We pay our heartfelt tributes to Field Marshal Sam Manekshaw, fondly remembered as Sam Bahadur, whose exemplary leadership was instrumental in India’s triumphant victory over Pakistan during the Bangladesh Liberation War in 1971.
Across an illustrious four-decade military career and five wars, he embodied courage, integrity, and selfless service, leading the Armed Forces with exceptional valour and distinction.
One of India’s greatest military commanders, his legacy of leadership, patriotism, and unwavering dedication to the nation will forever inspire generations.
Student Fail ❌
System Fail ✅
Students don't fail.
The system fails them.
Every student has talent, potential and a dream. A fair education system should recognise it, nurture it and give them a real chance, not reject them, exploit them or abandon them.
#ChhatronKiGoonj
खाकी वर्दीतला अधिकारी की संघाचा प्रचारक?
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी याचे तसेच खालील प्रश्नांची उत्तर महाराष्ट्राला द्यावीत.
भारतीय संविधानाची शपथ घेऊन, सर्व नागरिकांना समान वागणूक देण्याची जबाबदारी स्वीकारून एक आयपीएस अधिकारी सेवेत प्रवेश करतो. त्याची ओळख कोणत्याही धर्म, जात, पक्ष किंवा विचारधारेशी नसते; त्याची ओळख फक्त आणि फक्त संविधानाशी असते.
मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर जाऊन संघ, हिंदुत्व आणि डॉ. हेडगेवार यांचे गौरवगान करताना नांगरे पाटील यांचे भाषण पाहिल्यानंतर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो ते संविधानाचे अधिकारी म्हणून बोलत होते की एका विशिष्ट विचारधारेचे प्रतिनिधी म्हणून? आता प्रश्न नांगरे पाटील यांच्या पुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निगडित आहे. म्हणून मुख्यमंत्री/गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर काही प्रश्नांची स्पष्ट उत्तरे दिली पाहिजेत.
पहिला प्रश्न-
All India Services (Conduct) Rules, 1968 मधील Rule 13(2)(f)(iii) नुसार एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याला खाजगी माध्यम व्हिडिओ किंवा तत्सम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असते.
विश्वास नांगरे पाटील हे उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र गृहविभागाची किंवा राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेतली होती का? घेतली होती तर ती कोणत्या नियमांतर्गत देण्यात आली होती त्याची प्रत सार्वजनिक केली जाणार का? जर परवानगी घेतली नव्हती तर All India Services (Conduct) Rules, 1968 च्या उल्लंघनाबद्दल सरकार कारवाई करणार का?
दुसरा प्रश्न-
Rule 3(1) ची पायमल्ली?
All India Services (Conduct) Rules, 1968 स्पष्ट सांगतो की अधिकाऱ्याने असे कोणतेही वर्तन करू नये जे त्याच्या पदाला शोभणारे नाही.
एका विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन त्या विचारसरणीचे सार्वजनिक उदात्तीकरण करणे हे एका सामान्य नागरिकाला शोभेल; पण सेवेतील आयपीएस अधिकाऱ्याला शोभते का? पोलीस दलातील अधिकारी हा कायद्याचा रक्षक असतो, विचारधारेचा प्रचारक नाही.
तिसरा प्रश्न -
Political Neutrality की Political Loyalty?
Rule 3(1A)(ii) स्पष्ट सांगतो:
"Every member of the Service shall maintain political neutrality." "राजकीय तटस्थता हा आयपीएस सेवेचा आत्मा आहे."
मग प्रश्न असा की, संघाच्या मंचावर जाऊन विचारसरणीचे कौतुक करणे ही तटस्थता आहे की एका विशिष्ट राजकीय-वैचारिक प्रवाहाशी सार्वजनिक निष्ठा व्यक्त करणे? जर उद्या एखादा वरिष्ठ पोलीस अधिकारी दुसऱ्या धार्मिक किंवा राजकीय संघटनेच्या मंचावर जाऊन त्यांचेही असेच गुणगान करू लागला, तर प्रशासनावर जनतेचा विश्वास कसा टिकणार?
चौथा प्रश्न -
संविधान सर्वोच्च की संघ विचार?
Rule 3(2B)(ii) प्रत्येक अधिकाऱ्याला संविधानाच्या सर्वोच्चत्वाशी बांधून ठेवतो.
संविधान कोणत्याही एका धर्माचे, जातीचे किंवा विचारधारेचे नाही. ते सर्व भारतीयांचे आहे. मग एका संविधानिक अधिकाऱ्याने एका विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन तिचे सार्वजनिक गुणगान करणे ही संविधानिक तटस्थता आहे का?
पाचवा प्रश्न-
Rule 3(2B)(vi) : "प्रभावाखाली जाण्याची शंका"
हा नियम अधिकाऱ्याला कोणत्याही संघटना किंवा व्यक्तीच्या प्रभावाखाली जाण्यापासून रोखतो ज्यामुळे त्याच्या अधिकृत कर्तव्यांवर परिणाम होऊ शकतो.
आज महाराष्ट्रातील लाखो नागरिक विचारत आहेत, एखादा अधिकारी सार्वजनिकपणे एका विशिष्ट विचारधारात्मक संघटनेच्या मंचावर गौरवोद्गार काढतो, तेव्हा उद्या त्याच्या निर्णयांवर त्या विचारधारेचा प्रभाव पडणार नाही याची खात्री कोण देणार?
सहावा प्रश्न- हा सर्वात गंभीर प्रश्न
Rule 5(1) : म्हणतो,
"No member of the Service shall be associated with any organisation which takes part in politics." "सेवेतील कोणताही अधिकारी राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेशी संबंधित असणार नाही."
हा नियम केवळ सदस्यत्वापुरता मर्यादित नाही. "Associated with" हा शब्द जाणीवपूर्वक वापरण्यात आला आहे. मग संघाच्या मंचावर जाऊन सार्वजनिकरित्या गुणगान करणे ही "association" मानली जाणार नाही का?
आज प्रश्न एका व्यक्तीचा नाही.
प्रश्न आहे भारतीय प्रशासकीय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा.
प्रश्न आहे संविधानाच्या सर्वोच्चत्वाचा.
प्रश्न आहे खाकी वर्दीची प्रतिष्ठा टिकवण्याचा.
म्हणूनच या प्रकरणाची चौकशी व्हावी, परवानग्या सार्वजनिक कराव्यात आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे का याबाबत सरकारने स्पष्टता यावी. कारण संविधानापेक्षा मोठी कोणतीही व्यक्ती, संघटना नाही…आणि संविधानापेक्षा मोठी कोणतीही विचारधारा असू शकत नाही.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@HMOIndia@vishwasnp
फिफाने कोल्हापुरी मराठीत पोस्ट करून समस्त मराठी मनं जिंकली आहेत.
तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम रहा. जग तुमची दाखल घेईल. आपली मराठी जपूया. सरकारच्या हिंदी सक्तीला विरोध करूया.
जय मराठी , जय शिवराय 😊
“Bankim Chandra had equal strength in both his hands, he was a true 𝑠𝑎𝑏𝑦𝑎𝑠𝑎𝑐ℎ𝑖 (ambidextrous)…with one hand, he ignited the light of literary enlightenment; and with the other, he blew away the smoke and ash of ignorance and ill conceived notions.”
~ Gurudev Rabindranath Tagore
Paying humble tribute to Bankim Chandra Chattopadhyay, whose iconic Vande Mataram and extraordinary literary creations ignited the spirit of patriotism and inspired millions throughout India’s National Movement.
काँग्रेस पक्षाच्या 'छात्रों की गूंज' या देशव्यापी अभियानांतर्गत उद्या नागपूर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या श्रीमती शमा मोहम्मद जी या पत्रकार परिषदेला संबोधित करतील.
#ChhatronKiGoonj
महान स्वतंत्रता सेनानी, संविधान सभा की सदस्य एवं स्वतंत्र भारत की प्रथम महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी जी की जयंती पर विनम्र श्रद्धांजलि।
उन्होंने भारत छोड़ो आंदोलन में उल्लेखनीय भूमिका निभाई तथा 1940 में अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के महिला विभाग के गठन में महत्वपूर्ण योगदान दिया।
लोकशाही वाचवा, मतदारांचे हक्क सुरक्षित करा!
केंद्र सरकारकडून होणाऱ्या मतदार मॅपिंगच्या (SIR) नावाखाली अनेक नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावला जात असल्याचे आणि यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र आणि देशातील प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा, यासाठी काँग्रेस पक्ष कटीबद्ध आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि लोकशाहीच्या मूल्यांनुसार व्हावी यासाठी आम्ही BLO च्या सोबतीने प्रत्येक स्तरावर काम करत आहोत.
काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि सजग नागरिकांनी आपापल्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात आणि बुथवर जागरूक राहावे. या मोहिमेवर बारीक लक्ष ठेवून प्रत्येक मतदाराचा हक्क अबाधित राखण्यासाठी एकत्र या!
मा. श्री. विश्वजीत कदम
आमदार, पलूस-कडेगाव विधानसभा
@vishwajeetkadam
In Westros, everytime when the battle is clinging and the dragons arrive.
The Indian #GOT#HOTD fans will get it. #HouseOfTheDragon
I hope the visuals are justifying the bgm 😃 you'll like the transition midway.