अजितदादांचा अकाली निधनाने गावंच्या गावं शोकसागरात बुडाली आहेत. गावागावात, पारावर, चौकात एकाच नावाची चर्चा...”अजितदादा पवार” !
प्रत्येक जण दादांसोबतच्या आपल्या आठवणी सांगतोय, दादांच्या जाण्याने हळहळतोय. परमेश्वरा.. या दुःखातून सावरण्याचं बळ प्रत्येकाला दे ! #ajitpawar
त्र्यंबक व त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याचा अत्यंत आनंद आहे!
आगामी कुंभमेळा लक्षात घेता हा निर्णय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, मा. एकनाथ शिंदे व मंत्रीमंडळाचे मनःपूर्वक आभार!
सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील टेक्सटाईल युनिटमध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला ही अतिशय दु:खद घटना आहे.
दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
१२वीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
ज्यांना यावेळी अपेक्षित यश मिळालं नाही, त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करा — यश नेहमी प्रयत्नशीलांनाच मिळतं!
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण जगताप यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या स्मृतीस आदरांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची ताकद देवो.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक लोक जखमी झाल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि हृदयद्रावक आहे.
मी शोकाकुल कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. #PahalgamTerroristAttack
मुंबईत एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची बोट अपघातग्रस्त होऊन अनेक नागरिकांनी जीव गमावल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन ते लवकर बरे व्हावेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
#mumbaiboataccident
इगतपुरीचे आमदार आणि आदिवासी समाजाचे नेते श्री. हिरामण खोसकर यांनी आज राष्ट्रवादीचे विकासाभिमुख विचार स्वीकारत माझ्या आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार खोसकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चालवलेल्या कामांची व लोकोपयोगी योजनांची ही पोचपावती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात मी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
आदिवासी समाजाचे नेते आणि आमदार श्री. हिरामण खोसकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या अनेक सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हिरामण खोसकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मनःपूर्वक स्वागत आणि त्यांना जनसेवेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
@mahancpspeaks@AjitPawarSpeaks@SunilTatkare@khoskar #NCP #पक्षप्रवेश
काल इगतपुरीचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रवादी विचारांना आणि अजितदादांच्या नेतृत्वाला सर्वजण पसंती देत आहेत!
@mahancpspeaks@AjitPawarSpeaks@SunilTatkare@khoskar
#NCP #Maharashtra #AjitPawar
उद्योग विश्वातील आदर्श व्यक्तिमत्व, नैतिकता व मूल्यांचे उत्तुंग दीपस्तंभ, पद्मविभूषण रतन टाटा साहेब यांचे दुःखद निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली ! #भावपूर्णश्रद्धांजली#RatanTata