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी रस्ता रोखला असता, सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणे आणि "आम्ही टॅक्स भरतो, म्हणून तुम्हाला पगार मिळतो" अशी मुजोर भाषा वापरणे हा सैनिकांसह संपूर्ण राष्ट्राचा अपमान आहे.
मायनस २०-३० अंश सेल्सिअस तापमानात स्वतःचा जीव धोक्यात घालून सीमेवर पहारा देणाऱ्या जवानांमुळेच तुम्ही देशात सुरक्षितपणे फिरू शकता. तुम्ही भरलेला टॅक्स तुम्हाला देशाची सुरक्षा व्यवस्था आणि सैनिकांच्या शिस्तीचा अनादर करण्याचा परवाना देत नाही. सैनिकांचा पगार हा त्यांच्या असीम कष्टाचा आणि बलिदानाचा सन्मान आहे, ते कोणाचे उपकार नाहीत.
डाव्या विचारसरणीच्या प्रभावातून पुढे आलेल्या अशा उर्मट आणि विकृत मानसिकतेच्या पिलावळींचा मी निषेध करतो. प्रशासनाने अशा अराजक तत्त्वांवर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करावी!
#RespectOurForces #IndianArmy #Kargil #NationFirst
📍श्रीराम निवास
राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. श्री. गिरीश महाजन यांनी आज ‘श्रीराम’ निवास येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण व मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद साधला.
या भेटीदरम्यान मा. श्री. गिरीश महाजन यांनी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधत विविध सामाजिक, विकासात्मक आणि संघटनात्मक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. कार्यकर्त्यांच्या भावना, स्थानिक प्रश्न आणि जनहिताच्या विविध मुद्द्यांवरही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधील सुसंवाद, आपुलकी आणि विश्वास अधिक दृढ करणाऱ्या अशा भेटींमधून संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळते. जनसेवेच्या वाटचालीत सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. शहाजीराजे (बाबाराजे) देशमुख, नातेपुते मंडल अध्यक्ष श्री. संजय कांता देशमुख, माळशिरस मंडल अध्यक्ष श्री. नितीन मोहिते माळी यांसह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व अन्य सहकारी उपस्थित होते.
@girishdmahajan
#shriramniwas #malshiras
केरळमधील पहिल्या निवडणूक सभेत राजकीय हिंसाचारात प्राण गमावलेल्या भाजप कार्यकर्त्यांना स्मरण करत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब भावुक झाले.
#narendramodi#KeralamStateElection#keralam
बीड जिल्ह्यातील डोईठाण येथील श्री. प्रल्हाद श्रीमंत खाडे यांचे सुपुत्र तथा सहकारी मित्र सुदर्शन आणि करमाळा तालुक्यातील वंजारवाडी येथील श्री संजय आत्माराम बिनवडे यांची सुकन्या ऋतुजा यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित होतो.
याप्रसंगी ऋतुजा व सुदर्शन यांना आनंदमयी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी खाडे व बिनवडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
मनःपूर्वक धन्यवाद, देवाभाऊ!
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, आपले मार्गदर्शक मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माळशिरस तालुक्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ‘दिवाळी स्नेहमिलन’ सोहळ्याला दिलेल्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
आपल्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनामुळे आमच्यात नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या याच विश्वासाला सार्थ ठरवण्याचा आमच्या सर्वांचा निर्धार आहे.
सर्व माळशिरसकरांच्या वतीने आपले खूप खूप आभार!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra@RaviDadaChavan
#InspiringGuidance
#malshiras
#DevendraFadnavis
स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात, जे काम तेथील प्रस्थापित नेते करू शकले नाहीत, ते काम आपल्या कठोर परिश्रमाने पूर्ण होत आहे. गरिबांच्या हाल अपेष्टांची जाण असणारे कमी नेते आहेत त्या पैकी आपण एक आहात. आपल्या हातून जनतेची सेवा घडत राहो. @RamVSatpute
फलटण येथील कार्यक्रमादरम्यान संवाद साधताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माळशिरस तालुक्यातील वंचित २२ गावांना त्यांच्या हक्काचे पाणी लवकरच मिळणार असल्याची ग्वाही दिली.
यासाठी मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह माझे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. आमच्या या प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे खूप आभार!
हे सर्व फक्त भाजपच्या कार्यक्षम आणि विकासप्रधान सरकारमध्येच शक्य आहे.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra@imRanjeetsingh_
#WaterFor22Villages #LeadershipInAction #DevelopmentWithPromise #BJPForProgress
जनसुरक्षा विधेयकाची गरज का ?
प्रसिद्ध वकील व राज्यसभा खासदार ॲड.उज्वल निकम यांचा आजच्या दैनिक लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेला अभ्यासपूर्ण व वाचनीय लेख.
#Ujwalnikam@Dev_Fadnavis
राज्यसभेसाठी केरळ मधील कण्णूर जिल्ह्यातील श्री.सदानंद मास्तर यांची निवड ही प्रेरणादायी आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करत असल्याने वयाच्या ३० व्या वर्षी कम्युनिस्टांनी त्यांचे दोन्ही पाय तोडले.
श्री.सदानंद मास्तर यांनी विचारधारेशी असणारी निष्ठा आणि श्रद्धा कायम ठेवली .
त्यांचे जीवन हे धैर्य, संघर्ष आणि सेवाभावाचं प्रतीक आहे. 🇮🇳
राष्ट्रनिष्ठित कार्यकर्त्याचे अभिनंदन.
#SadanandMaster #RajyaSabha #Kerala #RSS #BJP
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कामाला न्याय देणारा हा पक्ष आहे. त्यामुळे ही निवड म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा उचित सन्मान आहे.
आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपचे संघटनात्मक काम नक्कीच आणखी पुढे जाईल. तसेच कार्यकर्त्यांना देखील अधिक बळ मिळणार असून राज्याच्या सर्वांगीण विकासातही नवे अध्याय जोडले जातील, असा विश्वास आहे. या नवीन जबाबदारीसाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
@narendramodi@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@cbawankule
#BJPPresident #RavindraChavan #Congratulations #bjpmahararashtra